Maharashtra Breaking News 09 September 2022 : मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ डी टी शिर्के यांची नियुक्ती करण्यात येणार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Sep 2022 01:16 PM
मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ डी टी शिर्के यांची नियुक्ती करण्यात येणार

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ डी टी शिर्के यांची नियुक्ती करण्यात येणार, कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ 10 सप्टेंबरला पूर्ण होत असताना रिक्त पदी कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरू होत आहे, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 2 ते 3 महिन्याचा अवधी लागणार आहे मात्र, तोपर्यंत कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के हे अतिरिक्त कारभार प्रभारी म्हणून पाहणार आहेत.शिर्के हे मुळचे हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फे वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस.सी केले. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून एम.फील आणि पी.एचडी केली. त्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमूख, प्रभारी कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदांवर त्यांनी काम केले आहे.

Nanded News: नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी चार दिवसाचा बंद पुकारला
आज नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील  व्यापाऱ्यांनी चार दिवसीय बंद पुकारला आहे. वायदे बाजारातून हळदीच्या शेतीमालाचा वायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी हा बंद व्यापाऱ्यांच्या वतीने पुकारण्यात आलाय. दिनांक आठ ते 12 सप्टेंबरपर्यंत हा बंद पुकारला असून तरी प्रशासनाने मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलीय. दरम्यान संपूर्ण भारतामध्ये नांदेड हिंगोली परभणी या जिल्ह्यामधून 50 ते 60 टक्के हळद जाते.त्यामुळे केंद्र शासनाने वायदे बाजारातून व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मुक्त करावे, जेणे करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल व शेतकऱ्याचे नुकसान टळेल यासाठी हा बंद पुकारला आहे.

Solapur News: उजनी धरणातून 60 हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्याने चंद्रभागा वाळवंट पाण्यात

Solapur News: उजनी धरणातून 60 हजार क्युसेक निसर्गाने पाणी सोडल्याने चंद्रभागा वाळवंट पाण्यात, गणेश विसर्जन बनले धोक्याचे 

Delhi News : दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात इमारत कोसळली, 5 जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Delhi News : दिल्लीतील आझाद मार्केट परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरात चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6-7 जण अडकल्याचं वृत्त आहे. अग्निशमन विभागानं ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्याचं विभागानं सांगितलं. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत

आशिया चषकामध्ये आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे.  मागील काही सामन्याचा रिझल्ट पाहाता नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणारा संघानं येथे सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे फायनलपूर्वी  दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रविवारी 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाचा किंग कोण यासाठी सामना रंगणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

'सीता रामम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'सीता रामम' हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपस्टार दुलकर सलमान, पुष्पा फेम रश्मिका मंदान्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटीवर हा सिनेमा तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं कथानक सीता आणि रामच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात प्रेक्षकांना 60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरू करणार टीबी मुक्त अभियान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डिजीटल माध्यमातून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ची सुरूवात करणार आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा छत्तीगड दौऱ्यावर

भाजप अध्यक्षजे जे.पी. नड्डा हे चार दिवस छत्तीगड दौऱ्यावर  आहेत.  या चार दिवसांच्या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

Ganpati Visarjan 2022 : लाडक्या बाप्पांचे आज विसर्जन

Ganpati Visarjan 2022 : दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन  होणार आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे.  हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते.   दहा दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात.  राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन 

दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या लाडक्या बाप्पांचे उद्या विसर्जन  होणार आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे.  हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानल्या जाते.   दहा दिवस मनोभावे गणपतीची पूजा करतात आणि 11 व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जित करतात.  राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. 

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा छत्तीगड दौऱ्यावर 

भाजप अध्यक्षजे जे.पी. नड्डा हे चार दिवस छत्तीगड दौऱ्यावर  आहेत.  या चार दिवसांच्या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुरू करणार टीबी मुक्त अभियान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डिजीटल माध्यमातून ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान’ची सुरूवात करणार आहे.

'सीता रामम' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'सीता रामम' हा सिनेमा आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपस्टार दुलकर सलमान, पुष्पा फेम रश्मिका मंदान्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटीवर हा सिनेमा तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं कथानक सीता आणि रामच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात प्रेक्षकांना 60 ते 70 दशकातील लव्ह स्टोरी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात लढत 

आशिया चषकामध्ये आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे.  मागील काही सामन्याचा रिझल्ट पाहाता नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे. प्रथम गोलंदाजी करणारा संघानं येथे सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे फायनलपूर्वी  दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. रविवारी 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाचा किंग कोण यासाठी सामना रंगणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.