सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी
टीम इंडियातील मुंबईचे शिलेदार असलेल्या चारही खेळाडूंचा सत्कार आज राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही तुफान फटकेबाजी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचं स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात धुव्वादार फलंदाजी केली. यावेळी, कधी गाणं तर कधी चित्रपटातील डायलॉग मारुन सभागृह गाजवलं.
सूर्यकुमार यादवच्या कॅचचा सभागृहात वारंवार उल्लेख करत काही कोपरखळ्याही मुख्यमंत्र्यांनी मारल्याचं पाहायला मिळालं.
सुनिल वाडेकरांचं एक गाणं आज आठवतंय. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. कारण, सूर्यकुमारचा तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं, असे म्हणत विजयाचा आनंद साजरा करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांच्या अमर, अकबर, एन्थॉनी या चित्रपटातील डायलॉगही सभागृहात म्हणून दाखवला. विशेष म्हणजे हा डायलॉग त्यांनी सूर्याच्या कॅचसाठी बोलून दाखवला.
अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एकही मारा लेकीन सॉलिड मारा. सूर्यकुमारने एकच कॅच घेतला, पण सॉलिड घेतला. सूर्याचा तो कॅच आठवला की, डेव्हिड मिलर रात्री झोपेत दचकून उठत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
भारतीय संघात 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान आहे. तर, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, हेही अभिमानाची बाब आहे., असेही शिंदेंनी म्हटले.
दरम्यान, डायलॉग, गाणं, जुन्या खेळाडूंची आठवण आणि मुंबईचं क्रिकेट सांगत मुख्यमंत्र्यांनी चौफेर फटकेबाजी केली