एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाची हजेरी

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Petrol Diesel Rate : निवडणुका संपल्या, इंधन दरवाढ होणार? देशातील आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 11 March 2022 : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांटे निकाल जाहीर झाले असून चार पैकी तीन राज्यांत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शक्यता वर्तवली जात होती की, निवडणुका संपताच देशात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली जाऊ शकते. पण आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही भारतीय तेल कंपन्यांनी (Oil companies) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या शक्यतेमागील मुख्य कारण म्हणजे, रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती. या दोन देशांतील युद्धानं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. असातच यामुळे कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर 

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी 9 मार्च रोजी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, इंधन दर यूपीए (UPA) सरकारनं नियंत्रणमुक्त केलं होतं आणि जेव्हा इंधन दर नियंत्रणमुक्त केले जाता, त्यावेळी त्यात मालवाहतूक शुल्क देखील जोडलं जातं. 

Maharashtra Budget 2022 Date, Time : आज राज्याचा अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

21:01 PM (IST)  •  11 Mar 2022

Solapur News Update: अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ कारचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Solapur News Update:  अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कर्नाटकातील बळोरगी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे.  या अपघातात पाच जणांचा जागीच  मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व मृत हे अहमदनरचे असून ते अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले होते.   

19:13 PM (IST)  •  11 Mar 2022

Unseasonal Rain : पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाची हजेरी

 Unseasonal Rain :  पिंपरी चिंचवडसह मावळात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण  होते. दोन दिवसांपासून तुरळक पाऊस ही बरसला. आज सायंकाळी मात्र मेघ गर्जनेसह तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय खरा पण शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

17:47 PM (IST)  •  11 Mar 2022

Nagpur News: नागपुरात पावसाच्या मध्यम सरी

Nagpur News: हवामान विभागाने मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीन दिवस विदर्भात पावसाचे अंदाज व्यक्त केलाहोता. पण तीन दिवस अनुपस्थित राहिलेला पाऊस आज नागपुरात पाहायला मिळाला. 15 मिनिटं मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला.

13:06 PM (IST)  •  11 Mar 2022

Narayan Rane News : मुंबई पोलिसांनी मालवणी पोलीस स्थानकांत नोंदवलेला गुन्हा रद्द करा, राणे पितापुत्रांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई पोलिसांनी मालवणी पोलीस स्थानकांत नोंदवलेला गुन्हा रद्द करा, राणे पितापुत्रांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

राणेंच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित

दिशा सॅलियन प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी

राजकीय सूडबुद्धीन गुन्हा दाखल करत गोवण्यात आल्याचा रोणेंचा दावा

12:53 PM (IST)  •  11 Mar 2022

Satara News : विद्यार्थ्यांना पोलिसांची अमानुष मारहाण; साताऱ्यातील शिरवळ येथील खळबळजनक घटना

Satara News : साताऱ्याच्या शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. बुधवारी रात्री वस्तीगृहात घुसून पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे. वसतिगृहातून रात्री मोठ्याने आवाज येतो असं कारण देत पोलिसांनी मारहाण केल्याचं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येतंय. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी परभणी, नागपूर, मुंबई, शिरवळ आणि उदगीर या पाच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कामकाज विद्यार्थ्यांनी बंद पाडलं आहे. तसंच महाविद्यालयांच्या गेटबाहेर आंदोलनही सुरु केलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
आमच्या नादाला लागू नका, पालकमंत्रीपदावर नियुक्ती होताच संजय शिरसाट सत्तारांवर कडाडले, म्हणाले..
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Embed widget