घागर घेऊन निघाली...तुळजाभवानी देवीच्या मंदिर गाभाऱ्यात हत्ती घोड्यांसह, वाजत गाजत हजारो महिलांनी केलं जलार्पण
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात पारंपारिक जलयात्रा पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजाई नगरीतील हजारो महिला भगिनींनी पापनाशी तीर्थ कुंडामधून पाणी आणत देवी तुळजाभवानीच्या मंदिर गाभाऱ्यात जलअर्पण केले.
येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी चांगलं राहू दे..पीक जोमानं येऊ दे यासाठी देवीसमोर प्रार्थना करण्यासाठी ही जलयात्रा असते. संबळाच्या कडकडाटात हजारो महिलांनी डोक्यावर घागर घेऊन गाभाऱ्यात जलर्पण केलं.
उन्हाचा कडाका आता वाढू लागेल. पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात होते. त्याआधी देवीला तुळजापुरात हजारो महिला जलअर्पण करतात.
. तुळजापूरमधील उपदैवतांपैकी एक असलेल्या पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी/इंद्रावरदायिनी देवीच्या मंदिरापासून होते.
पापनाश तीर्थ कुंडातील पाणी घागरीत भरून हे कलश डोक्यावर घेऊन श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आणले जातात.