Maharashtra Breaking News LIVE Updates : केजमध्ये ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंड्यासह हजारो भक्त पावनधामवर दाखल.
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
1. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं, सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांनीच गोळ्या झाडल्याची साक्षीदारांची न्यायालयाला माहिती
2. महाराष्ट्रातल्या 21 जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर, कोरोनावर मात करणाऱ्यांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांचा सर्वाधिक समावेश, राज्यभरातील रुग्णसंख्या शंभराच्या आत
3. निवडणुकांसाठी शिवसेना अॅक्शन मोडमध्ये, शिवसंपर्क अभियानातंर्गत उद्धव ठाकरे 19 खासदारांशी आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार
4. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलानं आणि सहकाऱ्यांनी पावणे सात कोटींची फसवणूक केली, नाशिकमधील व्यापाऱ्याचा आरोप, न्यायालयाच्या आदेशानंतर 15 जणांवर गुन्हा
5.कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराला तडे, मंदिरातील वीस दगडी खांबाना भेगा, मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याची गावकऱ्यांना भीती
6. नितीन गडकरींचे महाराष्ट्राला गिफ्ट; 2100 कोटींहून अधिकच्या रस्ते कामांना मंजूरी
7. कोकण किनारपट्टीला 'असनी' चक्रीवादळचा धोका नाही; फेक मेसेज व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण
Asani Cyclone In Konkan : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच कोकणात असनी चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. यापूर्वी 'निसर्ग' आणि 'तौक्ते' या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे आणि उत्पन्नाचे साधन असलेली आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळेच पुन्हा चक्रीवादळ येणार, या शक्यतेने नागरिक घाबरले होते. मात्र प्रशासनाने स्पष्टीकरण दिल्यानंतर नागरिकांची जीव भांड्यात पडला आहे. एकीकडं राज्यात उन्हाची काहीली वाढत असतानाच, दुसरीकं काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रामध्ये पूर्व मोसमी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिह्यांमध्ये दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, यावरुन महाराष्ट्रातील ऋतुचक्र बदलत असल्याचे दिसत आहे.
8. कोकण, गोव्यासह पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज
9. GST विभागाची मोठी कारवाई, सुमारे 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक
10. जपान भारतात 4 हजार 200 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार, पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यात चर्चा
धुळे: मुलीच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू...
मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार
मुंबई- मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार. राज ठाकरेंकडून हॅलीकॉप्टरने पुष्पवृष्ठी, तर अमित ठाकरे शिवजयंतीसाठी शिवनेरीवर
अमरावतीत बायोकोल बनवणाऱ्या फॅक्टरीला आग
अमरावतीच्या दाभा गावातील बायोकोल बनविणाऱ्या फॅक्टरीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचा कच्चा माल जाळून खाक झाला आहे. दाभा येथील संकल्प इंडस्ट्रीजमध्ये इंधनासाठी वापरले जाणारे लाकडी ठोकळे म्हणजेच बायोकोल तयार करण्यात येते. दुपारच्या वेळी फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या शेतात आग लागली त्यानंतर ही आग फॅक्टरीच्या आवारात असलेल्या कच्च्या मालाच्या गोडाऊन पर्यंत पोहचली आणि आगीने रौद्ररूप धारण करत मोठे नुकसान केले.
माणिकराव ठाकरे यांना मातृशोक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा माजी गृहराज्य मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या मातोश्री सुमित्राबाई गोविंदराव ठाकरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 102 व्या वर्षी यवतमाळ येथे दुःखद निधन झाले, त्यांच्या पश्चात एक पुत्र माणिकराव ठाकरे, तीन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहेत. त्यांचे पार्थिवावर त्यांचे गावी हरू ता.दारव्हा जि. यवतमाळ येथे दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
कश्मीर फाईल्स सिनेमाच्या समर्थनार्थ उल्हासनगरात बजरंग दल रस्त्यावर
कश्मीर फाईल्स सिनेमाच्या समर्थनार्थ आज उल्हासनगर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समर्थनार्थ रॅली काढली आहे. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.