Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
दारूवरील कर 50 टक्क्यांनी कमी केला मग इंधनावरील कर का कमी केला जात नाही? हे सरकार फक्त दारूवाल्यांचं आणि बारवाल्यांच आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
Devendra Fadnavis : नुसत्या इफ्तार पार्टीने रोजगाराचे प्रश्न सुटणार नाहीत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला.
तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गधाधारी आहे असा हल्लोबोल देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर केला आहे.
तुम्ही रामाच्या बाजूने की रावणाच्या हे एकदाच स्पष्ट करा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेला केले आहे.
बाबरी प्रकरणी 32 आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काहींना वाटतं आम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे. परंतु, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. मुंबईतील भाजपच्या बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.
लोक आता तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत असे म्हणतील म्हणून रोज मी हिंदुत्ववादी आहेत असं म्हणतात, असा आरोप करत ईद राष्ट्रीय सण कधीपासून झाला असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
Ashish Shelar : "जो हनुमान चालिसाला विरोध करेल, जो राम मंदिराच्या जागेला विरोध करेल त्याच्याकडे धर्म कासा शिल्लक राहिल? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेकडे फक्त अधर्म राहिला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते मुंबईतील भाजपच्या बूस्टर सभेत बोलत होते.
Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभास्थळी पोहोचले असून थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरूवात होणार आहे.
औरंगाबाद येथे 8 जूनला उद्धव ठाकरेंची सभा दणदणीत होणार आहे. तर येत्या 14 मे ला मुंबईत उद्धव ठाकरे हे आपल्या सभेत प्रत्येक टिकेला उत्तर देतील, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात विदर्भातील नागरिकांचे अनोखे आंदोलन सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तळपत्या उन्हात कार्यकर्त्यांनी सरकारी कार्यालयांवर विदर्भ असे स्टिकर्स लावले आहेत.
Aurangabad News Update : औरंगाबाद DPDC मधून भाजप आमदारांनी सभात्याग केला आहे. निधीमध्ये असमान निधी वाटप केल्याबद्दल भाजप आमदारांनी निषेध व्यक्त केला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेत निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. जिल्ह्याबाहेरच्या नेत्यांना एक ते साडेतीन कोटींचा निधी दिला. मात्र जिल्ह्यातील भाजप आमदारांना केवळ 50 लाखांचा निधी दिला असा असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे.
यवतमाळ पुराच्या पाण्यात प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या अविनाश राठोडचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. मागील पावसाळ्यात नाल्याला आलेल्या पुराचा अंदाज चालकाला न आल्याने महागाव तालुक्यात बस वाहून गेली होती. बस मध्ये 10 ते 11 प्रवाशी असल्याची माहिती मिळताच आपल्या जीवाची पर्वा न करता महागाव तालुक्यातील वाकान येथील युवकाने पुरात धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून जीव वाचवले. त्याच्या या धाडसाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या गौरवामुळे इतरांना प्रेरणा मिळेल, असे मत अविनाश राठोड याने व्यक्त केले.
जनतेला 'अच्छे दिन' दाखवण्याचे स्वप्न दाखवत जनतेला 'बुरे दिन' दाखविण्याचं काम मोदी सरकारने केल्याचा आरोप करत परळीत महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून भोंगा आंदोलन करण्यात आलं आहं. पेट्रोल, डिझेल, गॅस अशा अनेक वस्तूच्या वाढत चाललेल्या किमतीच्या विरोधात परळी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राठोड पेट्रोल पंपासमोर भोंगा दाखवून महागाईच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीच्या निषेध व्यक्त करून निदर्शनं करण्यात आली.
एसी लोकलचे तिकीट दर 50 टक्क्यांनी कमी झाल्यानंतर सरकारनं जनतेला आणखी एक भेट दिली आहे. आता फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये देखील जवळपास 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबईत ही मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे हे औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी काही वेळापूर्वीच पुण्यातून रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 कार्यकर्ते देखील आहेत. शनिवारी राज ठाकरे जेव्हा पुण्यातून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाले, तेव्हा वसंत मोरे त्यांच्यासोबत नसल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. परंतू त्यानंतर आपण राज ठाकरेंसोबत असल्याचा पुनरुच्चार स्वतः मोरे यांनी केला होता. वसंत मोरे यांना भोंग्याच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, भोंगे काढणे हे सरकारचे काम आहे. 3 तारखेला आम्ही मंदिरात महाआरती करणार आहोत. राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाची उत्सुकता सगळ्यांनाच असल्याचे मोरे म्हणाले.
महाराष्ट्रात चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत देखील वाढ होऊ लागली, असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सांगलीत महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याच्या भाषणात ते बोलत होते. चौथ्या लाटेला रोखायचे असेल, तर पुन्हा एकदा आपण स्वत:हून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आणि कोविड प्रतिबंधक लस प्राधान्याने घेण्याची गरज असल्याचे देखील नागरिकांना जयंत पाटील यांनी आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2 मेपासून विदेश दौऱ्यावर आहेत. या विदेश दौऱ्यात पंतप्रधान तीन युरोपीय देशांचा दौरा करणार आहेत. वेळी ते जर्मनी, डेन्मार्क आणि पॅरिसला भेट देणार आहेत. यादरम्यान ते सुमारे 65 तास विदेशामध्ये असणार आहेत. विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान 25 कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत.
महागाईचा सामना करत असलेल्या जनेतवरील दरवाढीचा बोझा आणखी वाढणार आहे. आज मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 104 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात नसून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आली आहे.
देशातील कोरोनाच्या संसर्गात किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 40 जणांचा मृत्यू आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 2876 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 684 झाली आहे.
आता जेलमधील कैद्यांना विनातारण कर्ज मिळणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता जेलमधील कैद्यांना विनातारण 50 हजार रुपयांचं कर्ज मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये ई स्कूटर चालवली. गडकरी यांनी नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची ट्रायल घेतली. नव्या खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या पूजेनंतर गडकरींनी पार्किंगमध्येच इलेक्ट्रिक स्कूटरची ट्रायल घेत आनंद लुटला.
बेळगाव अद्याप महाराष्ट्रात येऊ शकलं नाही, याची खंत कायम राहणार आहे. मात्र ही गावं जोपर्यंत महाराष्ट्रात येणार नाहीत तोपर्यंत या गावांना पाठींबा असणार आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच आपल्याला जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा असल्याचे देखील पवार म्हणाले.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज महाराष्ट्र दिन
राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जोतो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 106 जणांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.
राज ठाकरेंच्या सभेआधी मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला 'बुस्टर डोस'
भारतीय जनता पार्टीकडून सोमय्या मैदानावर देवेंद्र फडणवीसांच्या बुस्टर डोस सभेचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. औरंगाबादमध्ये होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आणखी एक टीझर मनसेनं प्रसिद्ध केलाय.
डॉ. सुमन बेरी नीति आयोगाच्या उपाध्यक्ष होणार
डॉ सुमन बेरी आजपासून नीति आयोगाच्या उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभळणार आहे. राजीव कुमार आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पेन्शन पोर्टलचे उद्घाटन करणार आहेत. लोकभवनात मुख्यमंत्री योगी पेन्शन पोर्टलची सुरुवात करणार आहे.
आयपीएलचा डबल डोस, आज दोन सामने
ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिट्लस आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स रविवारी आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तर सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता भिडणार आहेत. चेन्नईचा संघ धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रवींद्र जाडेजाने शनिवारी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आज इतिहासात
1919 : भारतीय प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म
1955 : महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रांचा जन्म
1988 : अनुष्का शर्माचा वाढदिवस
1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना
1983 : अमरावती विद्यापीठाची स्थापना
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -