Maharashtra Breaking News 19 July 2022 : मलाही युती करायची होती; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी एक तास चर्चा झाल्याची माहिती 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jul 2022 06:25 PM
Shivsena BJP : भावना गवळींचा व्हिप सर्व खासदारांना लागू, शिंदे गटाचा दावा

शिवसेनेच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद या भावना गवळी याच असून त्यांचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू असेल असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Shivsena BJP : आम्ही आजही एनडीएमध्ये, संजय राऊतांनी युतीमध्ये खोडा घातला; राहुल शेवाळेंचा आरोप

भाजपशी युती करण्याविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनीच आपल्याला युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला सांगितलं होतं. त्यानंतर युतीमध्ये संजय राऊतांनी खोडा घातला असा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला. आम्ही आजही एनडीएचे घटक आहोत असंही ते म्हणाले. 

Shivsena BJP : मलाही युती करायची होती; उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींशी एक तास चर्चा झाल्याची माहिती 

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाली होती असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मलाही युती करायची होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचं ते म्हणाले. 

Shivsena BJP :उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा झाली; खासदार राहुल शेवाळे

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाली होती असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. मलाही युती करायची होती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. युतीबाबत उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचं ते म्हणाले. 

युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झालेली : राहुल शेवाळे

युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झालेली असे राहुल शेवाळे म्हणाले. 

मुख्य प्रतोद भावना गवळी असल्याचं पत्र ओम बिर्लांना दिलं: एकनाथ शिंदे

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांचा उल्लेख गटनेते म्हणून केला. तर खासदार भावना गवळी यांचा उल्लेख त्यांनी मुख्य प्रतोद म्हणून केला. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, भावना गवळी या मुख्य प्रतोद असून याबाबतचं पत्र आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं आहे.

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्य सरकारला पाठिंबा: एकनाथ शिंदे

आम्ही जी भूमिका घेतलीय ती बाळासाहेबांच्या विचारांची आहे, तीच भूमिका आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली आहे. तशा आशयाचं आज पत्र आम्ही लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेला आणि राज्य सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाठिंबा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

लोकसभा अध्यक्षांना 12 खासदारांचं गट असल्याचं पत्र दिलं: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी सागितलं आहे की, लोकसभा अध्यक्षांना 12 खासदारांचं गट असल्याचं पत्र दिलं आहे.

Eknath Shinde Press Conference: एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद सुरू, शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पत्रकार परिषद सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित आहेत.  

खासदार संजय राऊत यांचे ट्वीट
खासदार संजय राऊत यांचे ट्वीट
Eknath Shinde Press Conference: थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पत्रकार परिषद, शिवसेनेचे 12 खासदार शिंदेंसोबत

थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित आहेत.  

Nagpur Covid Update : कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा दोनशेपार, 42 रुग्ण हॉस्पिटलमध्ये

नागपूरः जिल्ह्यात कोरोना बाधितांची संक्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार 208 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 140 बाधितांनी (Covid Positive) कोरोनावर मात केली आहे. बाधितांपैकी 133 रुग्ण शहरातील असून 75 बाधित ग्रामीणमधील आहेत. सध्या जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 1262 वर पोहोचली आहे. यापैकी तब्बल 42 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1220 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

नंदुरबारमध्ये आईसोबत गुरे चारायला गेलेल्या तीन वर्षांच्या बालकावर बिबट्याचा हल्ला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील नवीन पुनर्वसन सरदारनगर भागात आईसोबत गुरे चारण्यासाठी गेलेल्या तीन वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला असून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तळोदा तालुक्यातील घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी बिबट्याचा वावर असून या भागात अनेक बिबटे आहेत. त्यामुळे अशा अनेक घटना होत असतात. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरामध्ये अनेक प्राणी आहेत, मात्र सर्वाधिक बिबट्या असल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून गावकऱ्यांकडून गावात येणाऱ्या बिबट्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे.



संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली

संसदेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात कार्यालयाचा ताबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन तृतीयांश पेक्षा अधिक बहुमत असल्याचं सांगत गटनेते पदावर देखील शिंदे गटाने दावा केलाय. 

Politics : शिंदेसेनेची विदर्भातील शिवसैनिकांना 'ऑफर', पांडव कॉलेजमध्ये बैठक

नागपूरः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांनी सर्व पातळींवरुन फिल्डिंगला सुरुवात केली आहे. शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात विदर्भात दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सहभागी होण्याचे आवाहन केले जात असून या करिता चांगल्या पदाची ऑफरही दिली जात आहे. या सदंर्भात नुकतीच उमरेड मार्गावरील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीत जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती हे विशेष. शिवसेनेला सर्व पातळ्यांवर चित्त करण्यासाठी शिंदे समर्थकांनी कंबर कसली असल्याचे चित्र आहे.

तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी 

आज सकाळी सिंगापूर येथील तेलवाहु कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आले आहे. 


 त्यामुळे बार्ज मधील तेल आणि इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या आहेत. 


या बार्जवरील कर्माचारी सुखरूप आहेत.


 किनाऱ्यावरील नागरिकांनी वाहून किनारी आलेल्या वस्तूंना हात लावू नये.तसेच काही संशयित वस्तू बाबत समजून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Hingoli News : शिंदे गटात सहभागी होणार असल्यानं सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त
Hingoli News : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात सहभागी होणार आहेत. हेमंत पाटील हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. परंतु आता तेसुद्धा शिंदे गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंगोली पोलिसांच्या वतीने हेमंत पाटील यांच्या हिंगोली मधील कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंगोली पोलिसांच्या वतीने आज सकाळीच हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये एका बंदूकधारी कर्मचाऱ्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 
शिवसेनेच्या 12 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; नव्या गटनेतेपदासंदर्भातलं पत्र दिलेलं नाही

लोकसभा अध्यक्षांना नव्या गटनेतेपदासंदर्भातलं पत्र अजूनही दिलं गेलेलं नाही


काही शिवसेना खासदारांनी आत्ता लोकसभा अध्यक्षांच्या दालनात भेट घेतली


पण अजूनही खासदारांची संख्या आणि त्या संदर्भातले नियम यावर चर्चा चालू


पत्र आज संध्याकाळी किंवा उद्या दिलं जाण्याची शक्यता

Aurangabad: उद्याचा न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा म्हणून खैरेंकडून पूजा

उद्याचा न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा आणि शिवसेनेवरील संकट दूर व्हावे म्हणून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून पूजा करण्यात आली आहे. औरंगाबादमधील दौलताबाद येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरामध्ये ही पूजा करण्यात येत आहे. उद्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत न्यायालयात सुनावणी होणार असून, निकाल शिवसेनेच्या बाजुने लागावा यासाठी खैरे यांनी पूजा केली आहे.

Mumbai Crime News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांटी भेट

Mumbai Crime News : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. 


संजय पांडे विरुद्ध 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सीबीआय आणि ईडीची चौकशी सुरू आहे, ज्यामध्ये सीबीआयने संजय पांडे यांचीही चौकशी केली आहे.

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; निलेश कोकणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत, प्रकृती स्थिर

Nashik News : शिवसेना पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शिवसेना मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर हा हल्ला झाला. अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येऊन  हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एमजी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे.

चिपळूणच्या वाशिष्टी नदीचा गाळ काढण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून डीपीआर मागवला

Ratnagiri News : चिपळूणच्या वाशिष्टी नदीचा गाळ काढण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून डीपीआर मागवला आहे. केंद्रीय जलवाहतूक, बंदर विकास आणि पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून निकम आणि दळवी यांनी प्रयत्न केले होते. चिपळूणमधील वाशिष्टी नदीसोबतच महाडमधील कुंडलिक आणि सावित्री नदीबाबत देखील केंद्र सरकार सकारात्मक आहे. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर नद्यांमधील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.



मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, मुंबई विधानसभा निहाय आढावा घेणार

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे स्वतः मुंबई विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. आज ईशान्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. 

Bhupinder Singh : प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं निधन

Bhupinder Singh : प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं रात्री निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मार्गारेट अल्वा आज अर्ज भरणार

विरोधकांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. जगदीप धनकट यांनी कालच एनडीएचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय.  उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती पदभार स्वीकारतील. 

नुपूर शर्मांच्या याचिकेवर सुनावणी

पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्र, प. बंगाल आणि तेलंगणा येथे नऊ गुन्हे दाखल आहेत.  एफआयआर दिल्लीला ट्रांसफर करण्याबाबत नुपूर शर्मांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रात सुनावणी होईल. 

महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवन परिसरात आंदोलन

संसदेचं पावसाळी अधिवेशनचा  आज दुसरा दिवस आहे.  अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे.

Maharashtra Rain Updates : विदर्भात पावसाचं थैमान; आजही मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Updates : वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.  

Maharashtra Politics : मुख्यमंत्री दिल्लीत, शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट आजच होण्याची शक्यता

Maharashtra Politics : शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत... 


मुख्यमंत्री दिल्लीत, शिवसेनेची राष्ट्रीय पातळीवरची फूट आजच होण्याची शक्यता


शिवसेनेतील 12 खासदारांना घेऊन आज मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत व्हीप असा दावा करत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलंय. मुख्यमंत्री काल रात्री दिल्लीत दाखल झालेत. 


विदर्भात पावसाचं थैमान... आजही मुसळधार पावसाचा अंदाज


वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे.  आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत.  


महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवन परिसरात आंदोलन


संसदेचं पावसाळी अधिवेशनचा  आज दुसरा दिवस आहे.  अधिवेशनात महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून संसद भवन परिसरातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे.


नुपूर शर्मांच्या याचिकेवर सुनावणी


पैगंबरांवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्र, प. बंगाल आणि तेलंगणा येथे नऊ गुन्हे दाखल आहेत.  एफआयआर दिल्लीला ट्रांसफर करण्याबाबत नुपूर शर्मांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दुपारच्या सत्रात सुनावणी होईल. 


मार्गारेट अल्वा आज अर्ज भरणार


विरोधकांच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. जगदीप धनकट यांनी कालच एनडीएचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय.  उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती पदभार स्वीकारतील. 


प्रसिद्ध गायक आणि गझलकार भूपिंदर सिंह यांचं निधन


भूपिंदर सिंह यांचं रात्री निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबईतील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


श्रीलंका संकटावर सर्वपक्षीय बैठक


केंद्र सरकारने श्रीलंका संकटावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि एस जयशंकर हे श्रीलंकेतील सध्य स्थितीबाबत माहिती देतील. 


श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार


श्रीलंकेत 20 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.