Mohammed Siraj and Travis Head controversy : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड एकमेकांशी भिडले होते. यानंतर आता  सिराजला हेडकडे आक्रमक पद्धतीने हातवारे केल्याने आयसीसीकडून दंड करण्यात आला आहे. पिंक चेंडूने खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये आयसीसीच्या आचारसंहितेत दोषी आढळला. 






वाद कधी झाला?


सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हेड आणि सिराज यांच्यात वाद झाला होता. 140 धावा करून हेड जेव्हा सिराजच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला तेव्हा दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. हेडने सिराजच्या गोलंदाजीचे कौतुक केल्याचे सांगितले, मात्र भारतीय गोलंदाजाने याचा इन्कार करत ऑस्ट्रेलियन फलंदाजाने त्याच्याशी गैरवर्तन केल्याचे सांगितले. या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर प्रेक्षकांनी सिराजला शिव्या घातल्या.


सामन्यानंतर दोघांमध्ये समेट झाला


ट्रॅव्हिस हेडने असेही म्हटले की सिराजने स्तुतीचा गैरसमज केला तर भारतीय वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजावर 'खोटे बोलण्याचा' आरोप करून प्रत्युत्तर दिले. मात्र, सिराज आणि हेड या दोघांनीही ते मान्य केले आणि कसोटी सामन्याच्या शेवटी हा वाद संपवला. हेडने देखील पुष्टी केली की दोन्ही खेळाडूंनी एकमेकांशी बोलले आणि घटना मागे सारून पुढे पाहण्याचे आश्वासन दिले. शतक झळकावणाऱ्या हेडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सिराजला शिव्या घालू लागले


पिंक कसोटीत मोहम्मद सिराजने अप्रतिम यॉर्कर चेंडूने हेडला चकवले आणि क्लीन बोल्ड झाला. यानंतर जाताना हेड काही उद्देशून बोलताच सिराज खूप रागावलेला दिसला. सिराजने हेडकडे बघत त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला आणि काही शब्द सुद्धा बोलला. सिराजकडे बघून तो हेडला शिव्या घालतोय असे वाटले. दोघांमधील हे शाब्दिक युद्ध पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच गोंधळ उडाला आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक सिराजला शिव्या घालू लागले. जेव्हा हेड पॅव्हेलियनमध्ये परत जात होता तेव्हा सर्वांनी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.


इतर महत्वाच्या बातम्या