एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates 30 July 2022 :उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Live Updates 30 July 2022 :उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

30th July 2022 Important Events : जुलै महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 30 जुलै. संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 30 जुलैचे दिनविशेष.

30 जुलै : International Friendship Day

संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

1962 : ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे 8,030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

1994 : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: 8 ऑगस्ट 1926)

सन 1909 साली अमेरिकन वैमानिक आणि शास्त्रज्ञ राईट बंधू (Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.

सन 1928 साली पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.

महत्वाच्या बातम्या : 

19:12 PM (IST)  •  30 Jul 2022

उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप, मुंबई उच्च न्यायालयात याचिका

उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप घेण्यात आला असून या संबंधीची विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे. शेख इस्माईल मसूद शेख व इतर 16 जणांनी मंत्रिमंडळाच्या 16 जुलै 2022 च्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतराच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ऍड. सतीश बी. तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील दोन शहरांचा प्रामुख्याने नावे बदलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या या घेतलेल्या दोन्ही निर्णयांना आव्हान देण्यात आलेले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नावाचा विरोध करणारी याचिका यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत अक्षेप काय आहे ?

हा राजकीय हेतूने निर्णय आहे

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे याअगोदर 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने 2001 साली रद्द केला. राज्य शासनाने घेतलेला सदर नामांतर निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. तसेच नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असे याचिकेत नमुद केले आहे.

या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी 16 जुलैचा उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर सोमवारी 1 ऑगस्ट रोज़ी सुनावणी साठी ठेवण्यात आली आहे.

18:57 PM (IST)  •  30 Jul 2022

इतके दिवस गप्प का बसलात? - केदार दिघेंचा शिंदेंना सवाल

मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, असे केदार दिघे म्हणाले. 

18:39 PM (IST)  •  30 Jul 2022

राज्यपालातील व्यक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा अवमान: एकनाथ खडसे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेले वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा अवमान, राज्यपालांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

18:36 PM (IST)  •  30 Jul 2022

सिनिअर तिकिट तपासकाने रेल्वेमध्ये साप पकडून प्रवाशांचा जीव वाचवला

वसई रेल्वे स्टेशनच्या सिनिअर तिकिट तपासकाने रेल्वेमध्ये साप पकडून प्रवाशांचा जीव वाचवला आहे. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी ञिवेंद्रम निज्जामुद्दीन या ट्रेन क्रमांक २२६३३ मध्ये कोच क्रमांक एस-५ येथील बोगी क्रमांक १८१३१९ यात केरळवरुनच एक साप ट्रेनमध्ये शिरला होता. माञ तो सापडत नव्हता. गाडी कोजी कोट या रेल्वेस्टेशनवर सुमारे अर्धा तास थांबवण्यात आली होती. माञ तेव्हा ही साप सापडला नाही. सायंकाळी गाडी वसई स्टेशनला आल्यावर एका प्रवाशांने ट्रेनमध्ये साप बघितल्याच सांगितलं. स्टेशन व्यवस्थापक एच.एम. मीना यांनी ट्रेनमध्ये  पाहणी केल्यावर, सिनिअर तिकिट तपासक सुरेश कुमार यांनी सापाला सुखरुप बाहेर काढण्याच आश्वासन दिलं. त्यांनी लोखंडी रॉडच्या साहय्यानं सापाल ट्रेनमधून सुरक्षीत बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. सुरेश कुमार हे बिहार राज्यातील पिरा गांवचे रहिवाशी असून, लहानपणा पासून ते गावात साप पकडत असल्याने त्यांना साप पकडण्याची माहिती होती. त्याचा त्यांना यावेळी उपयोग झाला. साप पकडल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांचा जीव भांडयात पडला.

17:51 PM (IST)  •  30 Jul 2022

बीड जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या 178 कामांना स्थगिती विरोधात हायकोर्टात याचिका

सत्ता संघर्षाच्या लढाईत अस्तित्वात आलेलं सरकार पहिल्या सरकार चे काम रद्द करत हे काही नवीन नाही याच रद्द झालेल्या कामावरून बीड जिल्हा नियोजन समितीने आता कोर्टामध्ये धाव घेतली असून बीड जिल्ह्यातील स्थगिती दिलेल्या 178 कामा संदर्भात सरकारला 5 ऑगस्ट पर्येंत आपलं म्हणणं मांडायचं आहे..

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget