Maharashtra Breaking News 24 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jul 2022 05:04 PM
मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी मुंबईसह नागपुरात आंदोलन  

मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी मुंबईसह नागपुरात आंदोलन केले आहे. अजनी वन परिसरात आहे हे आंदोलन करण्यात आले. 

एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. 
अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पेट्रोल डिझेल प्रमाणे सीएनजीचा दर सुद्धा कमी करा, रिक्षा-टॅक्सी चालकांची राज्य सरकारकडे मागणी
राज्य सरकारने पेट्रोल पाच रुपयांनी डीझेल तीन रुपयांनी कमी केल्यानंतर आता सीएनजीचे दर कमी करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालकांकडून केली जात आहे.

 

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेल सीएनजी एलपीजी यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

त्यानंतर राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या मात्र हाच निर्णय सीएनजी बाबत घेतला नाही.

 

मुंबई शिवाय राज्यात लाखो रिक्षा टॅक्सी या सीएनजी वर चालतात...आज सीएनजी 80 रुपये वर प्रतीकिलो झालं आहे जे आधी पन्नास- साठ रुपयांपर्यंत दर होते.

.

त्यामुळे सीएनजी मध्ये झालेली वाढ ही रिक्षा टॅक्सी चालकांना परवडणारे नसून यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी केली जाते.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दख़ल घेतली जाईल.  पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे.

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात,


- कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचा उपक्रम,


- यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे,


- ही बस विद्यापीठाच्या मुख्यद्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते

दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा सतर्क

Monkeypox Cases India : दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.





एलपीजी गॅस सिंलिंडरवरील सबसिडी रद्द होण्याची शक्यता

सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आता एलपीजी गॅस सिंलिंडरवरील (LPG Cylinder) सबसिडी (LPG Subsidy) म्हणजेच गॅस सिलिंडरवरील अनुदान रद्द करण्याच्या विचारात आहे. एलपीजी गॅसवरील सबसिडीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होतो, पण सरकारनं गॅसवरील सबसिडी रद्द केल्यास नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. येत्या काळात सरकार एलपीजी गॅस सिलिंडरवरील सबसिडी रद्द करु शकते. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात, 15 ते 20 प्रवासी जखमी

सोलापूर - गाणगापूर बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात, अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी, जवळपास 15 ते 20 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलंय, रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांना देखील पाचरण करण्यात आलं


सकाळी 10.30 च्या सुमारास अपघात झाला असून कारण अद्याप समोर नाही

आरे मेट्रो कार शेडला विरोध करणारे आंदोलन आणखी तीव्र

मेट्रो आरे कारशेडच्या कामावरची स्थगिती गुरुवारी राज्य सरकारने उठवल्याचा निर्णय घेतल्यानंतर आरे मेट्रो कार शेडला विरोध करणारे आंदोलन आणखी तीव्र झालं आहे आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी सुद्धा आता या आंदोलनात उतरली आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमी प्राणीप्रेमी आणि त्यात राजकीय विरोधीं पक्षसुद्धा आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे चित्र आहे. या रविवारी सुद्धा आरे येथे आंदोलन करण्यात येत आहे

राज्यभरातील हजारो शिवभक्त कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर दाखल

राज्यभरातील हजारो शिवभक्त कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर दाखल झाले आहेत...गडावर घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी, खुलेआमपणे होणारे मद्यप्राशन आणि होणारी बुरुजांची पडझड याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत आहे. याविरोधात पुणे, सातारा, सांगली, कर्नाटकमधून शिवभक्त मोठ्या संख्येने पन्हाळ्यावर दाखल झाले आहेत...

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात पहाटेच्या सुमारास स्विटहोमसह तीन दुकानांना आग; जीवितहानी नाही

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात पहाटेच्या सुमारास स्विटहोमसह तीन दुकानांना आग; जीवितहानी नाही, सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथील घटना, पुणे महानगरपालिका व पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, किरकटवाडी फाट्याजवळ मुख्य सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या श्रीनाथ स्विट होम व दूध डेअरी या दुकानाला अगोदर आग लागली


गॅस गळती अथवा शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविण्यात येत आहे

देशात कोरोनाबाधित आणि मृत्यूंच्या संख्येत किंचित घट

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली असून कोरोनाबळींची संख्यादेखील 50 टक्क्यांहून अधिक घटली आहे. शुक्रवारी देशात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद आणि 67 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

सातारा : नळावर पाणी भरण्यावरून दोन कुटुंबात भांडण, तलवार आणि कुऱ्हाडीनं हल्ला

साताऱ्यातील कलेढोन येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेला नळावर पाणी भरुन दिले नाही म्हणून दोन कुटुंबात झालेल्या वादावादीनंतर तलवार कुऱ्हाड यासारखी धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर हल्ला करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही जणांच्या हातात तलवारी तर काहींच्या हातात कुऱ्हाडी दिसत आहात. या मारामारीत काही जण जखमी झाले आहेत. तर यातील एकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडूज पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मातोश्रीवरून बोलावणं

नाशिक शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावले आहे. दुपारी बारा वाजता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतले जाईल अशीही चर्चा आहे. 





दापोडी : 7- 8 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

दापोडीत मध्यरात्री 7- 8 जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून वाहनांची तोडफोड केली, यात सहा वाहनांच मोठं नुकसान झालं आहे, दापोडीच्या सुंदर बाग परिसरात घटना घडलीय. सजक नागरिकांनी तीन जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. परंतु, गुंडांना पकडणं पोलिसांचं काम असताना नागरिकांना ते काम करावं लागतं असल्याने पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Neeraj Chopra Live : नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर

Neeraj Chopra Live : नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर, नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला

नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर, नीरज ने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला

नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर थ्रो , नीरज आता चौथ्या स्थानी




नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर थ्रो केला. नीरज आता चौथ्या स्थानी आला आहे. वन पीटर्स 90.46 मीटर थ्रोसह पहिल्या स्थानावर आहे.  





नीरज चोप्रा पाचव्या स्थानावर




वन पीटर्सनं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर भाला फेकला तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला, सध्या तो नंबर एकवर आहे तर नीरज चोप्रा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्याकडे अजून एक संधी आहे.  





नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला




नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला







 

Mumbai Local Mega Block : मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो (Mumbai) रविवारी (24 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेवर  रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर भायखळा - माटुंगा अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. अप जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 पासून दि. रविवारी पहाटे 4.05 पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. तर डाऊन मार्गावर रविवारी मध्यरात्री 12.40 ते पहाटे 5.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा फटका

Maharashtra Rain Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे पालघर या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. तसेच रत्नागिरी, वर्धा, बुलढाणा आणि लातूर जिल्ह्यातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.  हवामान विभागानं कालपासून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा व्यक्त केला आहे. दरम्यान, आणखी पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Aarey Protest : 'आरे वाचवा' देशभरात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन

Aarey Protest : आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची (Metro Car Shed Project) स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठवली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का देत अखेर आता पुन्हा आरेमध्ये कारशेड (Aarey Car Shed) करण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानं कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. आरेतच मेट्रो कारशेड (Metro Car Shed) होणार, असं आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून आरे मेट्रो कारशेडबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. आरे वाचवा मोहिमेसाठी आज संपूर्ण देशभरात आंदोलनं पार पडणार आहेत. मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), वाराणसी (Varanasi), हैदराबादसारख्या प्रमुख शहरांत आंदोलनं होणार आहेत. अशात मुंबईतील आरे परिसरातही (Aarey Colony) आंदोलन करण्यात येणार आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Aarey Protest : 'आरे'वरून कुरघोडीचं राजकारण?

Aarey Protest : मुंबईत पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे आणि राजकीय कुरघोडीत अडकलेल्या आरे कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. पर्यावरणाच्या कारणामुळे ठाकरे सरकारनं आरे कारशेडचं काम थांबवलं होतं. त्यानंतर कांजूरमार्ग इथं कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयात पोहोचला होता. पण महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता आरे कारशेडला घातलेली स्थगिती अधिकृतपणे उठवल्यानं तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचं बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


येत्या तीन दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता


पुढचे तीन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात कालही काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती.


WHO कडून मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित


कोव्हिड पॅन्डॅमिकनंतर मंकीपॉबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 75 देशांत मंकीपॉक्सचे 16 हजार रुग्ण आढळले आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळलेत. ही जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.


आज भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार


 देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सामील होण्यासाठी आज दिल्लीला जाणार आहेत. बैठक भाजप मुख्यालयात दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे. मोदी 5 वाजता बैठकीत सामील होतील.


 आज राष्ट्रपती कोविंद यांचं राष्ट्राला संबोधन


 मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल आज संपणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळासाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. तसेच, राष्ट्रपती भवनाची सफर घडवणाऱ्या 3 पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे.


आरे वाचवा मोहिमेसाठी  देशभर आंदोलनं 


आरेतच मेट्रो कारशेड होणार असं राज्य सरकारकडून स्पष्ट केल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. आरे वाचवा मोहिमेसाठी आज संपूर्ण देशात आंदोलनं पार पडतील. मुंबई, नागपूर, वाराणसी, हैदराबादसारख्या प्रमुख शहरात आंदोलनं होणार आहेत. अशात मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन होईल. यावेळी पर्यावरणवादी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात. 


 नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील अंतिम लढत


ऑलिंपिक सुवर्णपदक विजोता नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरी होणार आहे. अमेरिकेत सुरु असलेली ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता सुरु होईल. 


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरी ODI


भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) आज अर्थात रविवारी (24 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असल्याने आता भारताला मालिका जिंकण्यांची संधी असून वेस्ट इंडीजला मालिकेत बरोबरी मिळवण्याची संघी आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.