Maharashtra Breaking News LIVE Updates : गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सातारा शहर पोलीस ठाण्यातून थोड्याच वेळात लॉकअपमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
Reservation : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बढतीत आरक्षण लागू करण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिकृत पत्रक काढून सर्व मंत्रालयांना याबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय सेवेत मध्यम ते वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या एससी आणि एसटी वर्गातल्या अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने या वर्षी 28 जानेवारीला याबाबत निर्णय देताना काही गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली होती.
Gunratan Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांचा आज रात्रीचा मुक्काम सातारा शहर पोलीस ठाण्यात असणार आहे. शासकीय डॉक्टरांच्या पथकाने गुणरत्न सदावर्ते यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी पोलीस ठाण्यात करून घेतली आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार आहे. आज सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार जाणार आहे. तपास अधिकारी भगवान निंबाळकर यांनी माहिती दिली आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात घोषणा देत मराठा सकल मोर्चातील आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचे काही मावळे सातारा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेल्या असून सातारा शहर पोलिसांनी बाहेर केली घोषणाबाजी सुरू केलेली आहे.
Satara News : सलगच्या सुट्यामुळे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होताना पहायला मिळत आहेत. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात सीएनजी गॅस असलेल्या एका वाहनाला अचानक आग लागली. वाहनातील सर्वजण सुखरूप बाहेर पडले. मात्र गाडीमध्ये दोन स्पोर्टमुळे परिसर हादरून गेला. या लागलेल्या आगीमुळे मात्र या घाटातील संपूर्ण वाहतूक काही काळ थांबवावी लागली. वाई पोलिसांनी वेळीच या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आणून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, या संपूर्ण घटनेत पर्यटकांना मात्र किमान दोन तास मनस्ताप सहन करावा लागला.
Suresh Pujari : उल्हासनगर पोलिसांनी कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारीला अटक केली आहे. सुरेश पुजारीने 2015 ला उल्हासनगरचे केबल व्यवसायिक सच्चिदानंद करेरा यांची आपल्या हस्तकांकडून गोळ्या झाडून हत्या केली होती.
सच्चिदानंद करेरा यांच्या हत्येप्रकरणी पुजारी वॉन्टेड होता. शिवाय त्याच्यासह इतर 12 जणांवर मोक्का लावण्यात आला होता. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये नगरसेवक, राजकिय नेते आणि मोठ्या व्यवसायिकांना खंडणीसाठी फोन करून त्याने धमकी दिली होती. या सर्व प्रकरणांमध्ये अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात पुजारीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी पुजारीला अटक केली आहे. सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ताबा दिल्ली पोलिसांनी घेतला होता.
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यामध्ये आणण्यात आले आहे. सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोन वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.
Dr. Babasaheb Ambedkar jayanti : आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जालना येथे त्यांचा जीवनपट रांगोळी मधून साकारण्यात आला, जनशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते. ज्यात बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग रंगोळीतून साकारण्यात आले होते, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते झाले असून हे रांगोळी प्रदर्शन उद्या पर्यत लोकांना पाहायला मिळणार आहे.
Dr. Babasaheb Ambedkar jayanti : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात भव्य मोटारसायकल तसेच जलोष रॅली काढण्यात आली. या रॅलीत आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. तर जयभीमाच्या जयघोषाने शहर दुमदुमले. दरम्यान गोंदिया शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबाच्या पुर्णाकृती पुतळ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील हजारो बाबासाहेबाचे अनुयायी उपस्थिती राहून महामानवाला अभिवादन केले.तर जिल्ह्यात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
औरंगाबादच्या स्मशानभूमीत गेल्या 13 दिवसांपासून एका शिक्षकाचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने गजानन खैरे हे शहरातील मुकंदवाडी येथील स्मशानभूमीत अन्नत्याग आंदोलन करत आहेत. राज्यातील 60 हजार विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे. 15 वर्षांपासून सर्वच शासनाने आमची फसवणूक केली आहे. शंभर टक्के अनुदान आणि इतर मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने वेगवेगळी आंदोलने केली. मात्र, त्यावरही काही उपयोग न झाल्याने गजानन खैरे यांनी हे आंदोलन सुरु केले आहे.
रत्नागिरी : किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या निधीमध्ये गफला केला आहे. हे काही आता लपून राहिला नाही. देशाचा अभिमान असलेल्या आयएनएस विक्रांतच्या नावावर झालेला गफला हा देशद्रोह आहे. त्यामुळे शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येते ते बोलत होते.
सातारा माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, दहिवडी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
आमदारांच्या संस्थेकडे जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी बनवले खोटे प्रतिज्ञापत्र
ज्यांच्या नावे प्रतिज्ञापत्र बनवले ती व्यक्ती मृत आसताना ती जिवंत दाखवून तयार केले प्रतिज्ञापत्र
महादेव भिसे या शेतकऱ्यांने दिली होती तक्रार
तपासानंतर आ जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
शरद पवारांच्या घरावरील हल्लाप्रकरणी संदीप गोडबोलेला 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी; नागपुरातून केली होती अटक
Sharad Pawar News : या देशाला राजकीय स्थैर्य देण्याचं काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं
- आज शेजारील श्रीलंकेतील आणि पाकिस्तान स्थिती धोक्यात येते की काय अशी परिस्थिती आहे
- मात्र भारत एवढा मोठा देश एकत्रित पाहायला मिळतो तो बाबासाहेब यांच्यामुळे
सध्या आपल्याला विजेचा प्रश्न पाहायला मिळतोय
- मात्र विज आणि जलसंधारण याची जबाबदारी बाबासाहेब यांच्यावर होती
- भाक्रा नांगल प्रकल्पाच्या माध्यमातून विज निर्मीती चा निर्णय बाबासाहेब यांच्या सही ने झाला
काही भागात वीज कमी होती तर काही भागात जास्त होती त्यावेळी विजेच एकत्रीकरण खाण्याचा निर्णय बाबासाहेब यांनी घेतला
- पा्वर ग्रीड ची स्थापना बाबासाहेब यांच्या संकल्पनेतून झाली
देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे गेलो तरी महमानवाचा पुतळा पाहायला मिळतो
- शाहू महाराज यांनी त्यांना साथ दिली
- उपोषित समाजाला त्यांनी साथ दिली
-बाबासाहेबांनी फुले यांचा विचार कायम ठेवला
- सर्वांचं योगदान होत म्हणून आपण शाहू फुले आंबेडकर म्हणतो
- शाहू फुले आंबेडकर यांचे जिवन वैयक्तिक जिवनात सर्वीनी आणले पाहिजे
Raj Thackeray : जेन्स लेनच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी बाबासाहेब पुरंदरे यांनी पत्रातून केली असल्याचा दावा मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नाही का, असा प्रश्नही त्यांनी केला.
Pune : पुण्यातील वारजे पुलावर आज सकाळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुंटूंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.आज सकाळी दहाच्या दरम्यान माई मंगेशकर रुग्णालयाच्या समोरील पुलावर एका गाडीचा अचानक कमी वेग झाल्याने पुढील वँगनार गाडीवर मागील ट्रक धडकला तर पुढे टँकर असल्याने ही गाडी मध्येच चेंबली गेली. या अपघातात वँगनार गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाच कुंटूंबातील नवरा- बायको आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येथील माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीची नावे अदयाप समजली नाही. या अपघातानंतर येथील महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर महामार्गावरील वाहने सेवा रस्त्यावर उतरल्याने वारजेतील रस्ते चक्काजाम झाले होते.
Nashik : नाशिकमध्ये मोबाईलचा नाद एकाच्या जीवावर बेतलाय. काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पेठरोडला नाशिकहून आशेवाडीकडे जाणाऱ्या एका सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये क्लिनर बाजूस बसलेल्या राजन चौधरी यांच्या हातातील मोबाईल रस्त्यावर खाली पडला विशेष म्हणजे चालू गाडीतच खाली उतरून ते मोबाईल उचलण्यासाठी गेले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्यावरूनच गाडीचे मागचे चाक गेले, या घटनेत अतिरक्तस्त्राव झाल्याने राजन चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवत चालक असलेले मयताचे भाऊ साजन चौधरी यांच्यावर म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Ananta Suryavanshi : नाशिक मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनंता सुर्यवंशी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओझर जवळ नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक केल्यानंतर त्यांनी स्विमिंगही केले मात्र त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. हे बघताच त्यांना पंचवटी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अनंता सुर्यवंशी यांच्या अशा अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला असून पक्ष स्थापनेपासूनच ते पक्षाशी एकनिष्ठ होते.
Maharashtra News : मनसेला हादरा, मनसे राज्य सचिव इरफान शेख यांनी मनसेचे पद आणि सदस्यत्वाचा दिला राजीनामा. राज ठाकरे यांनी मशीद ,मदरसे भोंगे बद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर इरफान शेख यांनी व्यक्त केली होती नाराजी. उत्तर सभेत देखील राजा ठाकरे यांनी भूमिका कायम ठेवल्याने अखेर इरफान शेख यांनी दिला राजीनामा
कोल्हापूर : हातकणंगले इथून अपहरण झालेल्या तरुण व्यापाऱ्याची राधानगरीत हत्या झाली. दीपक हिरालाल पटेल असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. 18 दिवसांपूर्वी दीपक पटेल यांचे अपहरण झाले होते. 15 लाखांच्या खंडणीसाठी त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
पुणे | 120.60 रुपये | 103.28 रुपये |
नाशिक | 120.02 रुपये | 102.73 रुपये |
परभणी | 123.51 रुपये | 106.08 रुपये |
औरंगाबाद | 120.63 रुपये | 103.32 रुपये |
कोल्हापूर | 120.64 रुपये | 103.35 रुपये |
नागपूर | 121.03 रुपये | 103.73 रुपये |
देशात 22 मार्चनंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरांच्या वाढीचं सत्र सुरु होतं. गेल्या 22 दिवसांत तेलाच्या किमतींमध्ये जवळपास 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जर तुम्हीही तुमच्या गाडीची टाकी फुल करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी एकदा तुमच्या शहरांतील दर जाणून घ्या.
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
हैद्राबाद | 119.49 | 105.49 |
कोलकाता | 115.12 | 96.83 |
बंगळुरू | 111.09 | 94.79 |
Petrol-Diesle Price Today on 14 April 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जारी केले आहेत. देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर आज स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईनं हैराण करुन सोडलं आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तर दुसरीकडे सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सातत्यानं वाढणाऱ्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे.
Indorikar Maharaj Accident News : सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे. काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
माहितीनुसार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक अनुयायी विविध मार्गाने आपल्या डॉ. आंबेडकरांना मानवंदना देत असतात. कोरोनानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य सरकारच्या वतीने साजरी केली जाणार आहे. मुंबईतील दादर स्थित चैत्यभूमी स्मारक अभिवादन कार्यक्रम होणार आहे
आलिया आणि रणबीर आज विवाहबंधनात अडकणार
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांघाईतील भारतीय दूतावासातील 'इन-पर्सन' सेवा बंद
चीनच्या शांघाईमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय वाणिज्य दूतावासात 'इन-पर्सन' सेवा म्हणजे दूतावास परिसरात जाऊन भेटण्यास बंदी घातली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -