नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीची वेबसाईट वारंवार डाऊन होत असल्याचं पाहायला मिळालं. काल देखील आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अॅप डाऊन झालं होतं. आज देखील काही यूजर्सना  आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर अडचणींचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं. काही जणांनी डाऊन डिटेक्टरवरील  रिपोर्ट सादर करत तक्रारी केल्या. 



गेल्या महिन्यात आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अॅप 26 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला डाऊन होती. काल देखील आयआरसीटीसीची वेबसाईट डाऊन झालेली दिसून आली. डाऊनडिटेक्टरच्या रिपोर्टनुसार  आज 11 च्या दरम्यान देखील आयआरसीटीसीच्या वेबसाईटला तांत्रिक अडचणी आल्या होत्या. 


आयआरसीटीसीनं त्यांच्या वेबसाईटवर मेंटनन्ससाठी वेबसाईटवरी ई-तिकिटिंग सुविधा उपलब्ध नाही. थोड्या वेळानं प्रयत्न करा असा मेसेज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी पाचव्यांदा आलेल्या आहेत. 


संतप्त झालेल्या एका यूजर्न डिजीटल इंडियाचा दावा करण्यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाईटला येणाऱ्या समस्या सोडवण्याचं आवाहन केलं. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर नेक्स्ट जनरेशन ई तिकिटींग असं लिहिलंय काय हा विरोधाभास, असं म्हटलं. आपल्या पिढीलाच तिकीट बुक करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, असं सोशल मिडिया यूजरनं म्हटलं. 


दुसऱ्या यूजरनं आयआरसीटीसीची वेबसाईट दररोज डाऊन होत असल्याचं म्हटलंय. ज्यावेळी तात्काळ बुकिंग सुरु होतं, त्याच वेळी वेबसाईटच्या अडचणींना सुरुवात होते. त्यामुळे ज्यांना रेल्वेनं प्रवास करायचा असतो त्यांना रेल्वेचं तिकीट बुक करता येत नाही. ज्यावेळी सर्व तिकीट बुक झालेली असतात त्यावेळी लॉगीन होतं, असं दुसऱ्या यूजरनं म्हटलं. 


दरम्यान, भारतीय रेल्वेतून आरक्षित तिकिटावरुन प्रवास करायचा असल्यास आयआरसीटीसीद्वारे तिकीट बुकिंग करावं लागतं. गेल्या काही दिवसांपासून या वेबसाईटला तात्काळ तिकीट बुकिंग करताना अनेकदा समस्या निर्माण झालेल्या आहेत. तात्काळ तिकीट बुकिंग च्यावेळी वेबसाईट आणि अॅवर अनेक जण लॉगीन करत असल्यानं अडचणी निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. एसी कोचची तिकीट सकाळी 10 वाजता तात्काळ बुक करता येतात तर स्लीपर कोचची तिकीट बुक करण्याचा वेळ 11 वाजता सुरु होतो. तांत्रिक अडचणी या स्लीपर कोचचं तिकीट बुक करताना आल्याचं दिसून येतं. 


याशिवाय भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंगचा कालावधी देखील कमी केला आहे. आता प्रवाशांना फक्त पुढील दोन महिन्यांच्या कालावधीतील तिकीट बुक करता येतं. यापूर्वी ती मुदत चार महिने होती. 


इतर बातम्या :