Maharashtra Breaking News LIVE Updates पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2022 09:25 PM
Yavatmal News Update : यवतमाळ येथील शिवाजीनगर परिसरातील सर्जिकल हॉस्पिटलला आग, मशनरी आणि इतर साहित्य जळून खाक 

Yavatmal News Update : यवतमाळ येथील शिवाजीनगर परिसरातील सर्जिकल हॉस्पिटलला आग लागली आहे. रात्री आठ वाजण्याच्या  दरम्यान शॉर्टसर्किट होऊन सिलेंडरने पेट घेतल्यामुळे ही आग लागली. आग भडकल्यामुळे रुग्णांना तत्काळ दुसरीकडे हलविण्यात आले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. परंतु, रूग्णालयातील मशनरी आणि इतर साहित्य जळून खाक झाले. 

Raigad News Update : जेएनपीटी बंदरातील शॅलो जेट्टीनजीक स्फोट , एका कामगाराचा मृत्यू  

Raigad News Update : रायगडमधील जेएनपीटी बंदरातील शॅलो जेट्टीनजीक स्फोट झाला असून यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात एक कामगार जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन कामगार समुद्राच्या पाण्यात कोसळले होते. यावेळी दोघांना वाचविण्यात यश आले.  

Gunratan Sadavarte : एसटी आंदोलनात कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत गुणरत्न सदावर्तेंसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

Gunratan Sadavarte : एसटी आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याबद्दल अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलिसांत गुणरत्न सदावर्तेंसह चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  गुणरत्न सदावर्ते, पत्नी जयश्री पाटील, पैसे जमा करणारा औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि अकोटच्या प्रफुल्ल गावंडे यांचा यामध्ये समावेश आहे. शिवसेना प्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी 8 जानेवारी 2022 रोजी याबाबत  तक्रार दाखल केली होती. 

Solapur News Update : जिम प्रशिक्षणाच्या नावाखाली महिला आणि मुलींची प्रशिक्षकाडून छेडछाड  

Solapur News Update : जिम प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रशिक्षकाकडून महिला आणि मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपुरात समोर आला आहे. या प्रकरणी जीम प्रशिक्षक श्रीकांत गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

Anil Parab : सदावर्ते हेच पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी जबाबदार

सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून अवैधपणे पैसे जमा केल्याचा आरोप राज्याचे मंत्री अनिल परब यांनी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पवारांच्या घरावरील हल्ल्यासाठी सदावर्ते हेच जबाबदार असल्याचं अनिल परब म्हणाले. 

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा

एसटी कामगारांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री सदावर्ते यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

Lata Mangeshkar Award : पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

Lata Mangeshkar Purskar :  पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. 

Pune : पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे थर्माकॉल बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे थर्माकॉल बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेल्डिंगचं का सुरू असताना ठिणगी उडून आग लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

Pune Mumbai Expressway : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन ब्रीजजवळ अपघात, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

Pune Mumbai Expressway : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन ब्रीजजवळ अपघात झाला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रकचा अपघात झाला असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सामान पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. 



Gunaratna Sadavarte :  13 एप्रिलपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी

Gunaratna Sadavarte :  13 एप्रिलपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी देण्यात आला आहे. 

Gunaratna Sadavarte :  गुणरत्न सदावर्ते यांना जामीन की कोठडी? थोड्याच वेळात होणार सुनावणी   

Gunaratna Sadavarte :  गुणरत्न सदावर्ते यांच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. 

Kirit Somaiya : 'आयएनएस विक्रांत' निधी प्रकरण: भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Kirit Somaiya : 'आयएनएस विक्रांत' निधी प्रकरण: भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Eknath Khadse :  विधानसभा निवडणुकीवेळी आमचे फोन टॅप ; एकनाथ खडसे यांचा भाजपवर हल्लाबोल 

Eknath Khadse : चाळीस वर्षापासून पक्षासाठी काम करणाऱ्या नेत्यांचे फोन टॅप करण्याचा प्रकार म्हणजे अतिशय हलकट आणि नीच पणाचा  प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.  


"विधानसभा निवडणुकीवेळी आपल्यासह आपल्या आणखी दोन सहकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या संदर्भात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत रश्मी शुक्ला यांना फोन टॅप करताना अनेक मर्यादा आहेत. परंतु, त्यांना हे काम करत असताना  गृह सचिव किंवा गृह खात्यातील कोणाची तरी परवानगी घ्यावी लागली असेल, त्या शिवाय त्या असे करू शकत नाहीत, असा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.  

Silver Oak Protest : अॅड. सदावर्ते यांना थोड्याच वेळेत कोर्टात हजर करणार; पोलीस कोठडीची मुदत आज संपली

Silver Oak Protest : अॅड. सदावर्ते यांना थोड्याच वेळेत कोर्टात हजर करणार; पोलीस कोठडीची मुदत आज संपली

jalgaon news updates : अहमदाबाद बरवणी एक्सप्रेसमध्ये सेन्सरने धोक्याचा इशारा दिला अन् मोठा अनर्थ टळला

अहमदाबाद बरवणी एक्सप्रेसमध्ये असलेल्या सेन्सरने वेळीच धोक्याचा इशारा दिल्याने रेल्वेसह जळगाव मनपाची अग्निशमन यंत्रणा धाऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  अहमदाबाद बरवनी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर जळगावकडे येत असताना बोगी क्रमांक सातमधून काही प्रमाणात धूर निघत असल्याची सूचना रेल्वेला लावण्यात आलेल्या सेन्सरने चालकाला आणि नियंत्रण कक्षाला दिली. 


सेन्सरचा इशारा कळताच रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाची मदत मागवली. अहमदाबाद बरवानी एक्सप्रेस भुसावळहून जळगावपर्यंत येईपर्यंत जळगाव मनपाचे अग्निशमन दल रेल्वे स्थानकावर आग विझवण्याचा आधुनिक यंत्रणेसह सज्ज झाले होते.  रेल्वे स्थानकावर अहमदाबाद बरवनी एक्सप्रेस दाखल झाल्यानंतर रेल्वेच्या तंत्रज्ञांनी तिची पाहणी केली आणि त्यात दुरुस्ती केल्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचं पाहिल्यानंतर  रेल्वे पुढे निघाली.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, वर्षभरात 1899 कोटींची उलाढाल

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा हळदीची आवक वाढली आहे. 2020-21  या  मागील वर्षापेक्षा 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सांगली मार्केट यार्डात राजापुरी आणि परपेठ हळदीची उलाढाल 192 कोटींनी वाढली आहे. मागील 2 वर्षांमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे संकट हळद लागवडीच्या क्षेत्रात ओढावले होते. या नैसर्गिक संकटामुळे हळदीच्या उत्पादनावर परिणाम होऊन हळदीची आवक आणि हळदीच्या व्यापारातून होणारी उलाढाल घटेल, असा  अंदाज होता. पण यावर्षी आवक वाढल्याचे चित्र दिसून आले.

Kirit Somaiya News : सोमय्या पितापुत्रांच्या भवितव्याचा फैसला आजच, कोर्टानं निकाल राखून ठेवला, आज संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर करणार

Kirit Somaiya News : सोमय्या पितापुत्रांच्या भवितव्याचा फैसला आजच, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीनावरील युक्तिवाद पूर्ण, कोर्टानं निकाल राखून ठेवला, आज संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर करणार

Manpada Police Crime News : मानपाडा पोलिसांची कारवाई, तिघे गांजा तस्कर गजाआड 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा आणून डोंबिवलीत विकणाऱ्या त्रिकुटाचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .दरम्यान तीन महिन्यापूर्वी देखील शिरपूर येथील गांजा तस्कर त्रिकूटाला  मानपाडा पोलिसांनी अटक केली होती . त्यानंतर पुन्हा एकदा  शिरपूरमधील दुसरी टोळी मानपाडा पोलिसांच्या हाती लागल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर मानपाडा पोलिसांच्या रडारवर आले आहे.मयूर जडाकर, अखिलेश धुळप ,सुनील उर्फ लोका खजन उर्फ पावरा अशी तिघांची नावे आहेत.यामधील मयूर जडाकर याच्या विरोधात गांजा तस्करीप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात दोन तर मध्यप्रदेशमध्ये एक गुन्हा दाखल आहे मयूर हा चार महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता .तर सुनील उर्फ लोका खजन उर्फ पावरा याला शिरपूर येथून अटक करण्यात आली आहे. डोंबिवली  शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना हा गांजा विकला जात असावा असा पोलिसांना संशय असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे . 


 

Anil Deshmukh Update : अनिल देशमुखांसह चौघांची सीबीआय कस्टडी वाढवून देण्याची मागणी, चारही आरोपींची रिमांड संपत असल्यानं चौघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं

Anil Deshmukh Update : अनिल देशमुखांसह चौघांची सीबीआय कस्टडी वाढवून देण्याची मागणी, चारही आरोपींची रिमांड संपत असल्यानं चौघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं, सीबीआयला हवी आणखी पाच दिवसांची कस्टडी

Prasad Lad On Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणात सीबीआयची चौकशी करावी, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची मागणी

शरद पवार यांच्यावर घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणात सीबीआयची चौकशी करावी, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची मागणी, आंदोलनावेळी संजय राऊत पोलीस अधिकाऱ्यांसोबत बसून होते


भाजप आमदार प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट, भाजपचा हात असेल तर ही त्याची सीबीआय मार्फत चौकशी करावी, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचाही प्रसाद लाड यांचा दावा, यापुढे मुंबईत वावरताना भगवी टोपी आणि वस्त्र घालूनच वावरेल

Kirit Somaiya News :रस्त्यावर उभं राहून 57 कोटींचा निधी उभा राहू शकतो का?, हाच मुळात सवाल- सोमय्यांच्यावतीनं कोर्टात युक्तिवाद

Kirit Somaiya News : रस्त्यावर उभं राहून 57 कोटींचा निधी उभा राहू शकतो का?, हाच मुळात सवालय


विक्रांत बचावसाठी सारा मदतनिधी हा सर्वांनी आपल्या पक्षासाठी गोळा केला होता


तो तिकडे जमा केला, नंतर त्यांनी तो कुठे जमा केला याची आम्हाला माहिती नाही


हा निधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जमा केला होता, तो कधीही एकत्र झाला नाही


सोमय्यांच्यावतीनं कोर्टात युक्तिवाद

विक्रांत बचावसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही निधी गोळा केला होता, आज या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झाले त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू- सोमय्यांचे वकील

Kirit Somaiya News : सोमय्यांच्या वकिलांचा युक्तिवाद, म्हणाले, तक्रारदारानं 11 हजारांची देणगी दिली होती. त्याची पावती दिली नाही, म्हणून 9 वर्षांना तक्रार दिली गेली. साल 2013-14 मधील घटनेची साल 2022 मध्ये दखल घेतली गेलीय, आणि पोलिसांना तातडीनं गुन्हाही दाखल केला. हा मदतनिधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केला होता. विक्रांत बचावसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही निधी गोळा केला होता.  आज या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झालेत, हे जगजाहीर आहे. त्यामुळेच हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत हे काही वेगळं सांगायला नको

मुंबै बँक निवडणुकीतील बोगस मजूर प्रकरणी आज प्रवीण दरेकरांची दुसऱ्यांदा चौकशी

प्रवीण दरेकर पोलिस स्टेशनला पोहोचले, पोलिस स्टेशनबाहेर प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

प्रवीण दरेकर पोलिस स्टेशनला पोहोचले, पोलिस स्टेशनबाहेर प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

Latur News : मोकाट जनावरांच्या झुंजीत वृद्धाचा बळी; शिरूर अनंतपाळ येथील घटना

Latur News : लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे वृद्ध व्यक्तीचा जीव गेला तो मोकाट बैलांच्या झुंजीत. अनेक गावात देवाच्या नावाने काही बैल सोडले जातात. ही खूप जुनी प्रथा आहे. वळू किंवा कठाळ्या या नावाने ते ओळखले जातात. अशा दोन मोकाट वळूंची झुंज लागली. ही झुंज सुरू झाली ती शिरूर अनंतपाळ येथील पोलीस चौकीच्या बाजूला. गावात बऱ्याच वेळा ही मोकाट वळू एकमेकांशी झुंज घेत राहतात. म्हणून याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र दोन्ही वळू मागे हटत नव्हते.  याच वेळी विश्वनाथ गायकवाड यांना या वळूने जोराची धडक दिली. यात विश्वनाथ गायकवाड यांचा जीव गेला आहे. 70 वर्षीय गायकवाड यांना घटनास्थळवरून पळही काढता आला नाही. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. देवाला सोडलेला वळूचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता प्रशासन त्यासाठी पावलं उचलत आहे. 

Kirit Somaiya News :  किरीट सोमय्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी युक्तिवाद करत आहेत, संजय राऊतांच्या आरोपांनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला, सोमय्यांच्या वतीनं आरोप

Kirit Somaiya News :  किरीट सोमय्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी युक्तिवाद करत आहेत, संजय राऊतांच्या आरोपांनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला, सोमय्यांच्या वतीनं आरोप

Kirit Somaiya News : सोमय्या पितापुत्राच्या अटकपूर्व जामीनाला पोलिसांचा विरोध

Kirit Somaiya News : सोमय्या पितापुत्राच्या अटकपूर्व जामीनाला पोलिसांचा विरोध, किरीट सोमय्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी युक्तिवाद करत आहेत, संजय राऊतांच्या आरोपांनंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला, सोमय्यांच्या वतीनं आरोप

डाळ आयातीला केंद्र सरकारची मुदतवाढ, बुलडाण्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

केंद्र सरकारने डाळ आयात धोरणाला मुदतवाढ दिल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या या धोरणाविरोधात बुलडाण्यातील संग्रामपूर खरेदी विक्री संघाच्या गेटवर शेतकाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अचानकच शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुलं हरभरा मोजणी बंद पडली आहे. हरभरा घेऊन आलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. केंद्र सरकारच्या डाळ आयात धोरणामुळे देशातील डाळीला मागणी कमी होत आहे. त्यामुळे डाळींचे व डाळ पिकांचे भाव कमी होतात. यामुळे जर केंद्राने डाळ आयात केली नाही तर देशातील शेतकऱ्यांना डाळीचे भाव वाढल्याने फायदा होईल.

Maharashtra Kesari Prithviraj Patil Meet Sharad Pawar : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट
Maharashtra Kesari Prithviraj Patil Meet Sharad Pawar : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलनं घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट,  भेटी दरम्यान शरद पवार यांनी  पृथ्वीराज पाटीलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवाय पृथ्वीराजचा सत्कार सुद्धा करण्यात आला. पुढील ट्रेनिंगसाठी आणि ऑलम्पिक खेळण्यासाठी लागणारी मदत देखील केली जाईल असे आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आले, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

 
MNS पुणे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे शिवतीर्थावर दाखल, राज ठाकरेंना भेटणार, भोंग्यासंदर्भातील घोषणेनंतर मोरे नाराज

MNS पुणे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे शिवतीर्थावर दाखल, राज ठाकरेंना भेटणार, भोंग्यासंदर्भातील घोषणेनंतर मोरे नाराज

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानं घेतली शरद पवारांची भेट, वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झाली भेट  

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानं घेतली शरद पवारांची भेट, वाय बी चव्हाण सेंटरमध्ये झाली भेट  

Ambernath News  : भरधाव टँकरची पाच गाड्यांना धडक,  अंबरनाथ बदलापूर पाईप लाईन महामार्गावर अपघात

Ambernath News  :  अंबरनाथ बदलापूर पाईपलाईन महामार्गावर नेवाली पासून ते बदलापूर पर्यंत या टँकरनं पाच गाड्यांना धडक दिली. या अपघातात दोन ते तीन जण जखमी झाले असून एकाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान हा टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत टॅंकर चालवत असल्याची माहिती समोर येते आहे. अपघाताची माहिती कळताच अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Pravin Darekar : मुंबई बँक प्रकरणातील चौकशीत पोलिसांना सहकार्य करणार; भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची माहिती

Pravin Darekar : मुंबई बँक प्रकरणातील चौकशीत पोलिसांना सहकार्य करणार;  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांची माहिती

Pravin Darekar : सिल्वर ओक हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; प्रवीण दरेकर यांची मागणी

Pravin Darekar : सिल्वर ओक हल्ला प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; प्रवीण दरेकर यांची मागणी

आमदार अमोल मिटकरी यांची खासदार नवनीत राणांवर टीका

आपल्या पक्षाच्या भरवशावर ज्या लोकांची प्रमाणपत्रच खोटी होती ती लोकं सुद्धा खासदार झाली, त्यामुळे आपला पक्ष किती महत्वाचा आहे हे समजून घेतलं पाहिजे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना नाव न घेता लगावला.शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद बैठकीत ते बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विदर्भामध्ये काम करण्याची फार मोठी संधी आहे. या भागात भाजपचे प्राबल्य नसतानाही त्यांनी ज्याप्रमाणे ग्राउंड लेव्हलवर काम केलं त्याहीपेक्षा पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती विभागात मोठा होऊ शकतो असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

pune news : मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात, 8 विद्यार्थी जखमी

मुलांना शाळेत घेऊन निघालेल्या रिक्षाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आठ मुले जखमी झाली असल्याची माहिती  आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील उरळीकांचन येथील खेडेकर मळा परिसरात आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maharashtra News : पुन्हा लोडशेडिंगचा 'ताप'? ऊर्जामंत्र्यांच्या ग्वाहीनंतरही ऐन उन्हाळ्यात लोडशेडिंग वाढण्याची शक्यता

Maharashtra News : एकीकडे काहीही झालं तरी राज्यात भारनियमन होऊ देणार नाही अशी ग्वाही ऊर्जामंत्री देत असताना. प्रत्यक्षात मात्र राज्यावरचा भारनियमनाचा भार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात जवळपास 3 हजार 500 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. राज्यात 15 लाख मेट्रिक टन कोळशाची गरज असताना निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे अवघा साडेसहा लाख मेट्रिकटन  कोळसा उपलब्ध आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्यानं राज्याची विजेची मागणीही 28 हजार मेगावॅटपर्यंत वाढलेय. त्यामुळे ही कोळसाटंचाई अशीच सुरू राहिल्यास राज्यावर भारनियमन लादण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

Nashik News : नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्यांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा?

#BREAKING : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

#BREAKING : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, दीपक पांडे यांच्या लेटर बॉम्बनंतर महसूल आणि पोलिसांमध्ये तणाव, आंदोलन स्थगित केल्याची महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेची घोषणा https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-11-april-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1049295 


 
Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना आज जामीन मिळणार?

Gunratna Sadavarte  Latest News : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्यांना पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. त्यामुळं त्यांना कोठडी वाढवून मिळणार की जामीन होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे.  यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेतली असल्याची माहिती आहे.  


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही : मनसे आमदार राजू पाटील

Shiv Sena vs MNS : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे (MNS)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (रविवारी) शिवसेना (Shiv Sena)  भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केलं. याबाबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर मनसे नेते देखील आदित्य ठाकरे विरोधात मैदानात उतरले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा कोठडी की जामीन? आज निर्णय


Gunratna Sadavarte  Latest News : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज त्यांना पुन्हा मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे. त्यामुळं त्यांना कोठडी वाढवून मिळणार की जामीन होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान काल गुणरत्न सदावर्तेंच्या घरी मुंबई पोलिसांचे पथक दाखल झालं होतं. त्यांच्या घराची झडती घेतली असल्याची माहिती आहे.  यावेळी या ठिकाणचे सीसीटीव्ही, रजिस्टर तपासण्यात येत असून सदावर्तेंना भेटायला कोण-कोण आलं होतं याची माहिती घेतली असल्याची माहिती आहे.  


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भेटायला यापैकी कोणी एसटी कर्मचारी आला होता का किंवा इतर स्वरुपाची माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम मुंबई पोलीस करत आहेत. 


आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही; मनसे आमदार राजू पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर


Shiv Sena vs MNS : मशिदीवरील भोंग्याबाबत मनसे (MNS)  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (रविवारी) शिवसेना (Shiv Sena)  भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण केलं. याबाबत शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर मनसे नेते देखील आदित्य ठाकरे विरोधात मैदानात उतरले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी आम्ही पक्ष जगवण्यासाठी कुणाच्या दाढीला बांधलेला नाही, असा टोला आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे. त्यामुळे आता भोंगाच्या मुद्द्यावरून शिवसेना मनसेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यानं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.