Maharashtra Breaking News 3 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूरः BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध मर्यादित षटकांचे सामने सप्टेंबर 2022 मध्ये होणार आहेत. यंदा मोहाली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्याचे यजमानपद भूषवणार आहे. तर नागपूर आणि हैदराबाद येथे अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळला जाईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश, 293 उमेदवारांवरती कारवाई केली जाणार आहे.
सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहारामात सायबर स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्या असे निष्पन्न की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचे दिसून आले. म्हणजे प्रत्यक्षात ते असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःस पात्र करून घेतलेले आहे.
नागपूरः बाजारगाव येथील विनोद बाजनघाटे यांच्या घरावर आज (बुधवारी) वीज पडली. त्यामुळे घराचा एक भाग पूर्ण कोसळला. यासोबतच घरातील वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. तसेच बाजारगावा जवळ असलेल्या सातनवरी (पादरी खापा) येथील उज्वला सुरेश थुटूरकार ह्या स्वतःच्या शेतात भेंडी तोडत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संस्थानचे आजी-माजी विश्वस्त थेट जुगार खेळताना रंगेहात अटकेत आलेत. त्यांच्यासह देहू नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविकेच्या पतीसह सहवीस जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईनंतर वारकरी सांप्रदायामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
NIA ने अमरावती उमेश कोल्हे खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. कोर्टाने दोन्ही आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत NIA कडे ट्रान्झिट रिमांड दिला आहे. NIA या आरोपींना मुंबईत आणणार आहे.
एनआयएने न्यायालयाला सांगितले की उमेश कोल्हेच्या हत्येनंतर आरोपी मुन्सिफ अहमद रशीदने आरोपींना अमरावती येथे लपण्याची व्यवस्था केली होती. जेथे अनेक आरोपी काही दिवसांपासून लपले होते.
दुसरीकडे, अब्दुल अरबाज सलीम हा मुख्य आरोपी इरफान शेखचा ड्रायव्हर असून, त्याने इरफान शेखच्या सांगण्यावरून हत्येसाठी पैशांची व्यवस्था केली होती.
एनआयए त्यांना ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणणार असून त्यांना एनआयए कोर्टात हजर करणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील भाऊ साहेब माने कृषी विद्यालयातील ऐका प्राध्यापकांचा मृतदेह दिग्रस जवळच्या पुलाखाली आढळल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. या घटनेबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहे. सचिन वसंत देशमुख अस मृत प्राध्यापकांचे नाव आहे.
मुंबईतील समतानगर पोलिसांनी बाईक चोर भावोजी आणि मेहुण्याला अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. समता नगर पोलिसांनी या भावोजी आणि मेहुण्याला दादरच्या स्वामी नारायण मंदिराबाहेरून अटक केली आहे. हे दोघे मुंबई भंडाऱ्यामध्ये जेवून बाईकची रेकी करायचे. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईतून बाईक चोरायचे आणि या बाईक कमी किमतीला जालना आणि औरंगाबाद येथे नेऊन विकायचे. पोलिसांनी या जोडीला अटक केली असून त्यांच्याकडून 9 बाईक जप्त केल्या आहेत.
पत्रा चाळ प्रकरणी अटक करण्यात असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना आज ईडी मेडिकलसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं आहे. उद्या ईडी संजय राऊत यांना कोर्टात हजर करणार आहे.
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी तपासासाठी बुधवारी रात्री NIA पथकं अमरावतीत दाखल झाली आहे. या प्रकरणात NIA कडून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये एक वाहन चालक आहे, हा उमेश कोल्हे हत्येचा मुख्य आरोपी इरफान खान यांचा ड्रायव्हर असल्याचं समोर येत आहे. तर दुसरा आरोपी हा इरफान खान यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे..अजूनही NIA ची टीम अमरावती शहरातच असून तपास सुरु आहे. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.10 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,580 रूपयांवर आला आहे, मंगळवारी हा दर 51,410 रुपये होता. तर, एक किलो चांदीचा दर 57,610 रुपये आहे. बुधवारी एक किलो चांदीचा दर 58,020 रूपये होता. यावरून सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसतंय. तुमच्या शहरातील आजचे सोने-चांदीचे काय आहेत ते जाणून घ्या.
Shiv Sena Meeting : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (3 ऑगस्ट) शिवसेनेच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आज दुपारी एक वाजता बैठक पार पडेल. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी संदर्भात शिवसेनेची अधिकृत भूमिका काय असावी या संदर्भात चर्चा होणार आहे.
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील करंजे गावात गव्यांच्या कळपाकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आताच भात लावणी केलेल्या शेतात गवे पिकं खाऊन तसेचं पायाने तुडवून नुकसान करत आहेत. या गव्याच्या कळपाला हुसकावून लावलं तरी देखील पुन्हा शेतात येतात. त्यामुळे वनविभागाने याकडे वेळीच लक्ष घालून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसंच गव्यांनी शेतात येऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Mumbai News : महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. बोरिवली पूर्व राजेंद्र नगर डिस्कव्हरी कंपनी ऑप हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगमध्ये राहणारे मुकेश प्रकाश शर्मा यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यासोबत आरोपीने आधी रोमँटिक चॅट केलं, मग अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल केलं. सुशांत विजय तळसिरकर (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने शर्मा यांना मेसेज आणि फोटो शेअर न करण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून, त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याचाही तपास कस्तुरबा मार्ग पोलीस करत आहेत.
मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवसेनेच्या वाटेवर
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
हाके यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी वर्णी
शिवसेनेतील अरविंद सावंत विनायक राऊत यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आज शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय
भारतात बेरोजगारीचा दर जुलैमध्ये 6 महिन्यांच्या निच्चांकी पा
मान्सूनमध्ये कृषी क्षेत्रातील
जून महिन्यात 7.8 टक्क्यांच्या
ग्रामीण भारतातील बेरोजगारीचा द
जून महिन्यात ग्रामीण भागात बे
महाराष्ट्रात कसा आहे बेरोजगारी
जुनच्या तुलनेत जुलै महिन्यात म
मार्च 2022 - 4 टक्के
एप्रिल 2022 - 3.1 टक्के
मे 2022 - 4.1 टक्के
जून 2022 - 4.8 टक्के
जुलै 2022 - 3.7 टक्के
Pandharpur News : पंढरपूरमध्ये एका मालगाडीने चार जणांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे चारही जण मजूर असून ते मूळचे बिहारचे असल्याचं कळतं. हे चारही मजूर पंढरपूर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर बसले होते. त्यावेळी मालगाडीने त्यांना उडवल्याने दुर्घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. हे चौघेही रुळावर दारु पित असल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला असून जवळच दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. दोन जखमींना उपचारासाठी सोलापूरमध्ये हलवले आहे. यापैकी एक मजुराचं नाव सोनू यादव आहे.
11th Admission : ऑनलाइन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळाल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत.
विदर्भ आणि मराठवाडात आलेल्या पूराची अजित पवार यांनी 29 जुलै ते 31 दरम्यान पाहणी केली. अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीत मिळणार आहेत. सरन्यायाधीश रमण्णा (N. V. Ramana) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंना या प्रकरणात काय काय घटनात्मक मुद्दे आहेत याचा तपशील द्यायला सांगितला होता. दोन्ही बाजूंना 27 जुलैपर्यंत आपापले मुद्दे द्यायचे होते. त्यानुसार हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे सोपवण्याची गरज आहे की नाही याचा विचार सर्वोच्च न्यायालय आज करणार आहे.
Nancy Pelosi Taiwan Visit : चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू....
तैवानच्या मुद्यावरून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?
चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला आहे.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाची सुनावणी
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघाला कलाटणी देणारी महत्वाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. या प्रकरणी 20 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत 1 ऑगस्टला पुढची सुनावणी ठरली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन, मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर यावेळी सुनावणीची शक्यता आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या पीठापुढे सुनावणी होणार आहे.
विरोधी पक्षनेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
विदर्भ आणि मराठवाडात आलेल्या पूराची अजित पवार यांनी 29 जुलै ते 31 दरम्यान पाहणी केली. अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा पुरेशी मदत मिळाली नाही. ही मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत.
ऑनलाईन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार
ऑनलाइन अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळाल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत
राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर
काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी कर्नाटकाती दोन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -