Corona Updates : कोरोनाबाधित आणि मृत्यूंच्या संख्येत किंचित घट, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजारांवर
Coronavirus Cases in India Today : देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात शनिवारी कोरोना विषाणूच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 279 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना संसर्गात घट झाली असून कोरोनाबळींची संख्यादेखील 50 टक्क्यांहून अधिक घटली आहे. शुक्रवारी देशात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद आणि 67 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
कोरोना रुग्णांसह मृत्यूही घटले
देशात गेल्या 24 तासांत 36 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 67 इतका होता. त्यामुळे देशात कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही घटल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत 18,143 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 32 लाख 10 हजार 522 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत 5 लाख 26 हजार 33 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 24, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/Eyp3Gpp7Nu pic.twitter.com/uPwlIiQCSG
मुंबईत शनिवारी 266 रुग्णांची नोंद
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. शनिवारी मुंबईत 266 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
महाराष्ट्रात 2336 नवीन कोरोनाबाधित
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात दोन हजार 336 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात शनिवारी 2311 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या 14599 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे आणि मुंबईमध्ये आहेत. पुण्यात चार हजार 967 तर मुंबईत एक हजार 865 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.