Maharashtra Breaking News LIVE Updates : Sangli : सांगली येथील आष्टा नजीक गाताडवाडी येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 26 Mar 2022 06:52 PM
Kokan Rain : तळकोकणात अवकाळी पाऊस

कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हयात सर्वत्र ढगाळ वातावरण असून यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.


 

Sangli : सांगली येथील आष्टा नजीक गाताडवाडी येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Sangli : सांगली येथील आष्टा नजीक गाताडवाडी येथे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण कराड मलकापूर येथील आहेत.


मृत झालेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे : 


अधिकराव पोळ, सुषमा पोळ, गीता पोळ, सरिता पोळ, समृध्दी पोळ 

Parbhani : परभणीत सेवानिवृत्त विद्युत कर्मचाऱ्याने विद्युत खांबालाच घेतला गळफास

सेवानिवृत्त विद्युत कर्मचाऱ्याने विद्युत खांबालाच गळफास घेतला आहे. परभणीच्या पाथरीत ही धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून विद्युत कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

Ulhasnagar : उल्हासनगरच्या जपानी बाजारातील दुकानाला भीषण आग

उल्हासनगरच्या जपानी बाजारातील दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीत दुकान जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

Belgaum Rain : बेळगाव आणि परिसरात पावसाची हजेरी

अवकाळी पावसाने बेळगाव आणि परिसराला झोडपून काढले आहे.

‘सीएनजी’ होणार स्वस्त, 1 एप्रिलपासून लागू होणार नवे दर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणेनंतर ‘सीएनजी’वरील व्हॅट कपातीची वित्त विभागाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार ‘सीएनजी’वरील व्हॅट 13.5 ऐवजी आता 3 टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार. हे नवीन दर 1 एप्रिलपासून लागू होणार.

Chandrapur : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 'W' वाघिणीचा बछड्यांना दूध पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल

Chandrapur : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा व्हिडिओ व्हायरल. देवाडा बफर जंगलात तापमानाने लाही लाही झालेली 'W' नामक वाघीण पाण्यात आहे. पाण्यात पहुडलेल्या या वाघिणीबरोबर तिचे तीन बछडे आहेत. या तिन्ही बछड्यांना ही वाघीण मायेने दूध पाजत आहे. ताडोबातील व्याघ्र सफरीचा हंगाम जोरावर असताना कोअर आणि बफर भागात होणाऱ्या व्याघ्रदर्शनाने पर्यटक आनंदी झाले. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीत टोल चालकांकडून लूट, ओला-उबेर चालकाचा आरोप

वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहन जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आली. पण या प्रसंगाचा फायदा घेत टोल चालकांकडून पैसे लाटले जातायेत. ओला-उबेर चालकाने हे वास्तव व्हिडीओद्वारे समोर आणलय. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर टोल दिला असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही सक्तीने टोल वसूल केला जातोय, असा आरोप या चालकाने व्हिडिओत केलाय. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकल पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली  आहे. परिणामी मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आलेली आहे. मात्र तिथं ही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झालीये. गेल्या सहा तासंपासून प्रवासी ताटकळत आहेत.

Pune : अनर्थ टळला! पुणे-नाशिक महामार्गावर छोट्या हत्तीचा अपघात होता-होता टळला

Pune : पुण्याच्या मंचरमध्ये मोठा अनर्थ होता-होता टळला आहे. छोटा हत्ती अचानकपणे रिव्हर्समध्ये पुणे-नाशिक महामार्गावर आला. तेव्हा गाडीत चालकही नव्हता. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. चालकाने हॅन्डब्रेक लावला नव्हता. शिवाय गिअरमध्ये ही गाडी नव्हती. त्याच्या या चुकीमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला. महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांमधून अन् पादचाऱ्यांच्या बाजूने हा छोटा हत्ती निघून गेला. शेवटी एक व्यक्ती गाडीत घुसला आणि त्याने गाडीवर ताबा मिळवला. छोट्या हत्तीमध्ये लोखंडी वस्तू होत्या, त्याचा धक्का वाहन अथवा पादचाऱ्यांना लागला असता तर एखाद्याच्या ते जीवावर बेतलं असतं. सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही. मंचरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही घटना घडली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर केमिकल टँकर पलटी, दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना घडली. त्यामुळं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर केमकील सांडल्यानं मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने वाहनांची रांगा. मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे सोडण्यात आली आहे. 

Bhandara : उधारी दिलेले तिनशे रुपये परत देत नसल्यानं लाकडी दांडयाने वार करीत एका 48 वर्षीय इसमाचा खून

Bhandara : उधारी दिलेले तिनशे रुपये परत देत नसल्याचे कारण देत लाकडी दांडयाने वार करीत एका 48 वर्षीय इसमाचा खून केल्याची धक्कादायक  घटना भंडारा शहरात घडली असून पैशापुढे जीवाचे महत्वच उरले नसल्याचे पुन्हा ह्या घटनेने समोर आले आहे। सतीश  रामटेके वय 48 वर्षीय असे मृतकाचे नाव असून अमन  सोनेकर वय 24 वर्ष  असे आरोपीचे  नाव असून आरोपी अटकेत आहे. 

पार्श्वभूमी

का वाढतायंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कारण...


दिवसंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या पाच दिवसांत देशात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांची वाढ झाली आहे.  वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.
 
रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या 


एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतात 80 टक्के तेल आयात केले जाते. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर हहोत आहे. युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या असून, त्याबाबत आपण काहीही करु शकत नाही. स्वदेशी ऊर्जा निर्मितीक्षमता विकसीत करण्याच्या गरजेवर भर देत इंधन स्वतः तयार करण्याची गरज असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. 


प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळला


 बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. मात्र या निकालाल हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. डिसेंबर 2017 मध्ये नागपूर अधिवेश सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला?, साल 2017 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकरांनी 25 हजार 700 रूपयांची मजूर घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाचवेळी दरेकर दोन्ही ठिकाणी उपलब्ध कसे होते?, त्यामुळे यात प्रथमदर्शनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचं कोर्टानं आपल्या निकालांत स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं प्रवीण दरेकरांच्या याचिकेला जोरदार विरोध करत फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली होती. काही वर्षांपूर्वी मजूरी करणा-या दरेकरांकडे कोट्यावधींची मालमत्ता कशी आली?, याचीही चौकशी होणं गरजेचं असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी मागणी केली होती.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.