Maharashtra Breaking News LIVE Updates : रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे..शिवसेना आमदारांनी महिलेला मारहाण केल्या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार आमच्या गावात भाजपच्या शाखेच उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. याचा राग मनात धरून आज आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका वर्षश्राद्धाच कार्यक्रमाला आलो असता,आमदार रमेश बोरणारे यांच्यासह कुटुंबातील 9 सदस्यांनी मला मारहाण केली . तसेच रस्त्यावर खाली पाडून लाथानी मला मारलं असल्याचं महिलेनं म्हटलं आहे. तसेच यावेळी माझ्यासोबत माझ्या पतीला सुद्धा मारहाण केली असल्याच तक्रारीत महिलेनं म्हटलं आहे..!
Shiv Sena MLA Sunil Raut : शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पवई पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी आमदार राऊत यांनी या आंदोलनावेळी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंबंधी आता राणेंच्या घरी महापालिकेचं पथक पोहोचलं आहे.
आमदार रवी राणा सह 12 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता..
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील एसीची केली होती 2017 मध्ये केली होती तोडफोड..
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल...
भातकुली मधील पाणी प्रश्नावर आमदार रवी राणासह कार्यकर्त्यांनी केले होते आंदोलन...
जिल्हा परिषदच्या सीओ यांच्या कक्षातील टेबल वरून चढून केलं होतं आंदोलन आणि केली होती बॅनरबाजी..
29 मे 2017 मध्ये घडली होती घटना..
गाडगे नगर पोलीस स्टेशन मध्ये झाला होता गुन्हा दाखल.
संजय राऊत पत्रकार परिषदेमध्ये घाम पुसत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजे. कितीही आव आणला तरी घाबरलेला माणूस कसा दिसतो, हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्यासाठी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद मधला व्हिडिओ ट्विट केल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई महानगर पालिकेने नोटीस पाठवली आहे. त्यानंतर राणे कुटुंबीयांकडून पहिलीच प्रतिक्रीया समोर आली आहे.
महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने हे सर्व पाहतेय. राणे कुटुंबीय असो , किरीट सोमय्या असो की देवेंद्र फडणवीस जे जे या सरकार विरोधात बोलतात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न हे करतात. हे खुल्या मैदानात आमच्याशी लढू शकत नाहीत. मैदानात हरायचं आणि शेमड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. त्यांना ज्या ज्या प्रकारे लढायचं आहे ते येऊदे अंगावर, आम्ही घाबरत नाही. मात्र कायदेशीर उत्तर नोटीसीला देणार आहोत.
किरीट सोमय्या आणि संजय राऊत हे पत्रकार परिषद घेऊन दौरे काढून राज्यातील शांतता भंग करीत असल्याने त्यांना राज्यातील शांतता भंग करण्यापासून बंदी घालावी अशा मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.. इंडिया अंगेंस्ट कारप्शचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.. सदरची याचिकाही अँड आर, एन. कच्छवे यांच्या मार्फत दाखल करण्यात आली आहे..
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक मोठी प्रतिष्ठेची होती. निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद बाजी मारली होती. जिल्हा बँक अध्यक्ष पदावर संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आलेले नितेश राणेंचे समर्थक मनिष दळवी यांची निवड करण्यात आली होती. दरम्यान स्वीकृत संचालक पदासाठी आमदार नितेश राणे यांचे नाव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कडून निश्चित करण्यात आले होते आणि आज जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदी नितेश राणेंची निवड करण्यात आली. दोन महीन्यापुर्वी आमदार नितेश राणे यांची थकबाकी असल्याचे कारण देत बँक निवडणुकीत मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा बँकेचे मतदार असलेले संतोष परब हल्ला प्रकरणातील सूत्रधार म्हणून आमदार नितेश राणेंचे नाव आल्यामुळे ही निवडणूक गाजली होती. मात्र आमदार नितेश राणे या संपूर्ण निवडणुकीत किंग मेकर च्या भूमिकेत होते आणि आता आमदार नितेश राणे स्वतः जिल्हा बँकेत स्वीकृत संचालक पदी निवड झाल्यामुळे जिल्हा बँकेच्या वर्तुळात एक वेगळे ट्विस्ट निर्माण झाले आहे.
Solapur : वैराग नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष पदी सुजाता संगमेश्वर डोळसे तर उपनगराध्यक्षपदी निरंजन भुमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैराग ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर पहिलीच निवडणूक लागल्याने सर्व प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावली होती. यामध्ये राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवत 13 जागा पटकावल्या होत्या. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी निघालेल्या आरक्षणात अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव निघाल्यामुळे मावळत्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सुजाता डोळसे यांची बिनविरोध निवड नगराध्यक्ष पदी करण्यात आली.
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अखेर सरकारकडून रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Aurangabad News Update : औरंगाबाद येथील भाजपच्या कार्यक्रमात गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदाराकडून महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यासह भाऊ आणि त्यांच्या पत्नीने संबंधित महिलेला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार महिलेने गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वैजापूर पोलीस ठाण्यात ठाम मांडले आहे. तर या प्रकरणी आमदार बोरणारे यांनी घरगुती वाद आल्याचं एबीपी माझाशी फोनवरून बोलताना सांगितले आहे.
Mumbai Local : Thane ते Diva पाचवी सहावी मार्गिकेचे लोकार्पण थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, असे भाजपचे नेते उपस्थित राहणाप आहे. तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन केळकर, खासदार श्रीकांत शिंदे असे शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत.
पवई पोलीस ठाण्यासमोर पेरू बागमधील रहिवासी जमले आहेत, पोलीस अधिकारी आणि सुनील राऊत यांना भेटल्या शिवाय हटणार नाही अशी भूमिका
Maharashtra Sindhudurg News Update : कोकणाच्या दशावतार लोककलेतील लोकराजा सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या वतीने पाच लाख रूपयांची आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक तसेच दशावतार कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Pune Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर करण्यात आला. महापालिकेचा 6 हजार 497 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सादर केला. सादरीकरण ऑनलाईन झाल्याने मोठा गोंधळ उडाला, त्यात आयुक्त राजेश पाटील सुट्टीवर असल्याने सत्ताधारी भाजपने नाराजी व्यक्त केली. या अंदाजपत्रकात पिंपरी चिंचवड करांवर कोणतीही करवाढ नाही. क्रीडा विभागासाठी भरीव तरतूद केल्याचं दिसून आलं.
Mumbai News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, गावदेवी पोलीस स्टेशनला नेले
Maharashtra Pune Update : भाजपा खासदार गिरीश बापटांच्या घरासमोर काँग्रेस करणार आंदोलन
मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी करणार आंदोलन,
पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात,
भाजपकडूनही काँग्रेसला विरोध होणार,
पोलिसांनी बापटांच्या घराकडे जाणारा रस्ता अडवला..
काँग्रेस कार्यकर्त्यांची गाडी गिरगांव परिसरात पोलिसांनी अडवली
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे पत्र घेऊन काँग्रेस कार्यकर्ते जाणार होते
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे
आमदार सुनील राऊत यांच्यासह शिवसैनिक पवई पोलिस ठाण्यात दाखल. पेरू बाग गृहनिर्माण प्रकल्पासंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसैनिक पवई पोलीस ठाण्यात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी 433 कुटुंबांना अनधिकृतरित्या जागा दिल्याचा केला आरोप
Maharashtra Solapur News Update: सोलापूर : माळशिरस नगरपंचयातीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचा झेंडा, आप्पासाहेब देशमुख झाले पहिले नगराध्यक्ष, भाजपमधील कुरघोड्यांचा राष्ट्रवादीला फायदा , 17 जागांपैकी 10 जागा भाजप व राष्ट्रवादीला तर
7 जागा भाजपला, जुनी भाजप व मोहिते पाटलांची भाजप वादाचा राष्ट्रवादीला फायदा, माळशिरस नगर पंचायतीच्या चाव्या अजित पवारांकडे
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीने इक्बाल कासकरला ठाणे कारागृहातून ताब्यात घेतले आहे. ईडी आज कासकरला मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे
Gadchiroli : नक्षल्यांचा वाहनं जाळपोळ करतांना लाईव्ह व्हिडीओ समोर, 21 जानेवारी रोजी भामरागड तालुक्यातील रोड कामावर असलेल्या 18 ते 20 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ केली होती. यात 16 ट्रॅक्टर 2 जेसीपी रोड रोलरचा समावेश समावेश होता. भामरागड तालुक्यातील इरपणार गावाजवळ घटना घडली होती. या भागातील दोडराज- इर्फणार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं पक्का रोड बनवण्याचं काम सुरू होतं. या कामावर ही वाहनं काम करत असताना नक्षल्यांनी काम थांबवून वाहनांची जाळपोळ सुरु केली. या भागांत सुरू असलेल्या रोडच्या कामाचा केला नक्षल्यांनी विरोध केला आहे.
कोर्लईत दौरा करण्याची घोषणा करणाऱ्या किरीट सोमय्या यांना शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आव्हान दिलंय. नाहक बदनामी करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावात दौरा आयोजित केलाय. असेल हिंमत तर त्यांनी यावं, त्यांना उत्तर मिळेल, अशा शब्दांत आमदार महेंद्र दळवी यांनी सोमय्यांना इशारा दिलाय.
BJP Leader Kirit Somaiya will be visiting Korlai in Alibag : रायगडच्या कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले आहेत, असा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आज या गावात भेट देणार आहेत. यावेळी सोमय्या यांना शिवसैनिक विरोध करण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर एकही बंगला नसल्याचं कोर्लईच्या सरपंचांनीही स्पष्ट केलंय. तरीही किरीट सोमय्या त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. यावरून सोमय्या आणि शिवसेनेत संघर्ष सुरु असताना सोमय्या यांनी आज कोर्लईत जाण्याची घोषणा केलीय. त्यामुळे कोर्लईत आज शिवसेना आणि सोमय्या यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
संजय राऊतांनी दावा केलेल्या आयटी विभागाचा कथित घोटाळ्यात किती सत्य? अर्थसंकल्पात तरतूद काय?
Maharashtra IT Froud case Update : शिवसेना आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांचे 'बाण' थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाआयटीमध्ये (Maha IT) 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला. पण मागील पाच वर्षातील आयटी विभागाला राज्य सरकारने केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकली तर मात्र पंचवीस हजार कोटी रुपयांचा आकडा याबद्दल शंका उपस्थित होत आहे.
कारण राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात आयटी विभागाला फक्त 355 कोटी रुपयांचा निधी दिला आहे आणि विविध विभागाने आयटी विभागाला 724 कोटी रुपयांची कामे दिली आहेत. हे दोन्ही एकत्र केलं तरी 1100 कोटी रुपयांची काम आयटी विभागाला देण्यात आली आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केलाय. त्यात खरंच तथ्य आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
Kirit Somaiya : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेला. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंगले आहेत, त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्या भेट देणार आहेत.
किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रायगडच्या कोर्लई गावात उद्धव ठाकरेंनी 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आता पडताळणीसाठी सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. कोर्लई गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अलिबागच्या आमदारांचा सोमय्यांना इशारा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -