Maharashtra Breaking News 30 March 2022 Highlights : केंद्रापाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2022 05:49 PM
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गोपाळ नीलकंठ दांडेकर- किल्ले पाहिलेला माणूस' हा माहितीपट प्रदर्शित होणार

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोपाळ नीलकंठ दांडेकर- किल्ले पाहिलेला माणूस हा माहितीपट पुण्यासह देशभरात प्रदर्शित करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं या माहितीपटाची निर्मिती केली आहे. मराठीतील अग्रगण्य कादंबरीकार आणि दुर्गभ्रमंतीकार गो. नी. दांडेकर यांनी आपल्या आयुष्यात गडकिल्ले ही तीर्थक्षेत्रे मानली आणि संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंतीमध्ये झोकून दिलं होतं. किल्ले-दुर्गभ्रमणगाथा, दुर्गदर्शन आणि शिवतीर्थ रायगड अशी नितांतसुंदर पुस्तकंही त्यांनी लिहिली. या पुस्तकांमधून गडकिल्ले कसे पाहावेत याचं त्यांनी सर्वसामान्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळं गडकिल्ले ही स्फूर्तिस्थानं आहेत आणि त्यांचं जतन संवर्धन हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, या दृष्टिकोनातून गोनीदांवर माहितीपट बनवण्यात आला आहे. पुण्यातल्या एस. पी. कॉलेजमधील लेडी रमाबाई  हॉलमध्ये 2 एप्रिल म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत हा माहितीपट विनामूल्य दाखवण्यात येईल.

Maharashtra Government hike DA: केंद्रा पाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार; तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला

Maharashtra Government hike DA:   केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट देताना सरकारने तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. 

Maharashtra Government hike DA: केंद्रा पाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार; तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला

Maharashtra Government hike DA:   केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट देताना सरकारने तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. 

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला

केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांवर गेला आहे. महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 


 

Mahavitaran News : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी, मीटर काढल्या प्रकरणी दिली धमकी

Mahavitaran News :  भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी, मीटर काढल्या प्रकरणी दिली धमकी

वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करावी 'नाईट ड्यूटी', संजय पांडेंचा आदेश

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवीन आदेश जारी केला आहे. आता वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही करावी लागणार 'नाईट ड्युटी'. 15 दिवसांतून एकदा पोलीस सहआयुक्त करणार नाईट ड्युटी. तर अप्पर पोलीस आयुक्त 10 दिवसांतून एकदा करणार नाईट ड्युटी. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आलाय.

BJP : भाजपची महत्त्वाची बैठक सुरू, फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते हजर

थोड्याच वेळात भाजपची प्रदेश कोअर कमिटीची बैठक सुरू होईल. या बैठकीला आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुठे, रवींद्र चव्हाण पोहोचले आहेत. थोड्याच वेळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार ही सहभागी होतील. भाजपा स्थापना दिवसानिमित्त याने सहा तारखेनंतर राज्यभरात सेवा अभियान राबवले जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे. याशिवाय सध्याच्या राजकीय घडामोडी यावरही बैठकीत चर्चा होईल.

सांगली महापालिकेचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प महासभेपुढे सादर
सांगली महानगरपालिकेचा 2022-23 चा अर्थसंकल्प आज महासभेपुढे सादर झाला. स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांनी महासभेपुढे कोणतीही करवाढ नसलेला हा बजेट मांडला. यापूर्वी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी आणि आयुक्त नितीन कापडणीस ई-बाईकवरुन बजेट सादर करण्यासाठी महापालिका मुख्यालयात पोहोचले. या बजेटमध्ये मनपा शाळेतील पाचवी पास आणि 60 टक्के गुण असणाऱ्यांना सावित्रीबाई फुले प्रोत्साहन बक्षीस योजने अंतर्गत सायकल वाटप, मनपा क्षेत्रातील एक मुलगी अथवा दोन मुलीच्यांवर ऑपरेशन करणाऱ्या दाम्पत्यास मा.सिंधुताई सपकाळ कन्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपये ठेव पावती योजना आणि मनपा क्षेत्रातील आशा वर्कर यांना सायकल देणे अशा प्रमुख बाबी या बजेटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.
Angadia extortion case: अंगडिया खंडणी प्रकरणी सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Angadia extortion case : अंगडिया खंडणी वसुली प्रकरणी निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. खंडणी वसुली प्रकरणात आरोप झाल्यापासून सौरभ त्रिपाठी फरार आहे, 

Aurangabad : डीटीडीसीच्या कुरियर कंपनीवर कारवाई, 37 तलवारी, 1 कुकरी जप्त

Aurangabad : डीटीडीसीच्या कुरियर कंपनीवर कारवाई, कुरियर पार्सलमधून तलवारी जप्त, 37 तलवारी, 1 कुकरी जप्त, कुरियर कुठून आलं, कुणी मागवलं याचा पोलीसांकडून तपास सुरू

Aurangabad News :DTDC कुरियर कंपनीकडून आलेल्या 37 तलवारी जप्त, औरंगाबाद पोलिसांनी केली कारवाई

Aurangabad News : DTDC कुरियर कंपनीकडून आलेल्या 37 तलवारी आणि एक कुकरी पोलिसांनी जप्त केली. औरंगाबाद क्रांती चौक पोलिसांनी ही कारवाई केली. यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर अशाच दोन वेळा तलवारी मागवण्याचे प्रकरण समोर आलं होतं.

मोदींना शह देण्याची रणनीती? बिगर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता

एकीकडे शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं केला असताना पवार मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना एकत्र येण्यासाठी पत्र लिहून आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी नेत्यांची बैठक शरद पवार मुंबईत आयोजित करू शकतात असं सूत्रांकडून कळतंय. 

Crime News : पेट्रोल दर वाढतच पेट्रोल चोरीला सुरुवात; उल्हासनगरची घटना सीसीटीव्हीत कैद

पेट्रोल दरवाढ झाल्यानं पेट्रोलचोरांचा सुळसुळाट. उल्हासनगर मध्ये पेट्रोलचोरीच्या घटनांमध्ये वाढ. पेट्रोल चोर सीसीटिव्हीत कैद.

Kolhapur News : कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथं दहावीचा पेपर फुटला, 500 रुपयांना पेपरची विक्री

Kolhapur News : कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथं दहावीचा पेपर फुटला असून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा पेपर फुटल्याने खळबळ उडाली. 500 रुपयांना पेपरची विक्री होत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. 

Hydrogen Car : देशातल्या पहिल्या हायड्रोजन कारमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संसदेत

Hydrogen Car : देशात आज पहिल्यांदाच ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी कार धावली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कारमधून आज संसदेत दाखल झाले. जगभरात वाढत्या प्रदूषणावर हायड्रोजन इंधन हा पर्याय मानला जातो.. तसंच सध्या मगाललेल्या इंधनदरावरही हा उत्तम पर्याय असल्याचं बोललं जातंय. या इंधनासाठी प्रति किलोमीटर 2 रुपयांचा खर्च येईल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

पेट्रोल दर वाढताच पेट्रोल चोरीला सुरुवात, उल्हासनगरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उल्हासगनर : पेट्रोलच्या किंमतीत वाढ होत असताना आता चोर पेट्रोल चोरीकडे वळले आहेत. पेट्रोल चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. उल्हासनगर कॅम्प 3 च्या गणेश नगर ओटी सेक्शन भागात रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या एक दुचाकीतील पेट्रोल कॉकचा पाईप काढून एका अज्ञात चोराने त्यातून पेट्रोल चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या चोरांचा शोध सुरु केला आहे.

Nanar Refinery : नाणार रिफायनरी प्रकल्पसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं थेट पंतप्रधानांना पत्र

Nanar Refinery : रिफायनरी च्या प्रकल्पावरून आता नवीन आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 14 फेब्रुवारी 2000 22 रोजी पत्र लिहिल्याची माहिती आहे. त्या पत्रात त्यांनी रिफायनरी साठी लागणारे जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंद्रासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या पत्रामध्ये उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Petrol Diesel Price : मुंबईत सलग नऊ दिवसांत आठवी वाढ, मुंबईत पेट्रोलचे दर 115.88 रुपये प्रति लिटरवर

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Petrol Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी महागलं, नऊ दिवसात आठव्यांदा वाढले इंधनाचे दर


Petrol Diesel Price Today : देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ होणार आहे. 22 मार्चपासून देशात इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.01 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 रुपये प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी इंधन दरवाढ आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगनाला भिडली असताना दुसरीकडे इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.


इंधन दरवाढीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण –
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर मौन सोडलं. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे.  अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, 2010-11 पासून  2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेस साठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केलेत. 


Dr. Babasaheb Ambedkar : चैत्यभूमीवर लगबग, यंदा महामानवाची जयंती उत्साहात होणार साजरी


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे जयंती साधेपणाने साजरी करण्यात येत होती. मात्र यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहाने पण आरोग्याची काळजी घेऊन साजरी करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र आरोग्याच्या नियमांचे पालन करून हा जयंती उत्सव आपण उत्साहाने साजरा करूयात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहयाद्री अतिथीगृह येथे मंगळवारी आयोजित बैठकीत सांगितले. 


चैत्यभूमीवर विविध कार्यक्रम


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आवश्यक ते परिपत्रक गृह विभागाच्यावतीने लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या तयारीसंदर्भात मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला हजेरी लावली. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढू शकते या धर्तीवर प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.