Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 02 Feb 2022 06:43 PM
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे.

देशातील बेरोजगारांबद्दल एकही शब्द नाही : राहुल गांधी

राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधीचं लोकसभेत भाषण. देशातील बेरोजगारांबद्दल एकही शब्द नाही, गेल्या पन्नास वर्षातील सर्वात अधिक बेरोजगारी सध्या देशात आहे. टीका केल्यास केंद्र सरकारला का सहन होत नाही?, राहुल गांधींचा सवाल. 

गेल्या वर्षी देशात 3 कोटी लोक बेरोजगार झाले : राहुल गांधी

गेल्या वर्षी देशात 3 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. देशातील बेरोजगारांबाबत एकही शब्द काढलेला नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 

आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस  कोठडी

आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत  पोलीस  कोठडी देण्यात आली आहे

बीडमधील मांगवडगावच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप
दोन वर्षांपूर्वी बीडच्या केस तालुक्यातील मांगवडगावमध्ये शेतीच्या जुन्या वादातून तिघांची निर्घृण हत्या झाली होती. या तिहेरी हत्याकांडातील पाच आरोपींना आज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. तर अन्य आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. पाच आरोपी सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटु मोहन निंबाळकर, बाळासाहेब बाबुराव निंबाळकर, राजाभाउ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 
वसुलीच्या नावाखाली महावितरण कार्यालयातून अधिकारी गायब, मनसेचे बुलढाणा कार्यालयात आंदोलन

 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील महावितरणच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसतो. तर अधिकाऱ्यांचे फोन सुद्धा नॉट रीचेबल येत असतात, सदर कर्मचारी वसुलीच्या नावाखाली गैरहजर राहत असल्याच्या आरोप करत महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. अधिकाऱ्यांच्या दांड्या मारण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 5 दिवसाच्या आत या कार्यालयामध्ये तक्रारी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने कार्यकारी अभियंता शेगावकर यांना निवेदन द्वारे दिला आहे.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन


शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. उद्या सकाळी 11 वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाबर पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांवरील उपचारासाठी ते खाजगी रुग्णालयात दाखल होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळेच 26 जानेवारीला ते त्यांच्या बँकेत ध्वजारोहणासाठी हजर होते. पण त्यानंतर पुन्हा अपचनामुळं त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना चिंचवडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मात्र तब्येत खालावल्याने पुढच्या उपचारासाठी बाणेरच्या खासगी रुग्णालयात भरती करण्या आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

पंजाबमध्ये आज काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणार

पंजाबमध्ये आज काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता  घोषणा होणार आहे.  चरणजीत सिंह चन्नी की नवज्योत सिंह सिद्धू याचा फैसला काँग्रेस करणार  आहे. 20 तारखेला पंजाबमध्ये मतदान असून त्याआधी काँग्रेस  मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणार आहे.  आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी भगवंत मान यांचं नाव जाहीर केलं आहे. आता पाठोपाठ काँग्रेसही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार आहे. 

भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी

भाजप आमदार नितेश राणे हे  सिंधुदुर्ग सत्र न्यायलयात शरण आले. त्यांना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

भाजप आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला, सिंधुदुर्ग कोर्टाला शरण जाण्याची शक्यता

भाजप आमदार नितेश राणे यांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. नितेश राणे हे कोर्टाला शरण येण्याची शक्यता आहे. 

माहापालिका निवडणुकांच्या कामाला लागा; राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

माहापालिका निवडणुकांच्या कामाला लागा; राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये- राज ठाकरे 



मुंबई: दादरमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; पेगासस प्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर

दादरमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने पेगासस प्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर.





समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार आहे. या संदर्भात आजच आदेश येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार नितेश राणे यांचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Dhule : ट्रक पलटी झाल्यानं भीषण स्फोट केमिकल टॅंकर आगीत खाक , आगीच चालकाचा मृत्यू : ABP Majha

मुंबई, लगतची उपनगरं, पुणे, नाशिकच्या महापालिकांचा प्रारुप आराखडा जाहीर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि उल्हासनगर महापालिकांसाठीही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. किती प्रभाग वाढले, किती कमी झाले याशिवाय प्रभागांची झालेली पुनर्रचना  यासंबंधीचे सविस्तर चित्र यानिमित्तानं स्पष्ट झालं. त्यानिमित्तानं या तिन्ही शहरांमध्ये आता राजकीय रणधुमाळी आणि डावपेचांना सुरुवात होणार आहे. तिन्ही शहरांच्या महापालिकांकडून प्रभागरचनेच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्या याद्या पाहण्यासाठी विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. 

मुंबईतल्या वॉर्ड रचनेवर भाजपचा तीव्र आक्षेप, हरकती नोंदवण्यासाठी आज बैठकीचं आयोजन

मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यानंतर भाजपानं त्याला आक्षेप घेतलाय. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डचं विभाजन केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या आराखड्याला विरोध करण्याची भूमिका भाजपनं घेतलीय. 14 फेब्रुवारीपर्यंत आयोगानं सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्यामुळे प्रारुप आराखड्यावर हरकत घेण्याचं भाजपनं ठरवलंय. त्यासाठी भाजप नगरसेवकांची बैठक आज दुपारी 3 वाजता होणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी भाजपची रणनीती या बैठकीत ठरणार आहे.

तळघरात 650 लॉकर्स, कोट्यवधींची रोकड; माजी IPS अधिकाऱ्याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

नोएडामधील माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरातील तळघरात साडेसहाशे लॉकर्समध्ये कोट्यवधीची काळी माया आढळलीय. माजी सनदी अधिकारी आर.एन.सिंह यांच्या घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यात कोट्यवधींची रक्कम सापडलीय. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. आयकर विभागाने तळघरात तपासणी केली असता या लॉकरमध्ये कोट्यवधींची रक्कम आणि दागिने सापडलेत. ही रोकड आणि दागिने कुणाचे आहेत याबाबतची माहिती मिळालेली नाही. आर.एन.सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. त्यामुळे या लॉकरशी आपला संबंध नसल्याचा दावा आर.एन.सिंह यांनी केलाय. छापेमारीत सापडलेली सर्व संपत्ती जप्त करणार असल्याची घोषणा कालच्या अर्थसंकल्पात करण्यात आलीय. त्यामुळे आर.एन.सिंह यांच्या घरात सापडलेली ही काळी माया जप्त करण्यात येणार आहे. 

300 कोटींचं बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानं केलं अपहरण

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली. मात्र हा क्रिप्टोकरन्सीचा मोह कुणाला कोणत्या पातळीवर घेऊन जाईल याचा नेम नाही. पिंपरी चिंचवडमध्ये याचाच प्रयत्य आला. 300 कोटींचे बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात पोलिसानं गुन्हेगाराचीच मदत घेतल्याचं निष्पन्न झालंय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस शिपाई दिलीप खंदारेसह 8 आरोपींना गजाआड केलंय.. विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे 300 कोटींची बिटकॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे अशी माहिती खंदारेला एका सायबर गुन्ह्याचा तपास करताना मिळाली होती. यातून आपण मालामाल होऊ अशा विचारातून खंदारेनं विनय नाईकच्या अपहरणाचा डाव रचला. खंदारेनं प्रदीप काटे नावाच्या व्यक्तीच्या मदतीनं ताथवडे गावातल्या एका हॉटेलमधून विनय नाईकचं अपहरण केलं. पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत या प्रकरणात 8 आरोपींना गजाआड केलंय..

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


New Corona Guidelines : राज्यासह मुंबईतही कोरोना निर्बंध शिथील; पाहा काय सुरु, काय बंद?


Maharashtra New Corona Guidelines : संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून म्हणजेच, 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच, लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

 

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी 20 व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने. मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.

 

नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?


  • नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावं लागेल. 

  • सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण झालेलं असावं. 

  • स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये 50 टक्के उपस्थिती असावी.

  • अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात. 

  • उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेनं.

  • अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील.

  • हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार


मुंबईकरांनाही दिलासा! मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली

 

कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असल्यानं  मुंबईत पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथील (Mumbai New Corona Guidelines) करण्यात आले आहेत. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क खुले होणार आहेत. याशिवाय स्विमींग पूल, वॉटर पार्क, थिम पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु होणार आहेत.

 

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. मुंबईतील रुग्णसंख्या दोन दिवसापासून हजाराच्या आत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याने मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.  लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?

 

पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क  सुरु राहणार

अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु होतील. 

हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची 50 टक्के क्षमतेनं सुरु

लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी

 भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना 50  क्षमतेनं परवानगी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.