Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 05 Feb 2022 07:26 AM
क्रांतीवीर रामभाऊ श्रीपती लाड यांचे निधन

प्रतिसरकारच्या तुफान दलाचे कॅप्टन क्रांतीवीर रामभाऊ श्रीपती लाड यांचे निधन झाले आहे.  वृद्धापकाळाने वयाच्या 100 व्या वर्षी तासगाव येथील रुग्णालयात  अखेरचा श्वास  घेतला आहे.

कर्जतच्या चार फाटा येथे धावत्या गाडीला आग

कर्जतच्या चार फाटा येथे धावत्या गाडीला आग आहे. गाडी सीएनजी इंधनावर चालणारी असून आग लागल्यानंतर गाडीतील प्रवासी बाहेर असल्याने सर्वजण सुखरूप आहेत. कर्जत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे.

पुण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक

पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. परंतु, किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 

ओरीसामधील पत्रकाराचा नक्षलवाद्यांचा हल्ल्यात मृत्यू

ओरीसाच्या कालाहंडी जिल्ह्यातील मोहनगिरी डिलन भागात भूसुरुंग स्फोटात एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. उडिया दैनिकाचा रोहित बिस्वाल असे मृत पत्रकाराचे नाव आहे. पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी नक्षल्यांनी पोस्टर देखील लावले होते. त्या पोस्टरची बातमी करायला पञकार घटनास्थळी गेला असताना हा स्फोट झाला. 

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती 

शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये तू-तू मै-मै

औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्या मध्ये या निवडणुकीवरून तू तू मै मै झाली. औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष पदासाठी हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली. आज उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. त्यासाठी हरिभाऊ बागडे, मंत्री संदिपान भुमरे ,आमदार अंबादास दानवे ,काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी एकत्र येऊन

पंढरपूरमध्येही आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

बार्शीच्या  विशाल फटे प्रकरणानंतर आता पंढरपूरमध्येही आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल, पंढरपूर येथील प्रथमेश कट्टेसह एकावर गुन्हा दाखल, पतसंस्थेत सहा महिन्यात पैसे दुप्पट करण्याचे अमिष दाखवून केली फसवणूक, अनेकांची फसवणूक समोर येणार ..

गरम उसाचा रस वाहतूक करणारी टाकी फुटली, मोठा स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीर

गरम उसाचा रस वाहतूक करणारी टाकी फुटल्याने, मोठा स्फोट झाल्याने दोन कामगार गंभीररीत्या भाजले. कन्नडजवळील बारामती ॲग्रो साखर कारखान्यात काल दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सागर राठोड आणि अण्णासाहेब पवार अशी जखमींची नावे आहेत.जखमींना औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे .

अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढून जीवदान

तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला वर काढून जीवदान मिळवून देण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले. सावजाच्या शोधात निघालेला बिबट्या अंधारामुळे अजिंठा राखीव जंगलाला लागून असलेल्या तोंडापूर शिवारातील विहिरीत पडला होता.अजिठाराखीव जंगलात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. असाच प्रकार तोंडापूर शिवारात घडला. अजिंठा राखीव जंगलातील राक्सा परिसरातून सावजाच्या शोधात रात्रीच्या वेळी बाहेर पडलेला एक बिबट्या राखीव जंगलाशेजारील तोंडापूर शिवारातील शेतकरी भिवसन लोखंडे यांच्या शेतातील विहिरीत पडला. शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवलं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका लाकडी सिडीच्या साह्याने बिबट्याला बाहेर काढलं. बाहेर पडताच बिबट्यांनं जंगलात धूम ठोकली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथे शेतीच्या वादातून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी येथे शेतीच्या वादातून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली आहे.


याप्रकरणी परस्पर विरोधात शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शेतीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती आहे. 


या हाणामारीत जखमी झालेल्यांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या घटमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नाशिकच्या तपोवन कॉर्नर येथे शिवशाही बसचा अपघात

नाशिकच्या तपोवन कॉर्नर येथे शिवशाही बसचा अपघात


-उड्डाणपुलाखालील 44 नंबरच्या खांबाला आदळली बस


-नियंत्रण सुटल्याने झाला अपघात


-अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू 


-नाशिकहून औरंगाबादकडे जात होती बस

मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा

मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा, कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, माजीद जलीम शेख असं 23 वर्षीय तरुणाचे नाव, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.

पाणी कनेक्शन का तोडले म्हणून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीनं उपसली तलवार, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील थरारक घटना

'तुम्ही ग्रामपंचायतीच्या बाहेर या तुम्हाला जिवंत सोडत नाही'


पाणी कनेक्शन का तोडले म्हणून ग्रामपंचायत सदस्याच्या पतीनं उपसली तलवार


कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील थरारक घटना


ग्रामपंचायतीच्या दारावर देखील मारल्या लाथा


तलवार उपसणाऱ्या राजेंद्र भोईटेवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शिवीगाळ करत जीवंत सोडणार नाही अशी धमकी

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ठाणे-दिवा दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर (Central Railway) शुक्रवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच ब्लॉक 04, 05 आणि 06 फेब्रुवारी रोजी 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे (Thane) ते दिवा (Diva) स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक (Jumbo Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान, 350 लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर, शंभरहून अधिक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. 



नगर विकास खात्याच्या नगर रचना पद भरतीच्या जाहिरातीवरून भाजप आक्रमक


महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अटच वगळून टाकल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे महाराष्ट्र आणि मराठीवरील प्रेम हे निव्वळ  बेगडी आहे अशी खरमरीत टीका मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.  राज्यातील नगरविकास खात्याच्या नगररचनाकार या पदाकरिता काढलेल्या जाहिरातीतील “उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट वगळण्यात आली असल्यावरून आ. भातखळकर यांनी ठाकरे सरकारला त्याबाबत जाब विचारला आहे. तसेच रोजगाराकरिता महाराष्ट्रातल्या लोकांना प्राधान्य देऊ अशा फुशारक्या मारणार्‍या सरकारने नगररचनाकारांच्या संदर्भातील 2018 सालची “उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असला पाहिजे” ही अट का वगळली या प्रश्नाचे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं आणि ही अट पुन्हा एकदा त्या ठिकाणी आणली पाहिजे अशी मागणीही आ. भातखळकर यांनी केली आहे.  


आज विठुरायाचा विवाह सोहळा; पंढरपुरात लगीनघाई, फुलांचा महाल, विठ्ठल-रुक्मिणीला खास पोशाख
 
Pandharpur Vitthal Rukmini Vivah : आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव,  निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने  वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते . आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी. मग या देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात  लगीनघाई सुरु आहे.  सध्या कोरोनाचे  संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. Maharashtra News,Maharashtra,abp majha,latest news,ABP Majha



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.