Maharashtra News LIVE Updates : ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Feb 2022 07:31 PM
Sangamner News : बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात रात्री 8 च्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हिराबाई एकनाथ बढे या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मेंढवण शिवारातील बढे वस्तीजवळ ही घटना घडली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरातील वाघ जेरबंद

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा येथे दृष्टीस पडलेला वाघ अखेर जेरबंद झाला आहे. हा वाघ नर असून अंदाजे 2 वर्षांचा आहे. 

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नाव बदलण्याची केली मागणी

Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळींसह इतरां विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या नावात 'काठियावाड' असल्यानं शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा अमीन पटेलांचा आरोप आहे. तसेच वेश्या व्यवसाय चालणा-या तीन गल्ल्यांमुळे संपूर्ण कामाठीपुराचं नाव बदनाम करणं योग्य नसल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 

Nandurbar News: दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा

Nandurbar News: वाघोदा येथे दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. शिवदास उर्फ काल्या भाईदास ठाकरे असं त्याचं नाव आहे.

ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी


महाविकास आघाडी सरकारची ओबीसी आरक्षणावरची सर्वात मोठी परीक्षा 25 फेब्रुवारीला होणार आहे. कारण, ओबीसी आरक्षण प्रकरणात 25 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अंतरिम रिपोर्टनुसार निवडणुकांना परवानगी द्यावी  असा अर्ज राज्य सरकारकडून दाखल करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार की नाही याचे उत्तर याचं सुनावणीवर अवलंबून आहे.

Beed News: धक्कादायक! धारुरच्या किल्ल्यातील तोफ गोळे गायब

शिवप्रेमीनी अस्ताव्यस्त पडलेले तोफगोळे जमा करून 15 दगडी तोफगोळे किल्ल्यातील एका खोलीत ठेवले होते. धारूरच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवप्रेमींनी गड स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी मात्र किल्ल्यातील अनेक दगडी तोफ गोळे गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.

जळगाव पालिकेत भाजपची गळती सुरुच

जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजपची गळती सुरूच आहे. भाजपच्या नगरसेविका रुक्साना खान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला.

आमदार रवी राणा यांना ट्रान्झिट अँटीसिपेट्री बेल

Amravati :  आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने न्यायालयाने दिलासा दिला आहे.   रवी राणा यांना ट्रान्झिट अँटीसिपेट्री बेल मंजूर करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांवरील शाइफेकी नंतर आमदार राणा यांच्यावर पोलिसांनी 307 चा गुन्हा दाखल केला होता. आपल्याला ट्रान्झिट अँटीसिपेट्री बेल मंजूर झाल्याची माहिती आमदार राणा यांनी फोनद्वारे दिली आहे.  या निर्णयामुळे आमदार राणा यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Local | लोकल ट्रेनमध्ये केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट

Bombay HighCourt on Mumbai Local :  लोकल ट्रेन, मॉल्स, कार्यलय इथं केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा. कोरोनाकाळात इतकं छान काम केल्यानंतर आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असताना राज्याचं नाव बदनाम का करताय? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे.

Maharashtra Aaurangabad News Updates : घराबाहेर खेळण्यासाठी पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू 

Maharashtra Aaurangabad News Updates : घराबाहेर खेळण्यासाठी पडलेल्या तीन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू, औरंगाबादच्या दौलताबाद भागातील शरणापूर परिसरातील घटना असून, प्रतीक भिसे (15) तिरुपती उदळकर (17)  आणि शिवराज पवार 17 अशी मुलांची नाव 

Lalu prasad yadav news : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा, 60 लाख रुपयांचा दंड

#BREAKING : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा, 60 लाख रुपयांचा दंड 

Baramati Maharashtra News : बारामतीत दर्शन घेऊन चोरी, दानपेटी बाहेर ठेऊन पुन्हा गाभाऱ्यात येऊन घेतले देवीचे दर्शन, घटना सीसीटीव्हीत कैद

Baramati Maharashtra News : मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने आधी देवीचे दर्शन घेतले आणि चोरट्यानी मंदिरातील दानपेटी लंपास केल्याची घटना बारामती तालुक्यात घाडली आहे.  विशेष म्हणजे चोरट्याने दान पेटी मंदिराबाहेर नेल्यानंतर पुन्हा मंदिरात प्रवेश करून देवीचे दर्शन घेतले आणि पोबारा केला.  बारामती तालुक्यातील होळ येथील ढगाई देवीच्या मंदिरात 2 चोरट्यानी मध्यरात्री चोरी केली. ही चोरीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने मंदिरात प्रवेश केला. चोरी करण्याआधी देवीचे दर्शन केले आणि दुसऱ्या चोरट्याच्या साह्याने मंदिरातील दान पेटी बाहेर नेली. बाहेर गेल्यानंतर पुन्हा गाभाऱ्यात येऊन देवीचे दर्शन घेतले आणि पोबारा केला. दानपेटीत किती रुपये होते हे अद्याप समजू शकले नाही. परंतु चोरी करायच्या आधी आणि चोरी केल्यानंतर चोरट्याने देवीचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. दरम्यान बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे..


 
Nawab Malik News : नवाब मलिकांची मुंबई उच्च न्यायालयात हजेरी, कोर्टाचा अवमान केल्याबद्दल जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसवर प्रतिज्ञापत्र नवाब मलिकांच्या उपस्थित कोर्टात सादर

Nawab Malik News : नवाब मलिकांची मुंबई उच्च न्यायालयात हजेरी, कोर्टाचा अवमान केल्याबद्दल जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसवर प्रतिज्ञापत्र नवाब मलिकांच्या उपस्थित कोर्टात सादर, पुढील आठवड्यात होणार सुनावणी


ज्ञानदेव वानखेडेंनी दाखल केलीय नवाब मलिकांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल याचिका


समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपासयंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा अधिकार अबाधित, मलिकांचं स्पष्टीकरण 


नात्र नवाब मलिकांच्या स्पष्टीकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं असमाधान

Maharashtra Beed Parli news Update : परळीत भाजपा विरुद्ध काँग्रेस! दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने

Maharashtra Beed Parli news Update : परळीत भाजपा विरुद्ध काँग्रेस! दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने


कोरोना महाराष्ट्रात काँग्रेसने फैलावला असे वादग्रस्त वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.याचा जाहिर निषेध करण्यासाठी परळी शहर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयासमोर" मोदी माफी मांगो" आंदोलन केलं.  मात्र या सर्वांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांच्या कार्यालायसमोर येऊ दिले नाही 

Maharashtra Kolhapur News : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Maharashtra Kolhapur News : शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, वन्यजीवांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी मृत पावले पण मुर्दाड सरकारला जाग येत नाही, कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर स्वाभिमानीचे बेमुदत धरणे आंदोलन, शेतकऱ्यांच्या जमिनीवर जलविद्युत प्रकल्प उभा केले पण शेतकऱ्यांनाच दिवसा वीज दिली जात नाही- राजू शेट्टी

Weather Update : 2022 मध्ये मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के पाऊस राहणार, मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज

२०२२ सालात मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज


२०२२ मध्ये मान्सून सरासरीच्या ९७ ते १०४ टक्के पाऊस राहण्याचा अंदाज 


एप्रिल महिन्यात स्कायमेटकडून मान्सूनबाबत सविस्तर पूर्वानुमान सांगण्यात येणार

Mumbai : मुंबईतील चार प्रसिध्द उद्योगपतींच्या घरावर छापे,दक्षिण मुंबई आणि उपनगरात ईडीच पथक

Narayan Rane : महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने नोटीस काढली हे पहावे लागणार ABP Majha

Monsoon Update : 2022 मध्ये मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज

Mumbai News : काँग्रेसचा मोर्चा भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे; कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Mumbai News : काँग्रेसचा मोर्चा भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे; कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Pune News Live Updates ; पुण्यात आज काँग्रेस महिला आघाडीची रॅली, लडकी हूँ लड सकती हूँ या उपक्रमांतर्गत रॅलीचं आयोजन, गुडलक चौकातून निघणाऱ्या रॅलीसाठी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित

Pune News Live Updates ; पुण्यात आज काँग्रेस महिला आघाडीची रॅली, लडकी हूँ लड सकती हूँ या उपक्रमांतर्गत रॅलीचं आयोजन, गुडलक चौकातून निघणाऱ्या रॅलीसाठी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित

Mumbai News : काँग्रेसचा मोर्चा भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे रवाना; भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा धडकणार,  काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच खा. मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन

Mumbai News : काँग्रेसचा मोर्चा भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाकडे रवाना; भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा धडकणार, काँग्रेसच्या आंदोलनापूर्वीच खा. मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तीप्रदर्शन

Marathi Language :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची भेट

Marathi Language :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची दिल्लीतील परिवहन भवन येथे आज भेट घेतली. 

Maharashtra Latur News Updates : लातूर जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु 

Maharashtra Latur News Updates : लातूर जिल्ह्यात आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरु 


कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या जिल्हा परिषद, खाजगी शाळा बंद होत्या. आता कोविड १९ चा प्रभाव ओसरत असल्याने आजपासून अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पाचवी ते १२ वीपर्यंतच्या शाळा नियमांचे काटेकोर पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली ते चौथीच्या शाळांना परवानगी नव्हती. आता रितसर परवानगी मिळाल्याने लातूर जिल्ह्यातील अंगणवाडीसह पहिली ते चौथीच्या शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत . या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांनी पूर्ण तयारी करून जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविले आहे.

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वक्तव्याविरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक, भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयावर मोर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे पसरला असे वक्तव्य केल्यानंतर आता या विरोधात मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे.आज याबाबत जाब विचारण्यासाठी काँग्रेसने ईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे.जर काँग्रेस इथे आली नाही तर भाजप तिकडे येईल अशी चेतावणी भाजपकडून काँग्रेसला देण्यात आली आहे.त्यामुळे आता आम्ही कोटक यांच्या कार्यालय वर जाणारच अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.त्यामुळे मुलुंड येथील काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 



Kirit Somaiya LIVE : संजय राऊतांच्या तोंडी ठाकरेंची भाषा : किरीट सोमय्या

Kirit Somaiya LIVE : संजय राऊतांच्या तोंडी ठाकरेंची भाषा : किरीट सोमय्या https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Maharashtra Buldhana News Update : बुलढाणा : 22 वर्षीय युवकाचं विविध मागण्यांसाठी 300 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन, प्रशासनाने आश्वासन दिल्याने टॉवरवर युवक खाली उतरला 

Maharashtra Buldhana News Update : बुलढाणा : 22 वर्षीय युवकाच विविध मागण्यांसाठी 300 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन, दीड वर्षात याच टॉवरवर चढून आंदोलन करण्याची तिसरी वेळ , प्रशासनाने युवकाच्या  मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्याने टॉवरवर चढलेला युवक खाली उतरला 

Narayan Rane: नारायण राणेंच्या जुहूमधील अधीश बंगल्यात महापालिकेचं पथक दाखल, राणे बंगल्यात उपस्थित, बंगल्यासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

LIVE : नारायण राणेंच्या जुहूमधील अधीश बंगल्यात महापालिकेचं पथक दाखल, राणे बंगल्यात उपस्थित, बंगल्यासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात #NarayanRane #Mumbai https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA 

Maharashtra Sindhudurg News : आमदार नितेश राणे ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर

Maharashtra Sindhudurg News : आमदार नितेश राणे ओरोस पोलीस स्टेशनमध्ये हजर, संतोष परब हल्ल्याप्रकरणी नियमित जामीन देताना जिल्हा सत्र न्यायालयाने काही अटी शर्ती देत जामीन दिला होता. त्यानुसार दोष आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी ओरोस पोलीस स्टेशनमध्ये दोन तास 10 ते 12 या वेळेत हजेरी लावणे हा अटींनुसार ते हजेरी लावायला आले. हा दुसरा सोमवार आहे, मागच्या सोमवारी सुद्धा आमदार नितेश राणे आणि त्याचे स्वीय सहाय्यक राकेश परब ओरोस पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते

Mumbai Fire : मुंबईच्या जुहू परिसरातील प्रिंसेस हॉटेलमध्ये आग, लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु, अद्याप अग्निशामक दल घटनास्थळी आलं नसल्याची माहिती 

Mumbai Fire : मुंबईच्या जुहू परिसरातील प्रिंसेस हॉटेलमध्ये आग, लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु, अद्याप अग्निशामक दल घटनास्थळी आलं नसल्याची माहिती 

Maharashtra Osmanabad Bank Election News : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी, 9 जागा जिंकत सत्तेच्या चाव्या हाती

Maharashtra Osmanabad Bank Election News : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी, 9 जागा जिंकत सत्तेच्या चाव्या हाती



एकूण जागा 15


महाविकस आघाडी -09


भाजप- 0


विजयी उमेदवारांचे नावे (प्रथम नावे विजयी उमेदवारांचे)


1) बळवंत तंबारे( सेना)
2)बालाजी पाटील( सेना)
3) नागप्पा पाटील (काँग्रेस)
4 सुरेश बिराजदार ( राष्ट्रवादी)


5)संजय देशमुख (शिवसेना)


 

Karnataka Murder : कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव, जमावबंदी लागू, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Karnataka Murder : कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झालीय. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरातील शाळा बंद करण्यात आल्यात. 

निर्मला सीतारामण आज आणि उद्या अशा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर 

निर्मला सीतारामण आज आणि उद्या अशा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर; बजेटनंतर उद्योग, व्यापारी, मोठे करदाते आणि निवडक व्यावसायिकांशी संवाद साधतील 





शहीद जवान रोमित चव्हाण यांचं पार्थीव मूळगावी दाखल, आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील शिगावच्या रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आलं होतं. रोमित यांचं पार्थीव त्यांच्या मूळगावी दाखल झालयं. आज लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोमित यांचं फक्त 23 वर्षे इतकं होतं. दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. यात रोमित चव्हाणसह उत्तरप्रदेशच्या संतोष यादव यांनाही हौतात्म्य प्राप्त झालं...

Sanjay Raut on Kirit Somaiya : सोमय्यांबद्दल वापरलेल्या अपशब्दांबाबत राऊत ठाम, म्हणाले...

Sanjay Raut on Kirit Somaiya : किरीट सोमय्यांवर हल्लाबोल करताना शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या संजय राऊतांवर चोहो बाजूंनी टीका होतेय. असं असलं तरी संजय राऊत अजूनही त्या आक्षेपार्ह शब्दावर ठाम आहेत. काल नागपूर दौऱ्यावर असलेले संजय राऊत आज सकाळी पुन्हा मुंबईसाठी रवाना झालेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवराळ भाषेवरुन टीका करणाऱ्यांना संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय.


राजकारण करताना आणखी किती खालची पातळी गाठणार असा प्रश्न आता महाराष्ट्र विचारु लागलाय. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करणाऱ्या नेत्यांची भाषा देखील आता शिवराळ झालीय. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत दररोज माध्यमांशी संवाद साधताना सोमय्यांवर आरोपांच्या फैरी झाडतात. मात्र आज सोमय्यांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. सोमय्यांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊतांनी अपशब्द वापरलेत. नुसते अपशब्दच वापरले नाहीत, तर त्यावर ठाम असल्याचंही राऊत म्हणालेत. 

गिरीश महाजनांना राजकारणात मी आणलं, मात्र देशात बाप विसरणाऱ्यांची संख्या कमी नाही : एकनाथ खडसे

Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना राजकारणात आपण आणलं, त्यांना घडवलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले  आहेत, अशी जहाल टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला होता. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


International Mother Language Day : आज जागतिक मातृभाषा दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व


World Mother Language Day : जगभरात 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. युनेस्कोने 17 नोव्हेंबर 1999 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. 


जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास 1300 च्या आसपास मातृभाषा आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधता जोपासणे, त्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते. जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे, मातृभाषेचा प्रचार-प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते. 


21 फेब्रुवारी रोजी का साजरा करतात मातृभाषा दिवस



भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पश्चिम बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता दिली. 

 


 Eknath Khadse on Girish Mahajan : गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना राजकारणात आपण आणलं, त्यांना घडवलं, हे सगळ्या जगाला माहीत आहे. मात्र बापाला विसरणारे अनेक लोक आता जन्माला आले  आहेत, अशी जहाल टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे  नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असताना एका वाहिनीला मुलाखत देताना गिरीश महाजन यांनी कोण एकनाथ खडसे? असा सवाल उपस्थित केला होता. 


गिरीश महाजन यांच्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, गिरीश महाजन हे आता भाजपचे राष्ट्रीय नेते झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासाठी लहान कार्यकर्ता झालो आहे. मात्र असं असलं तरी गिरीश महाजन यांना राजकारणात आपण त्यांना जन्माला आणले. त्यांना घडविलं आहे. त्यांना तिकीट मिळवून देण्यात आणि विजय मिळवून देण्यास त्यांना मदत केली असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.