Maharashtra Breaking News LIVE Updates : कोल्हापुरात 30 लाख 67 हजारांची दारु जप्त

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Mar 2022 04:10 PM
 Solapur News Update : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीचा 76 लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त 

Solapur News Update : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीचा तब्बल 76 लाखांचा विदेशी मद्यसाठा पकडला आहे. गोव्यावरुन सोलापूरमध्ये कंटेनरद्वारे  येणाऱ्या 890 मद्य पेट्यांसह 76 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद गावजवळ हा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत कंटेनर चालक ज्ञानेश्वर भोसले याला अटक केली असून मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ भोसलेसह इतर 3 आरोपी फरार आहेत.    

विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्यनारायणाचा प्रकोप
विदर्भ आणि मराठवाड्यात सूर्यनारायणाचा प्रकोप, विदर्भातील अकोल्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद, अकोल्यातील तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर

 

महाराष्ट्रातील अनेक स्थानकांवर आज कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेल्याची नोंद, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम 

 

विदर्भातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पारा ४०शी पार, कालही चंद्रपुरात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर 

 

उत्तर महाराष्ट्रातलाही पारा वाढला, जळगावात कमाल तापमान ४२.६ अंशांवर तर मराठवाड्यात परभणीत ४१.२ अंशांवर पारा 

 

औरंगाबाद आणि नांदेडात कमाल तापमान ४० अंशांवर
kolhapur news update : शिवसेनेनं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडला, थोड्याच वेळा होणार अधिकृत घोषणा  

kolhapur news update : शिवसेनेनं कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला सोडला आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक शिवसेना लढवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून थोड्याच वेळात मुंबईतून याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर निवडणूक लढवण्यासाठी उस्तुक होते.  

Pune News Update : वीस रुपयांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर एक वर्षापासून लैंगिक आत्याचार, दौंडमधील धक्कादायक घटना 

Pune News Update : अकरा वर्षांच्या मुलीला वीस रुपयांचे आमिष दाखवून एका वर्षापासून लैंगित आत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. घरी कोण नसल्याचा गैरफायदा घेत या मुलीवर आत्याचार करण्यात आले. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यात घडली आहे. आत्याचार करणाऱ्या नराधमाला पाटस पोलिसांनी अटक केली आहे. मयुर पांडुरंग फडके( वय 18 ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

रायगड - कर्जतमध्ये पाण्याच्या डोहात दोन पर्यटक बुडाले

रायगड - कर्जतमध्ये पाण्याच्या डोहात दोन पर्यटक बुडाले...


  खांडपे गावाजवळील डोहात दोन मुलांचा बुडून मृत्यू...


ठाणे येथील २० वर्षीय तरुण अक्षय दोडिया याचा मृत्यू...


एका मुलाला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले आहे दुसऱ्या मुलाचा शोध सुरू..

कोल्हापुरात 30 लाख 67 हजारांची दारु जप्त

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला. गोवा बनावटीची साधारण 30 लाख 67 हजारांची दारु जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक केली असून इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

पुण्यात सोन्याच्या दुकानात खरेदीच्या उद्देशाने आलेल्या तरुणींनी चोरी केली

पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील एका सोन्याच्या दुकानात खरेदीच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणींनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं दोघींचा शोध सुरु आहे. बिबवेवाडी परिसरातील पारख ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. या संदर्भात तेजल मुनेश्वर आणि सुमेधा मुनेश्वर या दोन तरुणींच्या विरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशा पद्धतीने तरुणींनी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली

महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या राजू शेट्टी यांची भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली. राजू शेट्टी यांनी आजच एबीपी माझाशी बोलताना महाविकास आघाडीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान राजू शेट्टी भाजपसोबत आले तर स्वागत करु असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित कदमांचे नाव जवळपास निश्चित 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित (नाना) कदम यांचे नाव जवळपास निश्चित 


गेल्या दहा वर्षापासून नाना कदम हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक 


2014 सत्यजित (नाना) कदम यांनी काँग्रेस कडून विधानसभेची निवडणूक लढवली होती 


सत्यजित (नाना) कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक

देशासह राज्यभरात धुळवड उत्साहात साजरी

देशासह राज्यभरात धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच मुंबईतील नेपियन-सी रोडवरील प्रियदर्शनी पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्यावतीनं इको-फ्रेंडली धुळवडीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कलरऐवजी गुलाबांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला. 
सोबतच पारंपरिक वाद्यांसह पारंपरिक पद्धतीची गाणी देखील ह्या ज्येष्ठ नागरिकांकडून गायली गेली.

Parel : परळच्या हिंदमाता ब्रिज वरती टॅम्पोची कारला धडक; अपघातात तीन जण जखमी

Parel :  मुंबईतील परळच्या हिंदमाता पुलावर भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात तीन जण जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान या अपघातामुळे पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.त्यानंतर आता पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुुरु आहेत.

Kolhapur News : करुणा मुंडे-शर्मा लढवणार कोल्हापुरातून निवडणूक

कोल्हापूर - करुणा मुंडे-शर्मा लढवणार कोल्हापुरातून निवडणूक


शिवशक्ती सेने तर्फे स्वतः उतरणार रिंगणात


कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढणार


पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुंडे उतरल्या

Solapur Barshi News : बार्शीतील जवान रामेश्वर काकडे यांना छत्तीसगड येथे कर्तव्यावर असताना वीरगती प्राप्त

Solapur Barshi News : सोलापुरातल्या बार्शीतील जवान रामेश्वर काकडे हे बुधवारी छत्तीसगड येथे कर्तव्यवर असताना शहीद झाले. रात्री दीड वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शहीद रामेश्वर काकडे हे बार्शीतील गौडगाव येथील रहिवासी होते. शहीद जवान रामेश्वर काकडे हे 2012 साली सैन्यदलात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध भागात सेवा बजावली. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात ही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांच्यावतीने देण्यात आली. काल रात्री उशिरा त्यांचे पार्थिव शरीर बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला. तर यावेळी सीआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव शहीदाला अखेरचा सलाम देण्यासाठी हजर होते. शहीद रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.

घाबरु नका, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही : Sharad Pawar

Sharad Pawar on BJP : राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) युवा आमदारांनी काल (गुरुवारी) शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 


देशात काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाचपैकी चार राज्यांत एकहाती सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं बाजी मारली. याच निवडणुकांच्या निकालांबाबत युवा आमदारांनी शरद पवारांसमोर आपापले प्रश्न मांडले. त्यानंतर बैठक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Holi Dhulivandan Guidelines : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड; मुंबईसह राज्यभर धुळवडीचं आयोजन

Holi Dhulivandan Guidelines :  होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 


मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं


कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. काल 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला गेला. निर्बंध हटवल्यानं होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध भागांमध्ये आपापल्या परंपरांनुसार होळी साजरी करण्यात आली.

Holi Dhulivandan Guidelines : राज्याच्या गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना आणि नवी नियमावली

Holi Dhulivandan Guidelines : राज्यात आज धुळवड राज्यभरात धुमधडाक्यात साजरी होणार आहे.. राज्य सरकारकडून होळी, धुळवडीवर कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. 



  • कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.

  • एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

  • होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.

  • तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. 

  • कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे

Holi Dhulivandan Guidelines : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड! कोरोनानं बेरंग केल्यानंतर दोन वर्षांनी देशभरात निर्बंधमुक्त रंगांची उधळण

Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Dhulivandan : आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; कुठलेही निर्बंध नाहीत पण...


Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 


राज्याच्या गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली


-कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.


-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.


-होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.


- तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. 


-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे


Sharad Pawar on BJP : घाबरु नका, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही : शरद पवार


Sharad Pawar on BJP : राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) युवा आमदारांनी काल (गुरुवारी) शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 


देशात काही दिवसांपूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या निकालांमध्ये पाचपैकी चार राज्यांत एकहाती सत्ता मिळवली, तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं बाजी मारली. याच निवडणुकांच्या निकालांबाबत युवा आमदारांनी शरद पवारांसमोर आपापले प्रश्न मांडले. त्यानंतर बैठक संपल्यानंतर ज्यावेळी सर्व आमदार जाण्यासाठी निघाले. त्यावेळी शरद पवार उभे राहिले, त्यांनी दोन्ही हात उंचावले आणि आपल्या हाताची मुठ बंद करुन म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. आम्ही राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही. 


भाजपच्या नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही : शरद पवार 


भाजप जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे, असं शरद पवार युवा आमदारांशी बोलताना म्हणाले. महत्त्वाची बाब म्हणजे, दिवसाला 24 तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत. जे भाजप नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे. त्यासोबतच शरद पवारांनी युवा आमदारांना को-ऑपरेटिव्ह सेक्टर आणि सामाजिक क्षेत्रांशी जोडण्याचाही मंत्र दिला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.