मुंबई : राज्याच्या विधानभवनात (Vidhan Bhavan) आज जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील (T20 World Cup 2024 Winning Team India) मुंबईकर खेळाडूंचा सत्कार पार पडला. विधान भवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.


विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी


सत्कार सोहळ्यातील भाषणात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख वॉईस कॅप्टन अजित पवार (Ajit Pawar) असा केला. यासोबत फडणवीसांनी टीम इंडियाच्या नावाने जोरदार जयघोष केला.


कॅप्टन एकनाथ शिंदे, वॉईस कॅप्टन अजित पवार


देवेंद्र फडणवीसांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की, आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे, सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, वाईस कॅप्टन अजित पवार, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना अंपायरच म्हणावं लागेल, अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचं? अशी फडणवीसांनी फटकेबाजी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.


काय म्हणाले फडणवीस?


कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालचं खूप खूप कौतुक. आपल्या सर्वांसाठी अतिशय आज आनंदाचा क्षण आहे. ज्या अपराजित टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिलं. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि निवृत्ती घेऊन दु:ख दिलं, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं. 


जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा विधानभवनात सत्कार






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Team India : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव