Maharashtra Breaking News Live 23 September 2022 : वाजत गाजत या पण शिस्तीनं दसरा मेळाव्याला या - उद्धव ठाकरे

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2022 07:26 PM
ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघात, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या अपघातात सहा महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. पुढे निघालेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होते. ट्रॅक्टर चालकाचे मात्र त्याकडे लक्ष नव्हते. अशातच ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाचा दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे दुचाकीस्वार पत्नी अन लहान बाळ खाली कोसळले. तेंव्हाच ट्रॅक्टरचे मागचे चाक बाळाच्या डोक्यावरून गेले. ट्रॅक्टर चालक मात्र तसाच पुढं निघून गेला. मागे जखमी झालेल्या बाळाचा मृत्यू झाला होता.

दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे - उद्धव ठाकरे

दोन गट नाही, शिवसेना ही शिवसेनाच आहे. ती वाढली आहे. परवचा मेळावा हा मुंबईतल्या गटप्रमुखांचा होता. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारला बजावली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायदा सुव्यवस्था राखावी. प्रत्येकवेळी वाईटाचा विचार करु नये. चांगली सुरुवात झाली आहे.  विजया दशमीचा मेळावा... पहिला मेळावाही मला आठवतोय... आजोबांचं भाषण आजही माझ्याकडे आहे.. कोरोनाचा काळ गेला तर ही परंपरा कायम आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष - उद्धव ठाकरे

इतर काय करतील, त्यांचा आपल्याला माहित नाही. पण आपली परंपरा आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहोत.  या दसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आणि जगात राहणाऱ्या बांधवांचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाकडेही त्यांचं लक्ष लागलं होतं. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्साहात या, वाजत गाजत या.. पण शिस्तीनं या... - उद्धव ठाकरे

वाजत गाजत गुलाल उधळत या - उद्धव ठाकरे

शिवसैनिक, शिवसेनाप्रेमींनी उत्साहात दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर येण्याच आव्हान करतो. वाजत गाजत गुलाल उधळत या.. पण शिस्तीनं या.. आपल्या तेजस्वी परंपरेला, तेज्याचा वारस्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका... 

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

हायकोर्टानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये परवानगी दिल्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. 

निवडणुकीच्या तयारीला लागा; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहान 

मुंबई : दसरा मेळाव्याला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये  उत्साह अमाप आहे. पण एकजूट सुद्धा तशी ठेवायची आहे. प्रत्येक महानगरपालिका जिंकायचीच आहे. शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. निवडणुका आल्यानंतर रुसवा फुगवा, गट तट अजिबात करू नका. उमेदवारी फार मोजक्याच लोकांना देता येते. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज त्र्यंबकेश्वर येथील शिवसैनिकांशी संवाद साधला. 

शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाणार, सूत्रांची माहिती

Shinde Gat :  शिंदे गट हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. उद्या पर्यंत याचिका दाखल करणार आहे : सूत्र


 

5 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार 

Dasara Melava : 5 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. 2 ते 5 ऑक्टोबर पर्यंत शिवाजी पार्कचं मैदान वापरण्याची परवानगी शिवसेनेला कोर्टाने दिली आहे. 

शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा; कोर्टाकडून शिनसेनेला परवानगी

शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा होईल आहे. कारण कोर्टाकडून शिनसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.  

दादर पोलिसांचं संख्याबळ पाहाता कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न : कोर्टा

दादर पोलिसांचं संख्याबळ पाहाता कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न असल्याची टिपण्णी कोर्टाने केली आहे.  

मुंबई पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही : कोर्ट 

मुंबई पालिकेला दोन्ही बाजूंच्या दाव्यांची कल्पना होती. 21 तारखेपूर्वी पालिकेने निर्णय का दिला नाही? असा सवाल उपस्थित करत पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरून नाही, अशी टीपण्णी कोर्टाने केली आहे. 

शिवाजी पार्कवर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो : हाय कोर्ट 

शिवाजी पार्कवर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो, अशी टिपण्णी हाय कोर्टाने निकालाआधी केली आहे.  

शिंदे गटाला धक्का, आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली 

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या मागणीला हस्तक्षेप कणारी शिंदे गटाची याचिका हाय कोर्टाने फेटाळली आहे. आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका दाखल केली होती. शिवसेना, शिंदे गट आणि  मुंबई पालिकेचा कोर्टातील युक्तीवाद देखील संपला असून आता थोड्याच वेळात कोर्ट याबाबतचा निकाल देणार आहे.  

Dasara Melava : आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने फेटाळली.

Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारी आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने फेटाळली. यामुळे एकनाथ शिंदे गटाला दणका बसला आहे. 

Dasara Melava Live Updates : शिवसेना नेते अनिल परब हायकोर्टात उपस्थित

Dasara Melava Updates : शिवसेना नेते अनिल परब हायकोर्टात उपस्थित, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगीबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी





Nagar Ashti Railway : नगर-आष्टी पहिल्या प्रवासी रेल्वेला हिरवा झेंडा

नगर-आष्टी पहिल्या प्रवासी रेल्वेला हिरवा झेंडा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाइन हजेरी





Dasara Melava Live Updates : 2016 च्या आदेशात अन्य कुणी परवानगी मागू नये असं लिहिलंय का? हायकोर्टाचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल

Dasara Melava Live Updates : 2016 च्या आदेशात अन्य कुणी परवानगी मागू नये असं लिहिलंय का? हायकोर्टाचा ठाकरे गटाच्या वकिलांना सवाल





Dasara Melava Live Updates : 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा; ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

Dasara Melava Live Updates : यापूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा असायचा, पण साल 2016 नंतर ते मुद्दे उरले नाहीत; 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा; ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद





Dasara Melava Live Updates : केवळ एक व्यक्ती विरोध करतोय म्हणून परवानगी नाकारणं योग्य नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचं सदा सरवणकर यांच्या याचिकेवर उत्तर

Dasara Melava Live Updates : केवळ एक व्यक्ती विरोध करतोय म्हणून परवानगी नाकारणं योग्य नाही, या याचिकेतून किंवा या मेळाव्यातून शिवसेना कुणाची? हे सिद्ध होणार नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचं सदा सरवणकर यांच्या याचिकेवर उत्तर





हे एक खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं, पालिकेनं याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरूनच फेटाळलाय"; बीएमसीच्या वकिलांचा युक्तिवाद

पालिकेच्यावतीनं मिलिंद साठेंचा युक्तिवाद सुरू "राज्य सरकारचा आदेश स्पष्ट करतो की, हे एक खेळाचं मैदान असून ते शांतता क्षेत्रात मोडतं, पालिकेनं याचिकाकर्त्यांचा अर्ज कायद्याला अनुसरूनच फेटाळलाय"; बीएमसीच्या वकिलांचा युक्तिवाद





Shivsena Dasara Melava Live Updates : शिवसेना कुणाची? हा मुद्दा वेगळा असून त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही; ठाकरे गटाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद

Dasara Melava Live Updates : शिवसेना कुणाची? हा मुद्दा वेगळा असून त्याचा दसरा मेळाव्याशी संबंध नाही; ठाकरे गटाचा उच्च न्यायालयात युक्तिवाद


 





Dasara Melava : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही शिवसेनेची परंपरा; ठाकरे गटाच्या वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

Shivsena Dasara Melava : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही शिवसेनेची परंपरा, जर अचानक कुणी दुसरा तिथं त्याच दिवशी मेळावा घेतो म्हणतोय तर सारी प्रक्रीया थांबवणं अयोग्य आहे; ठाकरे गटाच्या वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद


 





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार, फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार, फोटो शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप





Shivaji Park for Dasara Melava: शिवाजी पार्कच्या संदर्भातील याचिकेवर सुनावणी सुरु

शिवाजी पार्कच्या संदर्भातील याचिकेवर याचिकाकर्ते शिवसेनेसाठी कायदेतज्ञ आस्पी चिनॉय बाजू मांडत आहेत. प्रतिवादी मुंबई महापालिकेसाठी कायदेतज्ञ मिलिंद साठ्ये बाजू मांडणार, तर मध्यस्थ म्हणून आलेल्या सदा सरवणकरांसाठी कायदेतज्ञ जनक द्वाकरादास बाजू मांडणार, तिन्ही बाजूंकडनं न्यायालयात वकिलांची तगडी फौज तैनात

फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका

Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार नव्यानं मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस करण्याची शक्यता

मराठा आरक्षण प्रश्ननी महत्त्वाची घडामोड


मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार नव्याने मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस करण्याची शक्यता


संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती


जस्टीस जयंत भोसले यांना मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणुन नेमण्याची संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 


गायकवाड समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टानं फेटाळल्याने मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित


पुन्हा मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस झाल्यास आरक्षणाची वाट मोकळी होईल अशी मराठा समाजाला आशा

फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका, बोरीवलीतील क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप

Mumbai Nwes : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका


बोरीवलीतील क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप


सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप यांची याचिका


सार्वजनिक मालमत्तेवर प्रवेशासाठी शुल्क आकारल्याविरोधात हायकोर्टात याचिका


मात्र ही याचिका इतक्या उशिराने का केली?, हायकोर्टाचा सवाल


एमआरटीपी कायद्याला अनुसरुनच या दांडिया कार्यक्रमाला परवानगी दिली आहे, राज्य सरकारची भूमिका

विजयदुर्ग समुद्र किनाऱ्याजवळ तेलवाहू जहाज बुडालं, पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन

sindhudurg News : सिंधुदुर्गातील विजयदुर्ग समुद्र किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय जलवाहतूक सीमेवर 40 ते 45 वाव या अंतरावर पार्थ हे तेलवाहू जहाज बुडालं आहे. या जहाहावरून डांबर सदृश्य पदार्थाची गळती सुरू आहे. त्यामुळं पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे. समुद्रातील पाण्यात सागरी खेळ खेळू नये, स्कुबा करू नये तसेच या ऑईलचा रिपोर्ट येईपर्यंत मासे खवय्यांनी मासे खाऊ नयेत असे आवाहन बंदर विभागाचे साहाय्यक बंदर निरीक्षकानी केलं आहे.

Nashik News : नाशिक शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक मातोश्रीकडे रवाना, 12 वाजता उद्धव ठाकरेंची घेणार भेट

Nashik News : नाशिक शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मातोश्रीवर निघाले 


बारा वाजता उद्धव ठाकरेंची घेणार भेट


एका माजी नगरसेवकाच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर नाशकात शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता 


डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न 


दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक मुंबईत जाणार

भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा सामना

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा टी20 सामना महाराष्ट्रातील नागपूर शहरात खेळवला जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा दुसरा दिवस

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman)  बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत.  निर्मला सीतारमण या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत.

पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन

तपासयंत्रणांच्या तपासानंतर पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन करणार आहे.  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ  पीएफआयनं आज केरळमध्ये संपाचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यातही आंदोलन करण्यात येणार आहे.

आज पहिल्यांदाच नगर- आष्टी प्रवासी रेल्वे धावणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आज हिरवा झेंडा दाखवणार

बीड आणि नगरवासीयांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावणार आहे.   याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत

Shivsena Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी, महापालिकेकडून दोन्ही गटांना परवानगी नाही

Shivsena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा?, उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे.   तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. आज शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा  दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा यावर निर्णय होणार आहे. तसेच  आज पहिल्यांदाच नगर- आष्टी प्रवासी रेल्वे धावणार आहे. 


दसरा मेळाव्याबाबत शिवसेनेच्या याचिकेवर आज सुनावणी, महापालिकेकडून दोन्ही गटांना परवानगी नाही 


 शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा होणार की नाही? झाला तर तो कोणाचा?, उद्धव ठाकरे गटाचा की शिंदे गटाचा? या प्रश्नाचं उत्तर आज मुंबई उच्च न्यायालय देणार आहे.   तर पालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. 
 


आज पहिल्यांदाच नगर- आष्टी प्रवासी रेल्वे धावणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आज हिरवा झेंडा दाखवणार


बीड आणि नगरवासीयांच्या दृष्टीनं महत्वाच्या नगर ते आष्टी मार्गावर आज पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे धावणार आहे.   याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत


पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन


तपासयंत्रणांच्या तपासानंतर पुण्यात पीएफआयचं आज आंदोलन करणार आहे.  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ  पीएफआयनं आज केरळमध्ये संपाचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यातही आंदोलन करण्यात येणार आहे.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्याचा दुसरा दिवस


भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman)  बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत.  निर्मला सीतारमण या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत.


भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा  सामना


 ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी20 सामने खेळवले जात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा टी20 सामना महाराष्ट्रातील नागपूर शहरात खेळवला जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.