Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यातील बैठक संपली

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 04 Feb 2022 07:13 PM
बीड जिल्ह्यात सुरू होणार आठवी ते बारावीचे वर्ग..

मागच्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर फक्त दहावी आणि बारावीचे वर्ग बीड जिल्ह्यात सुरू करण्यात आले होते. परंतु विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता येत्या 7 तारखेपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल

कोल्हापुरात तब्बल 2 कोटी 25 लाखांची वीजचोरी, महावितरणकडून गुन्हा दाखल


वीजचोरी प्रकरणी महावितरणने अजय अशोक मेंडगुदले आणि अशोक महादेव मेंडगुदले याच्यावर केला गुन्हा दाखल


कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल


वीजजोडणीधारक ग्राहकांनी वीजमीटरमध्ये फेरफार करून वीजेच्या 9 लाख 24 हजार 359 युनिटची म्हणजेच आर्थिक स्वरूपात 2 कोटी 25 लाख रूपयांची वीजचोरी केल्याच उघड

राज्य मागासवर्गीय आयोगाची पुण्यातील बैठक संपली

ओ बी सी आरक्षणासाठी आवश्यक असलेला अंतरिम अहवाल देण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीचा आधार घेत राज्य मागासवर्गीय आयोगाने अंतरिम अहवाल तयार केलाय.  हा अहवाल राज्याच्या मुख्य सचिवांन सादर करण्यात येणार असून आठ तारखेला तो सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.  त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत ओ बी सी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. 

नितेश राणे यांचा आजचा मुक्काम रुग्णालयात

ओरस - भाजप आमदार नितेश राणे यांचा आजचा मुक्काम रुग्णालयात. प्रकृती अस्वस्थचे दिले होते कारण. शनिवारी दुपारी 3 वाजता जामीन अर्जावर होणार सुनावणी

महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पोलवर चढलेल्या मजुराचा मृत्यू  

लाईन स्टाफच्या सांगण्यावरून महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी पोलवर चढलेल्या मजुराचा अचानक विद्युत प्रवाह आल्याने जागीच मृत्यू  झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठ सांगवी गावातील घटना. उमेश  तुकाराम माने असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

पाण्यासाठी गाव सोडलेल्या सावंगी मग्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश

पाण्यासाठी गाव सोडलेल्या सावंगी मग्रापूर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आलं असून प्रशाससाने तात्पुरती पाण्याची व्यवस्था केली आहे. पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या उपसरपंचावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे असं लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.

औरंगाबादमधील कन्नड शहरात मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलवारीने हल्ला 

काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर तलवारीने हल्ला झाला आहे. मुख्याध्यापक आबासाहेब चव्हाण आणि सेवक संतोष जाधव यांच्यावर  तलवारीने प्राणघातक हल्ला. आरोपी शालेय परिसरातील मुलींना त्रास देऊन त्यांची छेड काढायचा त्याला समजावण्यासाठी गेले असता त्याने हल्ला.

नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. 

एसीबीचे पोलीस निरीक्षक दोन दिवसापासून अचानक बेपत्ता

जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे हे दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे समोर आलंय, बुधवारी  रात्री सात वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले होते तेंव्हापासून त्यांचा कुठलाच ठावठिकाणा लागला आहे नाही. यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीच्या तक्रारी वरून मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, दरम्यान त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तीन वेगवेगळे पथक रवाना करण्यात आलेत .

माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझं जीवन धन्य झालं : राज्यपाल
आज राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी सिंदखेडराजा येथील जिजाऊ जन्मस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे धाकटे बंधू देखील होते. सोबतच पालकमंत्री डॉ. राजेन्द्र शिंगणे , जिल्हाधिकारी एस.रामामुर्थी देखील उपस्थित होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना राजवाड्याचा इतिहास सांगितला. राज्यपाल जवळपास 30 मिनिटे राजवाड्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल म्हणाले की आज जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझ्या जीवनाचं सार्थक झालं.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला कोर्टसमोर हजर राहण्यासाठी समन्स जारी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला कोर्टसमोर हजर राहण्यासाठी समन्स जारी,  मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं जारी केलं समन्स, या प्रकरणात आरोपी असलेल्यांची यादी तयार ज्यात अनिल देशमुख हे  आरोपी क्रमांक 15 आहेत , अनिल देशमुख यांच्या जामिनावर उत्तर देण्यासाठी ईडीनं मुदत वाढवून  मागितली, या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 फेब्रुवारीपर्यंत तहकूब

दुपारी अडीचच्या दरम्यान नितेश राणे यांना कोर्टात हजर केलं जाईल- राणेंचे वकील संग्राम देसाई
 संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीसांकडून तपास झालेला असावा असं वाटतंय. दुपारी अडीचच्या दरम्यान नितेश राणे यांना हजर केले जाईल अशी माहिती नितेश राणे यांचं वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे. ज्यावेळी त्यांना हजर करतील त्यावेळी आमची बाजू मांडू. जर पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली तर त्याला आम्ही विरोध करु असे संग्राम देसाई यांनी म्हटले आहे.

 
प्रवाशांचे बनावट RTPCR रिपोर्ट बनविणाऱ्या कोल्हापुरातील तीन ट्रॅव्हल्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना अटक

बनावट रिपोर्ट घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही कर्नाटक पोलिसांनी अटक केली. कर्नाटक पोलिसांची कोल्हापुरात येवून धडक कारवाई. निपाणीचे सीपीआय प्रवाशी बनून आले होते.  त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करत केला बनावट RTPCR रिपोर्ट देणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना ट्रॅव्हल्स कंपनी बनावट रिपोर्ट बनवून देत असल्याचे उघड करण्यात आली. सेफली ट्रॅव्हल्स, आनंद ट्रॅव्हल्स आणि सहारा ट्रॅव्हल्सवर कारवाई

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीयातील डॉक्टर्स सामूहिक रजेवर

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक अस्थायी प्राध्यापकांचे प्रतिनिधी आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ यांच्यात मंत्रालयात जोरदार खडाजंगी उडाली होती . याच्या निषेधार्थ आज स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर प्राध्यापक कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत.महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. सचिन मुळकूटकर यांच्या नेतृत्वाखाली अस्थायी डॉक्टरांचे शिष्टमंडळ विभागाचे सचिव सौरभ विजय यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पोहोचले. मात्र, भेटीची वेळ देऊनही ऐनवेळी ताटकळत ठेवण्यात आले आणि भेट नाकारली.. या घटनेचा अस्थाई सहाय्यक प्राध्यापक या संघटनेने निषेध नोंदवला आहे.. आज अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर गेले आहेत

सातारा: पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वक्तव्य; चर्चेसाठी बंडातात्या कराडकर यांच्या मठावर पोलीस दाखल

किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फलटण पिंपरद येथील मठावर पोलीस दाखल झाले आहेत. बंडातात्या कराडकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.

सातारा: पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वक्तव्य; चर्चेसाठ बंडातात्या कराडकर यांच्या मठावर पोलीस दाखल,


बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस माठावर दाखल 


फलटण पिंपरद येथील त्यांच्या मठावर पोलीस दाखल 


पोलीस आणि बंडातात्या कराडकर यांच्यात चर्चा सुरू 


बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेणार असल्याची चर्चा

माघी गणेश जयंतीनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांकडून सिद्धीविनायक मंदिर परिसरात रांगा

माघी गणेश जयंतीनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांकडून सिद्धीविनायक मंदिर परिसरात रांगा लागल्याचं चित्र आहे. कोरोनाची परिस्थिती कायम असल्यानं क्युआर कोड मार्फतच भाविकांना दर्शनाची सोय सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सोय करण्यात आली आहे. प्रति तास एक हजार भाविक दररोज बाप्पाचे दर्शन घेत असतात मात्र आज प्रति तास दीड हजार भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाप्पाचे दर्शन भाविक घेऊ शकणार आहेत. ज्यांना क्युआर कोडमार्फत दर्शनासाठी स्लाॅड मिळाली नाही ते भाविक बाहेरुन दर्शन घेताना बघायला मिळत आहेत.  

माघी गणेश जयंतीनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांकडून सिद्धीविनायक मंदिर परिसरात रांगा

माघी गणेश जयंतीनिमित्तानं बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांकडून सिद्धीविनायक मंदिर परिसरात रांगा लागल्याचं चित्र आहे. कोरोनाची परिस्थिती कायम असल्यानं क्युआर कोड मार्फतच भाविकांना दर्शनाची सोय सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सोय करण्यात आली आहे. प्रति तास एक हजार भाविक दररोज बाप्पाचे दर्शन घेत असतात मात्र आज प्रति तास दीड हजार भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत बाप्पाचे दर्शन भाविक घेऊ शकणार आहेत. ज्यांना क्युआर कोडमार्फत दर्शनासाठी स्लाॅड मिळाली नाही ते भाविक बाहेरुन दर्शन घेताना बघायला मिळत आहेत.  

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

1. पुण्यातल्या येरवड्यात बांधकाम सुरु असलेल्या मॉलचा स्लॅब कोसळला, लोखंडी जाळीखाली अडकून 7 मजुरांचा जागीच मृत्यू


2. असदुद्दीन ओवेसींवर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक, ओवेसींच्या वक्तव्यामुळं नाराज झाल्यानं हल्ला केल्याचा जबाब


3. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंच्या जामिनाचं काय होणार याकडे लक्ष, पीए राकेश परब आणि राणेंची समोरासमोर चौकशी


4. दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकरांचा माफीनामा, गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही


5. जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले; पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


6. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द


Central Railway Jumbo Megablock: मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 100 हून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 


7.बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या उद्गाटन समारोहावर भारताचा बहिष्कार, आक्रमक पवित्रा


8. फोन पे अॅपच्या नावाखाली देशभरातील 14 ज्वेलरी शॉपसह 32 हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक 
 
9'गोमूत्राचे डोस घेऊन या', TMC खासदार महुआ मोईत्रा यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, ट्वीट व्हायरल


10 ISISच्या म्होरक्यानं कुटुंबासह स्वत:ला बॉम्बनं उडवलं; अमेरिकेचे राष्ट्रपती बायडन यांनी 'ऑपरेशन' लाईव्ह पाहिलं!


ISIS : आयएसआयएसचा  (ISIS) प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी  (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) अमेरिकेच्या सशस्त्र दलाच्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अल कुरेशीने त्याच्या कुटुंबासह स्वत:ला बॉम्बस्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान कुरेशीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मिशनमधील सर्व अमेरिकन सैनिक सुखरूप परतले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण ऑपरेशन अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाईव्ह पाहिले.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha






 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.