Kayta Gang in Chhatrapati Sambhajinagar: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोयता गँगची दहशत वाढल्याच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारी टोळक्यांना जरब कशी बसवायची हा प्रश्न पोलिसांसमोर असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही वाळूज एमआयडीसी भगाात कोयता गँगची दहशत वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून हातात कोयता घेत दुकानं फोडल्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या अंधारात चोरीच्या घटनाही वाढल्या असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. (Koyta Gang Terror)
रात्रीच्या वेळेस येऊन फोडतायत दुकानं
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी भागातील बजाजनगरमध्ये सध्या कोयता गॅंगच्या दहशतीचा सामना करावा लागतोय. गेल्या दोन दिवसांपासून, या गॅंगने हातात कोयता घेऊन दुकाने फोडली आहेत. बजाज नगर परिसरातील नागरिक भयभीत आहेत. रात्रीच्या अंधारात सलग दुसऱ्या दिवशी चोरीच्या घटना घडत आहेत.आज सकाळी 8-9 दुकाने फोडल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही दुकाने व्यापारिक मालाच्या चोरीसाठी फोडली गेली, तर काही दुकाने केवळ नुकसान करण्याच्या हेतूने फोडण्यात आली. अशा घटनांमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक चिंतेत आहेत.
कोयता गँगने व्यापारी चिंतेत
स्थानीय पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या गॅंगची कारवाई रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळेस केली जात आहे, त्यामुळे त्यांना पकडण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या पोलिसांनी गॅंगच्या सदस्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.याप्रकरणी स्थानिक नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी अधिक गस्त घालण्याची मागणी केली जात आहे. व्यापारी संघटनांनी देखील पोलिसांकडे एकत्रितपणे धोरणात्मक उपाय योजनेची मागणी केली आहे. या गॅंगचा शोध घेणारी कार्यवाही जलद गतीने केली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बजाज नगरच्या या घटनांनी एकाच वेळी पोलिसांची कार्यक्षमता आणि गॅंगच्या वाढत्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपींना बीड पोलिसांनी उचललं
बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंद्यांसह शस्त्र बाळगून दहशत पसरविणाऱ्या विरूध्द कडक कारवाईचे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने गेवराईतील म्हाडा कॉलनी परिसरात पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपूते आणि त्याचा साथीदार तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे या दोघांना मोठ्या शिताफीने गजाआड केले. यावेळी त्यांच्याकडून कोयता, तलवार, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त करण्यात आला.पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अवैध धंदे आणि शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढून कारवाईच्या सूचना टीमला दिल्या.
हेही वाचा: