Maharashtra Breaking News 22 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2022 11:21 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीक्षांत सोहळा ऑक्टोबरमध्ये, शरद पवार आणि गडकरींना डी.लीट मानद पदवी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीक्षांत सोहळा ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला जाणार आहे. माजी केंद्रिय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना दीक्षांत समारंभात डी. लीट. मानद पदवी देण्यात येणार आहे. शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा दीक्षांत समारंभात डी. लीट. मान देण्याबाबत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केले अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सोमवारी जाहीर केले आहे.

 कुरियर बॉयला पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करून लूट, नाशिकमधील घटना 

कुरियर बॉयला पिस्तूलचा धाक दाखवत मारहाण करून लूट करण्यात आली आहे. 27 किलो चांदी आणि दुचाकी घेऊन दरोडेखोर पसार झाले. 12 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. चार सराफांच्या चांदीचे पार्सल पुणे आणि औरंगाबादला पाठविण्यात येणार होते. परंतु, त्याआधीच चोरट्यांनी ही चांदी लुटली. नाशिकच्या मध्यवर्ती मेळा बस स्टँड  परिसरातील काल रात्री पावणे बारा वाजता ही घटना घडील आहे.  

Mumbai Local : मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

Mumbai Local :  मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. नेरळ आणि भिवपुरी रेल्वे स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजतापासून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. मालगाडीच्या मागे कर्जतकडे जाणाऱ्या दोन लोकल अडकल्या आहे. कर्जतहून दुसरं इंजिन येऊन मालगाडीला पुढे नेणार आहे

पुण्यातील वडगाव धायरी परिसरात विद्युत शॉक लागून भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या जागीच मृत्यू

पुण्यातील वडगाव धायरी परिसरात उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्हॅटच्या फिडर बॉक्सला चिकटून भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या जागीच मृत्यू झालाय. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. शफीक बशीर कुरेशी (वय, 39, मिरेकर वस्ती, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

Jain Paryushan 2022 : पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

 नागपूर : पर्युषण पर्व दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार श्रावण वैद्य 12 व भाद्रपद शुध्द 4 या दिवशी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या आहे. तसेच उर्वरीत दिवशी (श्रावण वैद्य 13 ते भाद्रपद शुध्द 3 व 5) सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार  बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी (श्रावण वैद्य 12) आणि बुधवार दिनांक 31 ऑगस्ट (भाद्रपद शुध्द 4) रोजी नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल. तसेच दिनांक 25 ऑगस्ट (श्रावण वैद्य 13) ते 30 ऑगस्ट दरम्यान व 01 सप्टेंबर (भाद्रपद शुध्द 3 व 5) या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त, संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

ओरिसातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीला तेलंगणात अटक,  एक कोटी तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

ओरिसा राज्यातून हैदराबाद मार्गे महाराष्ट्रात गांजा तस्करी करणाऱ्या एका टोळीला तेलंगाना पोलिसांनी अटक केली आहे. ही धाडसी कारवाई तेलंगणा येथील राजकोंडाचे पोलीस अधीक्षक महेश भागवत यांनी केली आहे.  विशेष म्हणजे ही टोळी बीड जिल्ह्यातील असून यातील मुख्य आरोपी करण परकाळे हा बीड जिल्ह्यातल्या आष्टीचा रहिवाशी आहे. यापूर्वी देखील त्याला विशाखापट्टनम पोलिसांनी गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. 

Karuna Munde : करुणा शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

 Karuna Munde Meet Eknath Shinde : करुणा शर्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात दाखल झाल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर दाखल झालेल्या खटल्यांप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.

Eknath Shinde : शिंदे गटाची दुसरी शिवसेना शाखा दहीसरमध्ये

Eknath Shinde : शिंदे गटाची दुसरी शिवसेना शाखा दहीसरमध्ये. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रभागात  शिवसेना शाखा 7 उभी राहणार आहे.  24 ॲागस्टला श्रीकांत शिंदे या शाखेचे  उद्धाटन  करणार आहेत

Vasant More :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरे यांना नवीन जबाबदारी

Vasant More :  मनसे नेते वसंत मोरे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत  मोरे हे पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय भाग घेत नसल्याचे दिसत होते आता नाराज असलेले मोरे यांना थेट सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.



शरद पवारंविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळे आणि निखील भामरेला हायकोर्टाचा अंशत: दिलासा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्याविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि निखील भामरे यांना हायकोर्टाचा अंशत: दिलासा मिळाला आहे.  केतकी विरोधातील सर्व गुन्हे कळवा पोलीस ठाण्यात तर निखील भामरे विरोधातील सर्व गुन्हे नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. 

कोल्हापूर-सांगली मार्गावर रास्ता रोको, वाहनांच्या रांगा

कोल्हापूर-सांगली मार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्घावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघातात वाढ झाल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. नागरिकांनी दोन तास वाहने अडवून धरली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्याची दुरुस्ती तत्काळ न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.    

#BREAKING : राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा, जामीन रद्द करण्याची मुंबई पोलिसांची मागणी फेटाळली  

#BREAKING : राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा, जामीन रद्द करण्याची मुंबई पोलिसांची मागणी फेटाळली  

बार्शीतल्या इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील 5 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने शेतकरी आक्रमक

बार्शीतल्या इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील 5 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम न दिल्याने शेतकरी आक्रमक, बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील इंद्रेश्वर साखर कारखान्याला टाळे ठोको आंदोलनासाठी शेतकरी गेटवर बसले आहेत.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरु आहे आंदोलन. एका संतप्त कार्यकर्त्याने साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून केली तोडफोड. संतप्त कार्यकर्त्याने कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत व्यक्त केला रोष

आता सोन्याच्या कपात चहा पिता येणार, पारनेर तालुक्यातील व्यावसायिकाची नामी शक्कल

चहा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण बऱ्याचदा चहा पितो. पण हाच चहा जर खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात मिळाला तर, पारनेर तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी आपल्या 'प्रेमाचा चहा'च्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा सुरू केली आहे. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत. अगदी सर्वसमान्यांना देखील सोन्याच्या कपातून चहा पिण्याची हौस आता भागवता येणार आहे. अशी अनोखी संकल्पना राबविणारे राज्यातील आपण पहिले दुकानदार असल्याचा दावा पुजारी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या चहाच्या दुकानात सैन्यदलातील जवान आणि पोलिसांना बाराही महिने मोफत चहा दिला जातो. त्यातच त्यांनी आजपासून सुरू केलेल्या सुवर्ण कपात चहा या संकल्पनेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्याच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्तीने लावली आग

श्रीगोंदा, अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शेतकऱ्याच्या कांदा चाळीला अज्ञात व्यक्ती पहाटे आग लावलीये. या आगीत भाऊसाहेब हरिभाऊ वाघ या शेतकऱ्याचे दोन ते अडिच लाखाचे नुकसान झाले आहे.
तर याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल करण्यात आलीये. सहा महिन्यापूर्वी वाघ यांनी शेतात कांद्याचे पीक घेतले होते. तर कांद्याला भाव नसल्याने त्यांनी लाकडे आणि पाचरटाची कांद्याची चाळ बांधुन तिच्यामध्ये कांदा साठवणुक केली होती. पहाटे साडेपाच  वाजता जळाल्याचा वास आला त्यामुळे वाघ यांनी बाहेर येवून पाहीले असता कांदा जळत असल्याचे दिसले. त्यानंतर आजुबाजुच्या वस्तीवरील रहिवाशांना आवाज देऊन बोलून घेतले. त्वरित आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत कांदा चाळ संपूर्ण जळून गेली होती. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहेत.

लग्नाच्या एक दिवसाआधी नवरदेव गायब, दाढी करण्याच्या बहाण्याने गेला होता बाहेर

चंद्रपूरः लग्नाच्या ऐन एक दिवसाआधी नवरदेव मुलगा गायब झाल्याची अजब घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात समोर आली आहे. सरदार पटेल वॉर्डात राहणाऱ्या या नवरदेवाचे हिंगणघाट येथील मुलीशी लग्न ठरलं होतं. त्यासाठी सगळी तयारी झाली होती. मात्र दाढी करण्याच्या बहाण्याने तो मुलगा बाहेर गेला होता. तेव्हापासून गायब झाला आहे. मुलाचे फोन बंद असल्याने सगळी वऱ्हाडी चिंतेत आहे. तर दुसरीकडे पोलीसही त्याचा शोध घेताहेत.

तुम्ही नगराध्यक्ष जनतेतून करता मग मुख्यमंत्रीही जनतेतून करा: अजित पवार -

तुम्ही नगराध्यक्ष जनतेतून करता मग मुख्यमंत्री ही जनतेतून करा ना. मुख्यमंत्री म्हणून असं निवडून यायचं  आणि नगराध्यक्ष मात्र जनतेतून हे योग्य नाही, अजित पवारांचा हल्लाबोल

पुणे भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, 16 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणेला निर्देश

पुणे भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, 16 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे तपासयंत्रणेला निर्देश

Shravan 2022 : श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भाविकांची मोठी गर्दी





Shravan 2022 : बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात आज चौथ्या श्रावण सोमवार निमित्ताने मोठे गर्दी भाविकांची पाहायला मिळते. मंदिरामध्ये फुलांची मोठी सजावट आरास करण्यात आली आहे.. आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याकारणाने राज्य आणि राज्या बाहेरून देखील भाविक परळी मध्ये वैजनाथच्या दर्शनासाठी पोहोचत आहेत.





Mumbai Crime News : मुंबई वाहतूक पोलीस धमकी प्रकरण :  मुंबई पोलीस आता पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा तपास करणार

Mumbai Crime News : मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा मेसेज कोणी पाठवला? हे जाणून घेण्यासाठी मुंबई पोलीस आता पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस तपास करत त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 


धमकीच्या संदेशानंतर, मुंबई गुन्हे शाखा, एटीएस आणि विविध यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यूपी एसटीपीनं सुद्धा मेसेजमधील शेअर केलेल्या मोबाईल नंबरचा आधारे काही लोकांची चौकशी सुरू केली आहे. 


पोलिसांनी सांगितलं की, पाठवणार्‍यानं शेअर केलेले बहुतांश मोबाईल नंबर हे उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे आहेत. त्यांनी मोबाईल नंबर वापरणाऱ्या काही लोकांची चौकशी केली त्यावेळी ही माहिती समोर आली. 


या गुन्ह्यातील कोणताही सुगावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. 

Mumbai Crime News : मुंबई वाहतूक पोलीस धमकी प्रकरण :  मुंबई पोलीस आता पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा तपास करणार

Mumbai Crime News : मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा मेसेज कोणी पाठवला? हे जाणून घेण्यासाठी मुंबई पोलीस आता पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस तपास करत त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 


धमकीच्या संदेशानंतर, मुंबई गुन्हे शाखा, एटीएस आणि विविध यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. यूपी एसटीपीनं सुद्धा मेसेजमधील शेअर केलेल्या मोबाईल नंबरचा आधारे काही लोकांची चौकशी सुरू केली आहे. 


पोलिसांनी सांगितलं की, पाठवणार्‍यानं शेअर केलेले बहुतांश मोबाईल नंबर हे उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे आहेत. त्यांनी मोबाईल नंबर वापरणाऱ्या काही लोकांची चौकशी केली त्यावेळी ही माहिती समोर आली. 


या गुन्ह्यातील कोणताही सुगावा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. 

माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते धनराज वंजारी यांचा आपमध्ये प्रवेश

माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते धनराज वंजारी यांचा आपमध्ये प्रवेश,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत दिल्लीत केला प्रवेश, आपची महाराष्ट्रात पाळंमुळं घट्ट करण्यासाठी आपमध्ये भरती सुरु

संजय राऊतांचा मुक्काम पुन्हा कारागृहात; न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली

मुंबई मनपा निवडणुकीसाठी वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा- सुप्रीम कोर्ट

मुंबई मनपा निवडणुकीसाठी वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा- सुप्रीम कोर्ट


शिंदे-फडणवीस सरकारनं कमी केली होती मुंबईतील वॉर्डची संख्या

Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास आता ATS करणार

चिकलठाण शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा जिवघेणा प्रवास  

जीव मुठीत धरून काठीचा सहारा घेऊन शाळेसाठी नदी ओलांडुन करावा लागतो प्रवास.


कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील गांधीरी नदीवरील नळकांडी पूल वाहुन गेल्याने शेतवस्तीवरील चिकलठाण जिल्हा परीषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र याकडे कुणाचं लक्ष नसल्यानं पालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. चिकलठाण गाव तसे पुढाऱ्यांच्या बाबतीत नावाजलेले आहे. पण धरणाचा सांडवा या नदीला येऊन मिळतो. सांडव्याचा पाण्याचा ओघ वाढला की, अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं.


गंधेश्वर चिखलठाण रस्ता लगत हा नळकांडी पुल शेतकऱ्यांनी स्वखर्चानं केला आहे. परंतु नदीला सांडव्याच पाणी वाढल्याने तो वाहुन गेल्याने विदयार्थीना शाळेत ये जा करण्यासाठी काठीचा आधार घेऊन नदी ओलांडावी लागत आहे.

मध्य रेल्वे विस्कळीत, गेल्या अर्धा तासांपासून फास्ट ट्रॅकवरील रेल्वे  एकाच जागेवर, अप लाईनवरील फास्ट ट्रॅकवरील रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे विस्कळीत, गेल्या अर्धा तासांपासून फास्ट ट्रॅकवरील रेल्वे  एकाच जागेवर, अप लाईनवरील फास्ट ट्रॅकवरील रेल्वे विस्कळीत, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांचे हाल


करी रोड रेल्वे स्थानक परिसरात लोकल थांबवली

भाजपच्या शहानवाज हुसेन यांच्या याचिकेवर सुनावणी

भाजपचे नेते शहानवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आदेश दिला होता. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका हुसेन यांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. 

MNS Meeting : मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक

MNS Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणजे राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये ते आपल्या आगामी रणनिती बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि मार्गदर्शन देखील करणार आहेत. 




 


Maharashtra Monsoon Session : विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा

Maharashtra Monsoon Session : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून दुसऱ्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. त्यामुळे शेतकरी, कायदा व सुव्यवस्था आणि सरकारने दिलेल्या स्थगिती संदर्भात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत. यावर आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची दाट शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकतंच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विद्युत तार तोंडात घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात पूर परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना शासकीय मदत अजूनही पुरेशी मिळालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नुकतंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दोन दिवसांचा दौरा केला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

OBC Reservation : महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात आज (22 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं अशी सरकारची मागणी आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकनाची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारच्या याचिकेवर काय फैसला देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ओबीसी आरक्षणासंदर्भातला निकाल 92 नगरपरिषदांसाठीही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू करण्यात आलं आहे. मग केवळ ओबीसी आरक्षण लागू न होणं हे अन्यायकारी ठरेल. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन आलं नव्हतं, असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.  
आज सरन्यायाधीशांच्याच खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा दावा सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला, तर शिंदे-फडणवीस सरकारचा हा मोठा विजय ठरेल. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
राज्यातील ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आधी निवडणुका जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे अशी सरकारची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला. पण हा निकाल देताना आधी निवडणुका जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू होणार नाही हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होत. कोर्टाचं म्हणणं होत की, ज्यावेळी आम्ही हा निकाल दिला, त्यावेळी ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथे आरक्षण लागू करता येणार नाही. पण यावरूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 


विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडा
राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असून दुसऱ्या आठवड्यातील आज पहिला दिवस आहे. त्यामुळे शेतकरी, कायदा व सुव्यवस्था आणि सरकारने दिलेल्या स्थगिती संदर्भात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना विरोधकांनी सरकावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले आहेत. यावर आज मुख्यमंत्री उत्तर देण्याची दाट शक्यता आहे. यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकतंच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने विद्युत तार तोंडात घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील दोन महिन्यांपासून राज्यात पूर परिस्थिती असताना देखील शेतकऱ्यांना शासकीय मदत अजूनही पुरेशी मिळालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. नुकतंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दोन दिवसांचा दौरा केला आहे. 


मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर लवकरच ॲक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणजे राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यामध्ये ते आपल्या आगामी रणनिती बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि मार्गदर्शन देखील करणार आहेत.


भाजपच्या शहानवाज हुसेन यांच्या याचिकेवर सुनावणी
भाजपचे नेते शहानवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला असून त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा आदेश दिला होता. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका हुसेन यांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात येणार आहे. 


केजरीवाल आणि सिसोदिया एकदिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया हे एकदिवसीय गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते या दरम्यान दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.