Maharashtra Breaking News 21 June 2022 : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jun 2022 03:53 PM
केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.  जुहू येथील 'अधीश' बंगल्यावरील कारवाईविरोधात केलेलं अपील प्राधिकरणानं फेटाळलं आहे. 24 जूनपर्यंत बंगल्यातील  बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत,  कारवाईवर दिलेली स्थगिती वाढवण्याची मागणी करणार आहे. उद्या तातडीची सुनावणी आहे

Anil Parab : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

Anil Parab : परिवहन  मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात पोहचले आहेत. 

Breaking News: पोलीस अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्याकडूनच चाकू हल्ला; अधिकारी गंभीर जखमी

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील पोलिस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच चाकू हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चाकू हल्ला करणारा सुद्धा पोलिस कर्मचारीच असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. 


व्यंकटेश केंद्रे असे हल्ला झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. केंद्रे हे जिंसी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. तर हल्ला करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शेख मुजाहिद असल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रे हे आपल्या कॅबिनमध्ये बसले असताना मुजाहिदने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अपेक्स रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं बोलले जात आहे. 

चंद्रपूरमधील वरवट गावात वीज पडून तिघांचा मृत्यू

चंद्रपूरमधील वरवट गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. रामटेके कुटुंबातील 2 मुली आणि आईचा मृत्यू झाला आहे. 

सांगली : सावकारी कर्जानेच एकाच कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी सांगली पोलिसांनी तडीपार केलेल्या सावकार धुमाळ पिता पुत्राचा समावेश आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक... एकनाथ शिंदेंची ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया




Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले - किरीट सोमय्या

उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले - किरीट सोमय्या


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला असून, उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचे काउंट डाऊन सुरू झाले आहे.

पुणे : विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

पुणे : शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई गावातील बाबासाहेब जाधव यांच्या शेतातील विहिरीत सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्या पडला असून त्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.





करुणा शर्माला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : करुणा शर्मा आणि त्यांचा मित्र अजयकुमार देढेला पुणे पोलिसांनी अटक केलीय. करुणा शर्मा आणि अजय देढेच्या विरोधात त्याच्या पत्नीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अजयकुमार देढे हा करुणा शर्माचा पीए म्हणून वावरत होता. मात्र प्रत्यक्षात दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजयकुमार देढेने त्याच्या बायकोकडे घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी अजयकुमार देढे आणि करुणा शर्मा हे देढेच्या पत्नीला धमकावत होते. दोघांनी मिळून पुण्यातील भोसरी भागात देढेच्या पत्नीला बोलावून हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावल्याच तक्रारीत म्हटलंय. शिवाय करुणा शर्माने जातीवाचक शिविगाळ केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलय. त्यामुळे करुणा शर्माच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा देखील करण्यात आलाय.


 





करुणा शर्माला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : करुणा शर्मा आणि त्यांचा मित्र अजयकुमार देढेला पुणे पोलिसांनी अटक केलीय. करुणा शर्मा आणि अजय देढेच्या विरोधात त्याच्या पत्नीने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अजयकुमार देढे हा करुणा शर्माचा पीए म्हणून वावरत होता. मात्र प्रत्यक्षात दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजयकुमार देढेने त्याच्या बायकोकडे घटस्फोट देण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी अजयकुमार देढे आणि करुणा शर्मा हे देढेच्या पत्नीला धमकावत होते. दोघांनी मिळून पुण्यातील भोसरी भागात देढेच्या पत्नीला बोलावून हॉकी स्टीकच्या सहाय्याने धमकावल्याच तक्रारीत म्हटलंय. शिवाय करुणा शर्माने जातीवाचक शिविगाळ केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलय. त्यामुळे करुणा शर्माच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा देखील करण्यात आलाय.

Shivsena : महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले नॉट-रिचेबल

Shivsena : महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले नॉट-रिचेबल असून गेल्या तीन दिवसांपासून भरत गोगावले मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून भरत गोगावले हे महाडला आले नाही, यासोबतच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे देखील 'नॉट- रीचेबल' आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत असल्याची माहिती आहे. 

बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मोबाईल फोन बंद

अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मोबाईल फोन बंद आहे. परंतु, टोन मराठीतच येत आहे. त्यामुळे ते मुंबईतच असल्याचं त्यांचे समर्थक सांगत आहेत.

एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा फोन रात्रीपासून बंद

सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून काल रात्रीपासून त्यांचा फोन बंद आहे. जवळच्या सहकाऱ्यांना देखील आमदार शहाजीबापू पाटील कुठे आहेत हे माहित नाही. ते मुंबई मध्ये असावेत असे कार्यकर्ते सांगत आहेत.

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचा फोन नंबर बंद

नांदेड उत्तर मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचाही नंबर आणि त्यांच्या सर्व पीएचे नंबर बंद आहेत.

बुलढाण्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचे फोन नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड दोघेही नॉट रिचेबल

बुलढाण्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचे फोन नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड दोघेही नॉट रिचेबल, मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांच्या व्हॉट्सअॅपच्या डीपीवर मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो

उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली, मात्र आमदार भास्कर जाधव मुंबईतून कोकणात परतले

Ratnagiri News : विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. विधानपरिषद निवडणुकीत अंतर्गत गटबाजी आणि नाराजीतून शिवसेनेची मतं फुटली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली असताना कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे आज मुंबईतून घरी परतले आहेत. गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव हे रात्रीच घरी परतले आहेत. मंत्रिपदातून डावलल्याने भास्कर जाधव शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. 

शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द

शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीत हजर राहणार होते, पण एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे संजय राऊत दिल्ली ऐवजी आता मुंबईतच थांबणार

भाजपचा बालेकिल्ला सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमदारांसह मुक्कामी

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमधील सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमदारांसह मुक्कामी, शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर भाजप नेते अहमदनगरच्या दिशेने, शिंदे यांचा मुक्काम असलेल्या मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त

Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; गुजरातमध्ये दाखल?

Shivsena Eknath Shinde : शिवसेनेत फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही आमदारही असल्याची माहिती आहे. 


विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज दुपारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का? याकडे लक्ष लागलं आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Shivsena : शिवसेना फुटण्याची शक्यता? मंत्री एकनाथ शिंदे समर्थक 13 आमदार नॉटरिचेबल

Shivsena : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर येत असल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. 


सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Vidhan Parishad Election 2022 : 'महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल'; काँग्रेस नेत्याच्या मोठ्या वक्तव्यानं खळबळ

Vidhan Parishad Election 2022 : एकीकडे शिवसेनेत (ShivSena) राजकीय भूकंप होण्याची चिन्हं असताना काँग्रेसमध्ये पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या पराभवानं प्रचंड नाराजी आहे. यापुढे  महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राहायचं का? याचा विचार करावा लागेल, असं निर्वाणीचं वक्तव्य काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी केलं आहे. विधानपरिषदेतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसला महाविकास आघाडीत काय मिळतंय? याचा विचार करणं गरजेचं असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल गांधी आजही ईडीच्या चौकशीला राहणार

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. त्यांची काल सुमारे 10 तास चौकशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना बुधवारीही चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली. 

International Yoga Day 2022 : योग दिनानिमित्त 75,000 तरुण करणार योगासने

International Yoga Day 2022 : दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील जगभरात 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करणार  आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

कोरोना संकट मागे सारल्यानंतर अखेरीस यंदा पायी वारी होतेय. हा आनंदसोहळा त्यांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. वारकऱ्यांची पावलं त्यामुळे देहू आळंदी नगरीकडे वळली आहेत. आज आळंदीतून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 


संत  ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान


कोरोना संकट मागे सारल्यानंतर अखेरीस यंदा पायी वारी होतेय... हा आनंदसोहळा त्यांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे... वारकऱ्यांची पावलं त्यामुळे देहू आळंदी नगरीकडे वळली आहेत... आज आळंदीतून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.


योग दिनानिमित्त 75,000 तरुण करणार योगासने 


दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील जगभरात 21 जून 2022 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. योग दिनाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त देशभरातील 75000 हून अधिक तरुण योगासने करणार  आहेत.


राहुल गांधी आजही ईडीच्या चौकशीला राहणार


नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. त्यांची काल सुमारे 10 तास चौकशी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना बुधवारीही चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस त्यांची चौकशी करण्यात आली.


शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांची बैठक


राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारीबाबत विरोधी पक्षांची बैठक आज  होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. त्याचबरोबर 12 पक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र त्यांच्या जागी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात.


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स


राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. दापोलीतल्या रिसॉर्टप्रकरणी त्यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ईडीकडून अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांना ९ जूनला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र नियोजीत कार्यक्रमामुळे हजर राहू शकत नसल्याचं त्यांनी कळवलं होतं. 


आज इतिहासात


1948 : पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे


1949 : राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना


2006 : नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.


2015  : 21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.