22 March 2022 Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Mar 2022 07:41 AM
Sangli : सांगलीत दोन दिवसांत दोन हत्येच्या घटना

सांगली येथे दोन दिवसांत दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. रात्री हरिपूर मध्ये एका आरटीओ एजंटच्या खुनाची घटना ताजी असतानाच सांगली शहरात स्टॅंड रोडवर आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे.अज्ञात हल्लेखोरांकडून एका व्यक्तीची धारदार हत्याराने आणि दगडाने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न: एकनाथ शिंदे

केंद्रीय तपास यंत्रांचा अशा प्रकारे वापर हा लोकशाहीसाठी घातक आहे. महाविकास सरकारच्या कामात अडथळे निर्माण करण्याचं, सरकार अस्थिर करण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेना अशा कारवाईना घाबरत नाही. घाबरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

न्यायालय ही दबावात, ही तानशाहीची सुरुवात : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले आहेत की, आम्ही अशा परिस्थिती न्यायालयाकडूनही न्यायाची अपेक्षा करू शकता नाही. जनतेचं न्यायालय हे सर्वात मोठं आहे. महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबियांशी परिचित आहे. राजकीय सूडबुद्धीने होत असलेल्या या कारवाईचे उत्तर कधी ना कधी कोणाला तरी द्यावं लागेल.'' ते म्हणाले, ''न्यायालय ही दबावात असून ही ही तानशाहीची सुरुवात आहे.'' 

सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे : संजय राऊत

सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. आपलं राजकीय वर्चस्व दाखवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातच अशी कारवाई केली जाते असं ते म्हणाले आहेत. जिथं सत्ता गेली तिथं भाजप अशाप्रकारे दबाव आणत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: भाजप आमदार नितेश राणे

ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, ''हा पैसा मातोश्रीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.''

Sangli rain : सांगलीत पुन्हा अवकाळी पाऊस

सांगलीमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरु आहे.

'शिव संपर्क' दौर्‍यावर असलेल्या संजय राऊतांनी नागपूरात शिवसैनिकांची घेतली भेट

विदर्भात संघटनात्मक बांधणी साठी "शिव संपर्क दौर्‍या"वर आलेले खासदार संजय राऊत नागपुरातील शासकीय विश्रामगृह असलेल्या रविभवन मध्ये नागपूर शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटत आहेत. नागपूर शहरात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघप्रमाणे ते प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ही घेत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महा विकास आघाडीतील सहकारी पक्षांसोबत नागपुरात आघाडीकडून भाजपसमोर आव्हान उभं करायचं की शिवसेनेने पक्षवाढीसाठी महापालिका निवडणुकात एकटेच उतरावे या संदर्भात ही संजय राऊत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी आपल्यालाच संधी देईल या अपेक्षेने मोठ्या संख्येने स्थानिक कार्यकर्ते संजय राऊत बैठक घेत असलेल्या रविभवन विश्राम गृहात दाखल झाले आहेत.

Wardha News : महिला वकीलावर कोर्टात चाकूहल्ला

वर्ध्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यात न्यायाधीश यांच्या दालनातच एका महिला वकीलावर चाकू हल्ला करण्यात आला आहे.

Pravin Darekar : मुंबई बँक कारवाईच्या मुद्यावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक

Pravin Darekar : मुंबई बँक कारवाईच्या मुद्यावरून विधान परिषदेत प्रवीण दरेकर आक्रमक, कायद्याचा बडगा फक्त विरोधकांवर का म्हणत सरकारवर हल्लाबोल

ShivSena : शिवसेना खासदारांचे आजपासून विदर्भात शिवसंपर्क अभियान सुरू

ShivSena : शिवसेना खासदारांचे आजपासून विदर्भात शिवसंपर्क अभियान सुरू झाले आहे. त्यानुसार विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शिवसेनेच्या खासदारांचा दौरा सुरू झाला. 

मुंबईत ईडीची छापेमारी सुरु, बांधकाम व्यावसायिक रडारवर

अपेक्षित तीव्रता न गाठल्यानं असानी चक्रीवादळ तयार होणार नाही, भारतीय हवामान विभागाची माहिती

LPG Price Hike : पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर इंधन दराचा भडका, LPG च्या दरांत वाढ

LPG Price Hike : पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर इंधन दराचा भडका उडालाय. सर्वसामान्य जनतेचा खिसा आजपासून कापला जाणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महागलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आलीय. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागलाय. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसलाय. 

Rahul Gandhi : महागाईवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी महागाईबाबत सातत्याने केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. सोमवारी मोदी सरकारवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, महागाईमुळे भारतातील लोकांना फरक पडत आहे, परंतु भाजपला त्याची पर्वा नाही. गेल्या काही महिन्यांत किराणा मालाच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा दावा करत राहुल गांधींनी ट्विट केले आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 'भाजपवर नाही मात्र भारतातील जनतेवर याचा परिणाम होत आहे.' तसेच महागाई आणखी वाढेल, असा इशाराही राहुल गांधी यांनी शनिवारी दिला. यासोबतच देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली. राहुल गांधी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्ग भरडला गेला होता.

Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार?

Narayan Rane : जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणे यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसची मुदत संपत असल्याचे नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली. महापालिकेच्या 'के-पश्चिम' विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या 'अधिश' बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Petrol-Diesel Price : निवडणुका संपल्या, इंधन दरवाढ सुरु; पेट्रोल प्रतिलिटर 84 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महागलं

Petrol-Diesel Price Today 22 March 2022 : आजपासून देशात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल  (Petrol Price) आणि डिझेलची (Diesel Price)  दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Petrol-Diesel Price : साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं! पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 प्रति लिटर पैशांनी महाग

Petrol-Diesel Price Today 22 March 2022 : आजपासून देशात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल  (Petrol Price) आणि डिझेलची (Diesel Price)  दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 

Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार? मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Narayan Rane : जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणे यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसची मुदत संपत असल्याचे नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली. महापालिकेच्या 'के-पश्चिम' विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या 'अधिश' बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी केल्यानंतर राणे यांनी बंगल्यातील अंतर्गत बांधकाम अधिकृत असल्याचे सांगितले. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.