Maharashtra Breaking News Live 22 September 2022 : रात्रभर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Sep 2022 08:20 AM
Amravati Breaking : अल्पवयीन मुलगी पळून नेणाऱ्या आरोपीची रात्री जमावाकडून हत्या

अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलगी पळून नेणाऱ्या आरोपीची रात्री जमावाकडून हत्या करण्यात आलीय. शिवाजी नगर गारोडी पुरामधील आरोपी नईम यांचा रात्री हत्या करण्यात आली आहे. 21 तारखेला चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीच अपहरण केलं होतं. त्यानंतर रात्री अल्पवयीन मुलीला घरी आणून सोडले. आरोपी परिसरात आला तेव्हा त्याचा जमावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पुढील तपास चांदुर रेल्वे पोलीस करत आहेत. 


घटनाक्रम 


दि. 21/09/2022 - रोजी चांदुर रेल्वे शहरातील चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण


दिवस रात्रभर पोलीस यंत्रणेमार्फत आरोपीच्या शोधात पथके पाठविली


दि. 22/09/2022 रोजी नागरिकांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा


दि. 23/09/2022 रोजी मध्यरात्री 1.30 वाजता अल्पवयीन मुलीला तिच्या घरी आणून सोडण्यात आले.

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळालं नाही तर शिवसेनेचा प्लॅन बी तयार

Shivsena Dasara Melava : हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना पत्ते खोलणार, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळालं नाही तर प्लॅन बी तयार.... महालक्ष्मी, सेनाभवनसह अनेक पर्याय...


 





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री भेट, दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री भेट, दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा





रात्रभर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार

मुंबई गोवा महामार्गावर LPG गॅस अलणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. त्यामुळे आज रात्रभर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.  
तज्ज्ञांची टीम उरण आणि गोवा वरून दाखल होणार  आहे. पलटी झालेल्या टँकर ची क्षमता 28 हजार किलो इतकी आहे. 

Solapur News : सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेचा आरबीआयकडून परवाना रद्द

Solapur News : सोलापुरातील लक्ष्मी सहकारी बँकेला  (Laxmi Co-operative Bank)टाळं लागणार आहे.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द केला आहे 

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर देशभरात कारवाई ,भिवंडीतून एका युवकास घेतले ताब्यात

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटने कडून दहशतवादी कृत्यांसाठी निधी दिला जात असल्याचा आरोप असून त्यातून एन आय ए ने देशभरात धडसत्र सुरू असून त्या अंतर्गत भिवंडी शहरातील बंगालपुरा येथे ठाणे येथील एटीएस पथकाने कारवाई करीत मोईनुद्दीन मोमीन या युवकास ताब्यात घेतले आहे.भिवंडी शहरातील बंगालपुरा या परिसरात राहणार मोईनुद्दीन मोमीन हा घरा शेजारील इमारती मधील दुकानात चॉकलेट बिस्कीट याचा घाऊक व्यवसाय करीत होता.व त्या ठिकाणाहून तो पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेसाठी काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे ..


 

 
उपवासाची भगर खाल्ल्याने २० भाविकांना विषबाधा

 एन सणासुदीचे तोंडावर उपवासाची भगर खाल्याने तालुक्यातील दोन गावातील जवळपास १५ ते २० भाविकांना विषबाधा झाली असून त्यांना शहरांतील विविध खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.....काल रोजी एकादशी असल्याने अनेक लोकांनी उपवास व्रत ठेवले होते....... ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चकरा येण्यासारखे झाले. काहींना वाटले की एसीडीटी मुळे हे सर्व होत आहे परंतु तब्येत बिघडतात त्यांना चिखली मधील काही वेगवेगळ्या  खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला आहे त्यांनी आपल्या गावातील दुकानातून ते विकत घेतले होते. स्थानिक दुकानदारांनी तो माल चिखली मधून घेतल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले होते.

मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये अंजणारी पुलाजवळ भीषण अपघात, एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून काजळी नदीत कोसळला, चालकाचा मृत्यू
Ratnagiri News : मुंबई-गोवा महामार्गावर लांजामध्ये अंजणारी पुलाजवळ भीषण अपघात झाला. एलपीजी टँकर पुलाचा कठडा तोडून काजळी नदीत कोसळला. अपघातानंतर एलपीजी टँकरमधून गॅस गळती सुरु झाली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक रोखण्यात आली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
बुलढाण्यात उपवासाची भगर खाल्ल्याने 20 भाविकांना विषबाधा, चिखली इथली घटना

Buldhana News : ऐन सणासुदीचे तोंडावर उपवासाची भगर खाल्याने तालुक्यातील दोन गावातील जवळपास 15 ते 20 भाविकांना विषबाधा झाली असून त्यांना शहरांतील विविध खाजगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. काल एकादशी असल्याने अनेक लोकांनी उपवास व्रत ठेवले होते. ग्रामीण भागातील काही लोकांनी उपवास असल्यामुळे भगर खाल्ली. परंतु काही वेळानंतरच अनेकांना उलटी, डोकेदुखी, चकरा येण्यासारखे झाले. काहींना वाटले की अॅसिडिटीमुळे हे सर्व होत आहे. परंतु तब्येत बिघडताच त्यांना चिखलीमधील काही वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तर ज्या लोकांना भगरचे पीठ खाल्ल्याने त्रास झाला आहे. त्यांनी आपल्या गावातील दुकानातून ते विकत घेतले होते. स्थानिक दुकानदारांनी तो माल चिखलीमधून घेतल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा ताफा आपच्या कार्यकर्त्यांनी वारजे येथे अडवला 

महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज वारजे येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला. यात आपचे वारजे माळवाडी भागातील कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ऑपरेशन लोटस विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ट्रॉम्बे मध्ये एनआयएची छापेमारी, एक ताब्यात

चेंबूरच्या ट्रॉमबे परिसरात डी सेक्टरमध्ये असलेल्या आयडियल शाळेच्या बाजूला एक कार्यालयवर ही एनआयएने धाड टाकली. या ठिकाणावरून हैदर हबीबुल रेहमान या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोग्य विभागाच्या सर्व बदल्या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून होणार, कोणाचंही शिफारस पत्र चालणार नाही; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निर्णय

Mumbai News : अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांच्या संदर्भात आरोग्य विभागाचा मोठा निर्णय


यापुढे आरोग्य विभागाच्या सर्व बदल्या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून होणार


आरोग्य विभागाच्या बदल्यांच्या संदर्भात कोणाचंही शिफारस पत्र चालणार नाही


बदल्यांच्या मागील अर्थकारण थांबवण्यासाठी आरोग्य विभागाचा निर्णय


या बदल्यांच्यासाठी आरोग्य विभाग अद्यावत डिजीटल अॅप तयार करणार


ज्याला बदली करायची आहे त्याने स्वतः तीन पर्याय या अॅपवरती द्यायचे


त्यातून डिजीटल पद्धतीने मेरिटवर बदली होणार


आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय

नाशिक ATS नआणखी दोघांना ताब्यात घेतलं

नाशिक ATS ने आणखी दोघांना ताब्यात घेतलं. PFI च्या एकूण चार कार्यकर्त्यांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये पुण्यातील दोन, बीडचा एक तर मालेगावच्या एकाचा समावेश आहे ATS चे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत.


ताब्यात घेतलेल्यांची नावे


मौलाना सैफुर रहमान, मालेगाव (वय, 27)


वसीम शेख, बीड (वय - 29)


कयूम शेख, कोंढवा, पुणे (वय - 48)


राझिक अहमद खान, पुणे (वय - 31)

NIA, ATS Rain in Mumbai : मुंबईमध्ये पीएफआयच्या विविध कार्यालयांवर मध्यरात्री पासून धाडसत्र, सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध कार्यालयांवर मध्यरात्री पासून धाडसत्र सुरू होते. चेंबूरच्या ट्रॉमबे परिसरात डी सेक्टरमध्ये असलेल्या आयडियल शाळेच्या बाजूला एक कार्यालयवर ही एनआयएने धाड टाकली. या ठिकाणावरून हैदर हबीबुल रेहमान या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्यक्ती कर्नाटकमधून इथे आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांशी त्याची ओळख नव्हती. एका मुस्लिम संस्थेचे हे कार्यालय असून ते काही दिवसंपासून भाड्याने दिले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सध्या या विभागात तणावाची स्थिती असून सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एटीएसची पीएफआय संस्थेच्या जळगाव कार्यालयावर छापेमारी

महाराष्ट्र एटीएसने पीएफआय संस्थेच्या जळगाव कार्यालयावर छापे टाकले. अब्दुल हादी उर्फ ​​अब्दुल रौफ याला एटीएसने जळगाव येथून ताब्यात घेतले आहे. जालन्यातील अब्दुल हादी, पीएफआयचे सोशल मीडियाचे काम पाहतात. हादी गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेशी संबंधित आहेत.

Nanded ATS, NIA Raid : नांदेड येथे NIA, ATS पथकाची संयुक्त कारवाई

नांदेड येथे NIA, ATS पथकाची संयुक्त कारवाई करत पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. किराणासह इतर वस्तुंचा व्यावसयिक असणाऱ्या व्यापारी आणि इतर एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून पीआयएफचा एक कार्यकर्ता फरार आहे. नांदेड शहरातील देग्लुर नाका परिसरात महाराष्ट्र ATS आणि NIA ने संयुक्त कारवाई करत.पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. देगलूर नाका परिसरात ATS आणि NIA कडून सध्या नांदेड शहरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या लोकांवर छापेमारी करत झाडाझडती घेण्यात येत आहे.

शिवसेनेला आडकाठी करण्याचा प्रयत्न : अनिल परब

शिवसेनेला आडकाठी करण्याचा प्रयत्न : शिवसेना नेते अनिल परब





आम्हांला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळेल : अनिल परब

आम्हांला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळेल : अनिल परब





ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक सतीश आळेकर यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर

Sangli News : यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. 5 नोव्हेंबर रोजी जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. गौरव पदक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा दिले जाणारे हे 55 वे गौरव पदक आहे. मागील 54 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणारा पुरस्कार वितरीत केला जात आहे.

शिवसेनेच्यावतीनं याचिकेत सुधारणेसाठी वेळ मागितला; शिवसेनेची मागणी हायकोर्टाकडून मान्य

MNS : आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, मनसे आमदाराचं शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

MNS : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे, दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका केली होती. मनसेच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. शरद पवार यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?"अशा शब्दात खोचक टोला लगावला. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी थेट शरद पवार यांना ट्वीटच्या माध्यमातुन प्रत्युत्तर दिलंय. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत आज बोटं मोजताय. उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही "धन"से कमी आहोत पण "मन"से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय आदर घ्या असा सल्ला दिला आहे

Baramati : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेणार, जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळणार?

Baramati : केंद्रीय अर्थमंत्री बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. उद्या सकाळी निर्मला सीतारामन ह्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराला भेट देणार आहेत. देवस्थानच्या वतीने निर्मला सितारामन यांच्या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. निर्मला सीतारामन या जेजुरी संस्थानच्या पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी देवस्थानच्या वतीने निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनात जेजुरी गडाला पर्यटनाचा दर्जा मिळावा, वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळावा तसेच जेजुरी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवाव्यात अशी मागणी जेजुरी संस्थानच्या वतीने अर्थमंत्र्यांना करण्यात येणार असल्याची माहिती पंकज निकुडे यांनी दिली

Hingoli : बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांची नियुक्ती 


Hingoli : महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त हळदीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचे उत्पादन घेतले जातात. परंतु या हळदीवर योग्य असं संशोधन केलं जात नव्हतं याच हळदीला जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख निर्माण व्हावी आणि या हळदीचे संशोधन व्हायला हवं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून कृषी तज्ञांसोबत हेमंत पाटील वारंवार भेटी घेऊन संशोधन केंद्र उभारणीसाठी प्रयत्न करत होते 

Beed : बीडच्या हिंगणीत नागरिक आणि चिमुकल्यांचा जीव मुठीत घेऊन संघर्ष

Beed : पावसाळा आला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि रस्ते खराब झालेत म्हणून आपण सगळे ओरड करतो. पण ज्यांचा रस्ताच कायम पाण्यात असतो आणि त्याच पाण्यातून वाट काढत बीडच्या हिंगणी आणि मुंडे वस्ती वरच्या नागरिक आणि चिमुकल्यांना कायम जीव मुठीत घेऊन संघर्ष करावा लागतो. पाण्यातून वाट काढत रस्ता पार करणाऱ्या नागरिकांच्या समस्या वाढत आहेत.

Amravati : अनाथ बालकांचा निधी रोखणारे हे सरकार निर्दयी, माजी मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक

Amravati : अनाथ, एकल बालकांचा निधी रोखणारे सरकार निर्दयी असल्याचे सांगत महिला व बाल विकास विभागाच्या माजीमंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या. ईडी सरकारने महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही निर्णय त्यांच्या फायद्यासाठी बदलून घेतले असल्याचं टीकास्त्र माजीमंत्री यशोमती ठाकूर यांनी टाकला. जिथे अनाथ बालकांचा, एकल महिलांचा, दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हितासाठी घेतलेला निर्णय हे सरकार कसं काय बदलू शकते. सरकारमधील ही लोक असंवेदनशील आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला महिला व बाल कल्याण विभागाचा मंत्री केलं आहे. त्याला फक्त काँक्रीट जंगल बांधता येतं, त्यांची हृदय देखील काँक्रीट आहेत. 

शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा प्रकरणात शिंदे गटाची हायकोर्टात मध्यस्थ याचिका सादर

Dasara Melava Row : शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा प्रकरणात शिंदे गटाची हायकोर्टात मध्यस्थ याचिका सादर


स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केली याचिका


दरवर्षीप्रमाणे आपल्याच अर्जाला परवानगी देण्याची याचिकेत मागणी


शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरता आपला अर्ज महापालिकेकडे गेल्याचा दावा


शिवसेनेची याचिका कोर्टाची दिशाभूल करणारी


एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना, सरवणकरांच्या याचिकेत दावा

Nanded : नांदेड येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात तरुणीची आत्महत्या

Nanded : नांदेड येथे अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीची आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णुपुरी येथील वसतिगृहात आत्महत्या केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या गिता कदम हिने वसतिगृहातील रूममध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम डॉ इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.


 



महाराष्ट्रासह देशभरात पीएफआयच्या कार्यालयावर NIA ची छापेमारी

NIA Raid News : महाराष्ट्रासह देशभरात पीएफआयच्या कार्यालयावर NIA ने छापेमारी केली आहे. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे, भिवंडी या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठानमधील फुटीमुळे सांगलीतील यंदाच्या दुर्गामाता दौडीवरुन नवा वाद होण्याची चिन्हे

Sangli News : फुटीमुळे सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या यंदाच्या दुर्गामाता दौडीवरुन नवा वाद होण्याची चिन्हे आहेत. नवरात्रीमध्ये सांंगलीसह राज्यामध्ये होणाऱ्या दुर्गामाता दौडीत सहभागी होणार असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने जाहीर केल आहे. शिवप्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या दोन्ही संघटना दौडीच्या निमित्ताने एकत्र येणार की वेगवेगळ्या दौडी होणार हा वादाचा मुद्दा ठरणार आहे. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेतून फुटून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची स्थापना केली आहे.

इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबईतील खाडी किनारी तृतीयपंथियांकडून स्वच्छता मोहीम

Navi Mumbai News : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इंडियन स्वच्छता लिग मोहिम अंतर्गत आज नवी मुंबईत तृतीयपंथियांकडून सहभाग घेण्यात आला होता. नवी मुंबई महानगरपालिका आणि तृतीयपंथियांकडून सामूहिक स्वच्छता करण्यात आली. वाशी येथील खाडी किनारी तृतीयपंथियांनी कचरा उचलला. मोठ्या संख्येने पडलेला कचरा साफ करत आम्हीही या स्वच्छता मोहिमेचे पाईक आहोत, असा संदेश यावेळी तृतीयपंथियांनी दिला. स्वच्छ भारत मिशनमध्ये नवी मुंबई नेहमीच टॉप 5 मध्ये राहिले असून यावेळी पहिला नंबर मिळवण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला.

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर कोल्हापुरातील जोतिबा डोंगराचा मुख्य रस्ता पुन्हा एकदा खचला

Kolhapur News : 


खूप खोल आणि रुंद भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण


कोणत्याही क्षणी रस्ता तुटून जाण्याची भीती


नवीन पद्धतीने रस्ता बांधून सुद्धा सलग तीन वर्षे रस्ता खचतोय


खबरदारी म्हणून रस्ता आधीच वाहतुकीसाठी ठेवला बंद


गायमुख मार्गाने जोतिबा डोंगरावर भाविकांना प्रवेश


नवरात्रोत्सवात खूप मोठ्या संख्येने भाविक जोतिबावर येतात

Mumbai Local Updates : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड

केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर दौऱ्यावर

भाजपतर्फे चंद्रपूर लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर शहरात येणार आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हिंगोली दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. 

राजू श्रीवास्तव यांच्यावर अंत्यसंस्कार

राजू श्रीवास्तव यांच्यावर आज सकाळी 10 वाजता निगम बोध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. 

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर आहेत. सकाळी 7.55 वाजता रेल्वेने निघणार आहेत. दापोली पोलिस स्टेशन, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर  आहेत. विचारपरिवार समन्वय बैठक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीतील अंबादेवी मंदिरात सुद्धा राज ठाकरे जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे.  तसेच राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्क कोणाचं? उच्च न्यायालयात सुनावणी

Shivsena Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे. रितसर पूर्वपरवानगी मागूनही मुंबई महापालिकेडून उत्तर नाही. पालिका प्रशासनावर राज्य सरकराचा दबाव असल्याचा याचिकेत आरोप आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 1966 पासून शिवसेना पक्ष म्हणून शिवाजी पार्कावर दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची परंपरा आहे.  त्यामुळे यादिवशी देशभरातील कार्यकर्ते कोणत्याही निमंत्रणाविना शिवाजी पार्कवर दाखल होतात, त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी, शिवसेनेने याचिकेत केला आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


शिवाजी पार्क कोणाचं?  उच्च न्यायालयात सुनावणी
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी आहे.    रितसर पूर्वपरवानगी मागूनही मुंबई महापालिकेडून उत्तर नाही. पालिका प्रशासनावर राज्य सरकराचा दबाव असल्याचा याचिकेत आरोप आहे. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.   1966 पासून शिवसेना पक्ष म्हणून शिवाजी पार्कावर दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेण्याची परंपरा आहे.  त्यामुळे यादिवशी देशभरातील कार्यकर्ते कोणत्याही निमंत्रणाविना शिवाजी पार्कवर दाखल होतात, त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळायला हवी, शिवसेनेने याचिकेत केला आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीतील अंबादेवी मंदिरात सुद्धा राज ठाकरे जाऊन दर्शन घेण्याची शक्यता आहे.  तसेच राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर  आहेत. विचारपरिवार समन्वय बैठक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आज एक दिवसाच्या दापोली दौऱ्यावर आहेत. सकाळी 7.55 वाजता रेल्वेने निघणार आहेत. दापोली पोलिस स्टेशन, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.


राजू श्रीवास्तव यांच्यावर  अंत्यसंस्कार
 राजू श्रीवास्तव यांच्यावर आज सकाळी 10 वाजता निगम बोध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 8 वाजता दिल्लीच्या दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे.


केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर हिंगोली  दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे


केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर  दौऱ्यावर 
भाजपतर्फे चंद्रपूर लोकसभा निवडणूक पूर्वतयारीसाठी केंद्रीय मंत्री हरदिपसिंग पुरी चंद्रपूर शहरात येणार आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.