Maharashtra Breaking News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी बसचा भीषण आपघात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
लालबागच्या राजाचे विसर्जन
मुंबईतील नवसाचा गणपती अशी ओळख असणारा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता निघाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट अशी गर्दी लोटलीय.. भक्तांच्या जनसागरामुळे गणपती बाप्पाच्या पुढच्या मिरवणुकीला मात्र उशीर होतोय. लालबागच्या राजाचे सकाळी 7 वाजता विसर्जन होण्याची शक्यता आहे
पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे' चे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. 10-11 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रिन्स चार्ल्स नवे महाराज
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिजाबेथ यांनी 70 वर्ष सिंहासनाची धुरा सांभाळली. आता त्यांच्या निधनानंतर शाही परिवारात सत्तांतरण कसं होणार याकडे लक्ष लागून आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता नवीन महाराज म्हणून घोषणा करण्यात येणार आहे.
कॉंग्रेसचे गुजरात बंदचे आवाहन
काँग्रेसने (Congress) महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन उद्या गुजरात बंदचे आवाहन केले आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) इंडिया लिजेंड्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) हरभजन सिंह आणि पठाण बंधू यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि श्रीलंकेचे माजी खेळाडू मैदानात दम दाखवतील. इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे.
आजपासून पितृपक्ष पंधरवडा
हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. आजपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे.
Nandurbar : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी बसचा भीषण आपघात
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण आपघात झाला आहे. चरणमाळ घाटात तीव्र उतारावर चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस पलटी झाल्याने आपघात झाला आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बसमधील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत आहे. अपघातस्थळी स्थानिक, नागरिक ,पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यसमितीत एकमताने ठराव मंजूर झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात
बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. आज दिवसभरात बुलढाण्यात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस , मका व इतर पिकांना हा पाऊस लाभदायक असणार आहे. जिल्ह्यातील शेगाव , खामगाव , नांदुरा , मोताळा तालुक्यात विजांसह मुसळधार पाऊस बरसत आहे.
विधानपरिषद आमदारांच्या प्रलंबित नियुक्ती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका
विधानपरिषद आमदारांच्या प्रलंबित नियुक्ती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांच्या नियुक्तीवरून राज्यपालांनी कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ठाकरे सरकारनं सुचवलेल्या राज्यपाल नियुक्त जागांची यादी राज्यपालांनी रद्द केल्याचा विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे
लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनावर बाजार, जत्रांवरही बंदी
राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जनावरांच्या लंपी स्किन आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापुरात जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जनावरांचे बाजार आणि जत्रा पुढचा आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात कोल्हापूरच्या करवीर आणि हातकणंगले तालुक्यात लंपी स्किनचा सर्वाधिक प्रादुर्भाव वाढला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
