ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून 'रेरा' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या या इमारतींवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे.


न्यायालयाने आता तीन महिन्यांत या सर्व इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. बिल्डरने, प्रशासनाने आमची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


साडेसहा हजार कुटुंबं चिंतेत


निष्कासनाची कारवाई करण्यात येणाऱ्या 65 इमारतींमध्ये सुमारे सहा ते साडेसहा हजार कुटुंबं राहतात. आपल्या आयुष्याचं भांडवल त्यांनी या घरांमध्ये गुंतवलं आहे. काहींनी घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये कर्ज देखील घेतलं आहे. मात्र आता हे घर अनधिकृत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आपल्या घरांवर कारवाई होणार या चिंतेनंच हजारो कुटुंबांना ग्रासले आहे . 


इतक्या वर्षांनी प्रशासनाला जाग आली का? बनावट कागदपत्र तयारच कसे केले? ते कोणी केले? रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्र देण्यात आले तेव्हा प्रशासनाने ते तपासले नाहीत का? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. आमची लाखोंची फसवणूक झाली आहे. बेघर पण आम्हीच होणार का? आमची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा. आम्हाला बेघर करू नका अशी मागणी आता येथील रहिवाशांनी केली आहे. 


याचिकाकर्त्याने केलेला भंडाफोड


याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून या इमारतींची बेकायदेशीरता उघड केली. बिल्डरांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र मिळवल्याचे समोर आले आहे. यानंतर संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली होती. यामध्ये महापालिका आणि संबंधित बिल्डर हे याला जबाबदार आहेत. त्यांनी या नागरिकांची फसवणूक केली. त्यामुळे त्यांनीच त्या नागरिकांना भरपाई द्यावी अशी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केली. 


कारवाईला सुरुवात, पाणी आणि वीज खंडीत करण्याची प्रक्रिया 


65 मधील सहा ते सात इमारतीवर कारवाई करणयात आली आहे . उर्वरित 58 इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेने या प्रकरणातील सर्व बेकायदेशीर इमारतींच्या रहिवाशांना सुसूत्रपणे सूचना देऊन कार्यवाहीचे नियोजन केले आहे. आगामी कालावधीत या इमारतींवर महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान या इमारती अधिकृत करता येतील का या दृष्टीने जर नागरिकांनी प्रस्ताव दिला तर त्याबाबत देखील विचार करण्यात येईल असे गोडसे यांनी सांगितले.


डोंबिवली पोलिस ठाण्यात खालील बिल्डरांवर गुन्हा दाखल


1) अमरदिप अनंत खांडेकर व इतर


2) श्री.संतोश कुडाळकर वास्तु. व इतर 


3) मयुर एस.देशमुख व इतर 


4) श्री. आषु लक्ष्मण मुंगेष व इतर


5) सरोजिनी कष्णाकुमार मिश्रा व इतर 


6) रंगुबाई सुरेश भोईर व इतर  


7) रंगुबाई सुरेश भोईर व इतर


8) सौ. सिता सदाशिव पाटील व इतर


9) श्री. मधुकर मोतीराम म्हात्रे व इतर 


10)  मिस्टर. शिरीष शंकर चौधरी व इतर 


11)  आनंदी कष्णा म्हात्रे व इतर 


12) श्रीसागर गोपीनाथ भोईर व इतर


13) श्री भोलेनाथ दत्तू म्हात्रे व इतर


14) श्री. दत्तात्रय गजानन पाटील व इतर


15) श्री दिगंबर तुकाराम म्हात्रे व इतर


16) लक्ष्मीबाई सोनू पवार


17) गणेश दिंगबर भोईर व इतर


18) दिनकर काळू म्हात्रे व इतर


19) श्री. सखाराम मंगल्या केणे इतर 


20)   मनोहर नारायण पाटकर व इतर


21) अनिल अभिमन्यू केणे व इतर 


22 ) श्री. गौतम शंकरलालजी माळी व इतर 


23) श्री. अनंत ऊर्फ आनंदा सुदाम म्हात्रे व इतर 


24) श्री सोपान लक्ष्मण पाटील व इतर 


25) श्री बाळाराम गोंविंद भोईर व इतर 


26) श्री देवचंद पांडुर्र कांबळे व इतर


27) श्री पांडुरग मोतीराम म्हात्रे व इतर


28) श्री सिध्दार्थ वासुदेव वासुदेव म्हात्र म व इतर 


29) सुलोचना जयराम केणे व इतर 


30) श्री राजेश रघुनाथ पाटील व इतर


31) श्री भास्कर भागीदास चौधरी 


32) श्रीमती मंजुळा सुदाम भोईर व इतर


33) सौ. चद्रभागा प्रकाश भोईर व इतर


34) प्रदीप साहेब पंढरीनाथ ठाकूर व इतर 


35) श्री लक्ष्मण धर्म केणे व इतर 


36) श्री अनंत गंगाराम पाटील व इतर 


38) अनुसया तुळशीराम चौधरी व इतर
  
39) श्री प्रल्हाद रघुनाथ पाटील व इतर


डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल


1) नकुल वाळकु गायकर व इतर 


2) वसंत हरीश्चंद्र म्हात्रे व इतर 


3) शांताराम मंगल्या जाधव व इतर 


4) रामसुरत गुप्ता व इतर


5) देवचंद पांडुरंग कांबळे व इतर


6) प्रदीप पंढरीनाथ ठाकूर व इतर 


7) चंद्रशेखर एन. भोसले व इतर


8)  प्रसाद जयकर शेट्टी व इतर


9) तुकाराम बाळु पाटील व इतर


10)  अर्जुन जानु गायकर व इतर  


11) अशोक माणिक म्हात्रे व इतर 


12) अरुण प्रताप सिंग व इतर 


13)  सरबन बिंदाचल व इतर


14 ) संजय जोशी व इतर 


15 ) चिराग गजानन पाटील व इतर


16)  महेश जयकरण शर्मा आणि इतर


17) शेवंताबाई चंदू पाटील आणि इतर


18) सौ शांताराम मंगल्या जाधव व इतर 


19) मनोहर काळण व इतर 


20) अनिल दिनकर पाटील व इतर


21) सुभाष नामदेव म्हात्रे व इतर


22) श्रीमती जडावतीदेवी इंद्रजीत व इतर 


23) नरेश भामा पाटील व इतर 


24)  सौ रायबाई दत्तु काळण इतर


25) श्रीमती पार्वतीबाई सुदाम काळण व इतर 


26) शिवसागर गुरुदत्त यादव व इतर