मुंबई : हृदय समस्या हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जीवनशैलीतील बदल हा हृदयविकाराच्या (Heart deasease) प्रतिबंधास प्रमुख घटक ठरत आहे. पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य व्यवस्थापित करण्यासाठी 40-45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना नियमित हृदय तपासणीचा सल्ला दिला जातो. एकदा जोखीम घटकांचे निदान झाले की तुम्ही हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेवर ह्रदय तपासणी केल्याने एखाद्याला हृदयाच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती मिळविता येते आणि हृदय निरोगी राखत आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी याची मदत होते.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 2023 च्या अहवालानुसार, भारतातील एकुण मृत्यूंपैकी 30% मृत्यू हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होतात, ज्याचे प्राथमिक कारण म्हणजेच इस्केमिक हृदयरोग. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार शहरी जीवनशैलीतील घटक जसे की आहाराची चूकीची सवय, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लाखो रुग्ण आपल्या भारतात आहेत. तज्ञांनी शिफारस केलेल्या चाचण्या करणे गरजेचे आहे आणि त्या किती वेळा कराव्यात जेणेकरुन रुग्णांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात
हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या चाचण्या करा
रक्तदाबाचे निरीक्षण: हृदयाच्या रुग्णांसाठी आठवड्यातून 2-3 वेळा रक्तदाब निरीक्षण करण्याचा वैद्यकिय सल्ला दिला जातो.
लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल चाचणी): उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच, हृदयाच्या रुग्णांनी दर 6 महिन्यांनी तपासणी करावी.
इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG): हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी कराव्यात या खालील तपासण्या
स्ट्रेस टेस्ट: हृदयाच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी मिळविण्यासाठी ही चाचणी दरवर्षी केली पाहिजे.
दर 6 महिन्यांनी रक्तातील साखरेची पातळी तपासा.
मधुमेह हा हृदयविकार आणि त्याशी संबंधीच मृत्यूचा धोका वाढवतो
नियमित तपासणी केल्याने ह्रदयाच्या रूग्णांना आरोग्य व्यवस्थापन करण्यास मदत होते आणि हृदयाच्या समस्येशी लढा दिल्यानंतर उद्भवणारी कोणत्याही गुंतागुंत टाळता येते. सक्रिय जीवनशैली बाळगणे हे एखाद्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. शस्त्रक्रियेनंतर किंवा उपचार घेत असतानाही तुमच्या हृदयाशी संबंधीत समस्येबाबय जागरुक रहा. हृदयाच्या स्थितीचे त्वरित व्यवस्थापन करा आणि एखाद्याच अमुल्य जीव वाचवण्यासाठी वेळोवळी तपासणी आणि वेळीच निदान करा.
हेही वाचा
Video: शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन