Maharashtra Breaking News LIVE Updates : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Apr 2022 08:43 PM
Ahmadnagar Fire : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग

Ahmadnagar Fire : अहमदनगर जिल्हा बँकेच्यावरील मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत पहिला मजला जळाला आहे.  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे  प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. 

Akola News Update : महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला जामीन मंजूर

Akola News Update :  छत्तीसगडमधील रायपूरमध्ये धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजला जामीन मंजूर झाला आहे. एक लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर बिलासपूर उच्च न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 26 डिसेंबर 2021 ला महात्मा गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज्यातही  वर्धा, पुणे, ठाणे, अकोला आणि कल्याण येथे कालिचरणवर महारावर गुन्हे दाखल झाले होते.  सोमवारी ते तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

Mumbai Local :  लोकलखाली म्हशी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local :  लोकलखाली म्हशी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण ते कसारा मार्गावरील टिटवाळा स्टेशनजवळ अपघात घडला.  एकूण तीन म्हशी आल्या.  लोकांसमोर त्यापैकी केवळ एकच म्हैस  जिवंत आहे
यामुळे तब्बल एक तास कसारा मार्गावरील वाहतूक पूर्णतः  ठप्प होती.  राजधानी एक्सप्रेस देखील अडकली तसेच नंदीग्राम आणि मुंबई आग्रा एक्सप्रेस देखील यामुळे  थांबून होती. तसेच दोन टिटवाळा लोकल आणि एक आसनगाव लोकल देखील रखडली. एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्यामुळे टिटवाळा, आसनगाव, कसारा येथून सुटणाऱ्या लोकल  प्रचंड उशिराने धावत आहेत. 

Parbhani News Update : पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा  केक कापला, परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन  

Parbhani News Update : इंधनाचे वाढते दर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आश्वासन हे सर्व जुमले असल्याचा आरोप करत परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा केले कापून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.  शिवाय यावेळी वाढत्या महागाईचा निषेध या आंदोलक कर्त्यांनी केला. 

Kirit Somaiya : किरीट सोमय्या पुण्यातील आयकर सदनमध्ये 

भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुण्यातील आयकर सदन या ठिकाणी पोहोचल्या आहेत. महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचलेत. हसन मुश्रीफ यांनी लुटीचा माल सरकारी तिजोरीत जमा करावा. राऊत यांनी पहिला हप्ता म्हणून 55 लाख रुपये ED कडे भरले आहेत, त्यांच्याकडून मुश्रीफ यांनी काहीतरी शिकावं असं किरीट सोमय्या म्हणाले. 

  Raj Thackeray : अयोध्येच्या दौऱ्याची तारीख राज ठाकरे उद्या मेळाव्यात करणार जाहीर; सूत्रांची माहिती

  Raj Thackeray : राज ठाकरे उद्या गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करणार असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Wether Update : महाराष्ट्र तापला, चंद्रपूरचे तापमान 44 अंशावर

Maharashtra Wether Update : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये उष्णतेचा कहर सुरु आहे. चंद्रपूर जिल्हात या वर्षी पहिल्यांदाच 44 अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली असून गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाली आहे. 


आजते तापमान 
धुळे 40 अंश सेल्सिअस


चंद्रपूर 44 अंश सेल्सिअस


जळगाव  43 अंश सेल्सिअस 
अमरावती 42 अंश सेल्सिअस


बेळगाव 38 अंश सेल्सिअस


वाशिम तापमान 41.5 अंश सेल्सिअस


बुलढाणा 40  अंश सेल्सिअस
 
वर्धा  43.2 अंश सेल्सिअस 

Buldhana News Update : 14 एप्रिलपासून संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी  इ पास लागणार नाही 

Buldhana News Update : संत गजानन महाराज मंदिरात 14 एप्रिलपासून दर्शनासाठी  इ पास लागणार नाही.  10 एप्रिलपर्यंत इ  पास नोंदणी झालेली असल्याने 10 एप्रिलपर्यंत इ पास बंधनकारक आहे. कोरोना नियमानुसार केलेली दर्शन व्यवस्था काढून घेण्यासाठी व दर्शन व्यवस्था  पूर्ववत करण्यासाठी 11 एप्रिल ते 13 एप्रिल दर्शनासाठी मंदिर  पूर्ण बंद राहील. 2 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत राम जन्मोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा होईल.

मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण नाही

Maharashtra News :  मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाच निमंत्रण नाही. भाजप सेना काळात मेट्रोचं काम सुरू झालं होतं.  या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. यातच आज बांद्र्यात लागलेले फडणवीसांचे बॅनर यावरून श्रेयवाद रंगला. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमालाच निमंत्रण नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नसलं तरीही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मात्र कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे

Amravati News Updates :  इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीमधील दर्यापूर येथे प्रहारच्या वतीने बैलबंडी मोर्चा

Amravati News Updates : केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ आज दर्यापूर प्रहार युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला आहे. बसस्थानक चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी बैलबंडीत दुचाकी आणि सिलेंडर ठेवून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Chandrapur Temp : चंद्रपूर जिल्ह्यात 50 वर्षात मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद

Chandrapur Temprature : चंद्रपूर जिल्हात या वर्षी पहिल्यांदाच 44 अंशाच्या वर तापमानाची नोंद झाली असून गेल्या 50 वर्षात मार्च महिन्यात सर्वात उच्चांकी तापमानाची प्रथमच नोंद झाली आहे

Nashik News Updates : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा बदलीसाठी अर्ज, गृहखात्याकडे अर्ज केल्याची सूत्रांची माहिती

Nashik News Updates : नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा बदलीसाठी अर्ज, गृहखात्याकडे अर्ज केल्याची सूत्रांची माहिती, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील कारवाई नंतर दीपक पांडे चर्चेत, नुकताच नाशिक मध्ये हेल्मेट सक्तीवरून पांडे यांच्यावर पेट्रोल पंप चालकांची नाराजी

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील घेणार मुख्यमंत्र्यांची भेट


संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नाराजी नंतर मुख्यमंत्री यांची भेट घेणार


गृहमंत्री वर्षावर 1 वाजता भेटणार मुख्यमंत्र्यांना


गेले अनेक दिवसांपासून गृहमंत्री यांच्यावर महाविकास आघाडीचे मंत्री नाराज असल्याची चर्चा


मुख्यमंत्री यांच्या भेटी दरम्यान काय चर्चा होणार याकडे लक्ष

Amravati : महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या; वर्ष वाया जाण्याचे भीतीने विद्यार्थ्याने आत्महत्या केली असा कुटुंबाचा आरोप

Amravati : वसुधाताई देशमुख ऑफ फूड टेकनोलॉजी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या. फी न भरल्याने महाविद्यालयाने परीक्षेला परवानगी नाकारली होती. वर्ष वाया जाण्याचे भीतीने विद्यार्थ्याने आत्महत्या केली असा कुटुंबाचा आरोप आहे. अनिकेत अशोक निरगुडकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. नातेवाईकांचा बडनेरा ठाण्यात आक्रोश, महाविद्यालयावर कारवाईची मागणी कुटुंबातील लोक करत आहेत.  हे कॉलेज काँग्रेसच्या माजीमंत्री वसुधाताई देशमुख यांचा आहे.

Shirdi Saibaba News : साईभक्तांना मोठा दिलासा, दर्शनासाठी बायोमॅट्रिक पास काउंटर बंद

Shirdi Saibaba News : साईभक्तांना मोठा दिलासा, दर्शनासाठी बायोमॅट्रिक पास काउंटर बंद ,  विना पास दर्शन रांगेत प्रवेश केला सुरू.. साईबाबा संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनात समन्वयाचा सकाळी होता अभाव.. एबीपी माझाच्या वृत्तानंतर साईभक्तांना दिलासा.. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी सुरू..  आता दर्शनासाठी पास पास सक्ती नाही..

ॲड. सतीश उके यांना ईडीनं नागपूरवरुन मुंबईला आणलं, पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार

ॲड. सतीश उके यांना ईडीनं नागपूरवरुन मुंबईला आणलं. सीजे हाउसमधील ईडीच्या कार्यालयात त्यांना ठेवण्यात आलंय. 11 वाजता दरम्यान त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं त्यांना अटक केलीय. 

पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नाही, जिल्हाधिकारी राजेश देशमुखांचं स्पष्टीकरण

Pune News : पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसेल तर त्यांचं प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटलय. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख म्हणाले. 

Buldhana News : दसरखेड एमआयडीसी परिसरातील रजत ॲग्रो कंपनीला भीषण आग

 मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील रजत ॲग्रो कंपनीत आग लागली. या घटनेत कंपनीतील प्रोसेसिंगकरिता असलेला चना माल व बारदाणाचे तब्बल २ हजार बंडल जळून खाक झाले. आगीत लाखोंची हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दसरखेड एमआयडीसीत रजत ॲग्रो कंपनी असून या कंपनीचे काम तीन मजल्यावर चालते. येथे हरभरा व सोयाबीनवर प्रक्रिया करून पेरणीला लागणारे बियाणे तयार केले जाते. सद्यस्थितीत या कंपनीत हरभऱ्यावर प्रोसेस करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे कंपनीत चना माल व मोठ्या प्रमाणात बारदाणा होता.तिन्ही मजल्यावर आग वेगात पसरली. 

Ulhasnagar Mahapalika Tax : उल्हासनगर महापालिकेकडून मालमत्ता कराची 110 कोटींची विक्रमी वसुली

Ulhasnagar Mahapalika Tax : यंदा महापालिकेच्या तिजोरीत पहिल्यांदाच मालमत्ता करापोटी 110 कोटी रुपये जमा झाले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2014-15 साली 103 कोटींची वसुली ही सर्वोच्च होती. मात्र अभय योजना लागू झाल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कर भरण्याला प्राधान्य दिले होते. ३१ मार्चला सकाळपासून रात्री १२ वाजेपर्यंत कर भरणा करण्यासाठी नागरिक पालिकेत आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत कर भरणा करण्यासाठी कोणती अडचण नाही ना याची विचारपूस देखील केली. आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटचे चार दिवस महापालिकेच्या कर विभागाकडून रात्री १२ पर्यंत मालमत्ता कर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी करण्यात आली  होती, त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत नागरिक कर भरणा करण्यासाठी पालिकेत हजर होते.

Sindhudurg News : सिंधुदुर्गात अनधिकृत बैल झुंजी लावल्या प्रखरणी बारा प्रमुख संशयिता विरोधात गुन्हे दाखल
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याती मालवण मधील तळगाव गावात अनधिकृत बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी तसेच एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील बारा प्रमुख संशयित आरोपींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. प्युअर अनिमल लव्हर (पाल) या प्राणी प्रेमी संस्थेच्या माध्यमातून मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भादवी कमल 429, 34 यासह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11 नुसार संशयित आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

दोन दिवसांपूर्वी तळगाव गावडेवाडी तलावानजिक बैल झुंजीचे अनधिकृत पणे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. यात बैलांचा होत असलेला छळ, बैलांना झालेली दुखापत हे स्पष्टपणे दिसत होते. सुमारे पाचशे ते सहाशे लोकांचा जमाव दिसून येत होता. या झुंजीत जखमी झालेल्या एका बैलाचे निधन झाले. त्यांनतर प्राणी मित्र संघटना एकत्र येत त्या व्हिडिओ मधील व्यक्तींची खातरजमा केली. आयोजकां बाबत माहिती मिळवली. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सिंधुदुर्ग पोलिसांच्या मार्गदर्शनाखालीच मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Kalayan News : केडीएमसीच्या बारावे येथील कचरा प्रकल्पाला आग

Kalayan News : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील बारावी येथे सुका कचरा वर्गीकरण करण्याचा प्रकल्प आहे. आज पहाटेच्या  सुमारास या प्रकल्पात जमा केलेल्या  कचऱ्याला अचानक आग लागली. सुका कचारा असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं. या प्रकल्पात वर्गीकरण करणाऱ्या मशीनला आगीची झळ बसली आहे. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरला होत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन तासाच्या प्रयत्नांनंतर  आगीवर नियंत्रण मिळवल आहे .आगीच कारण अद्याप कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी आधारवाडी डम्पिंग ग्राउंड वरील कचऱ्याला आग लागली होती. त्या पाठोपाठ आता बारावे येथील प्रकल्पातील कचऱ्याला आग लागल्याने केडीएमसीची डोकेदुखी वाढली आहे. 

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आजपासून कोणताही दंड आकारणार नाहीत

मुंबई : विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आजपासून कोणताही दंड आकारणार नाहीत. मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने 19 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोलिसांची मदत मागितली होती. त्यानंतर महापालिकेने दंड आकारण्याचे अधिकार पोलिसांना दिले होते. आजपासून मुंबई महापालिकेने हे अधिकार पोलिसांकडून परत घेतले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडील फाईन बुक आणि आतापर्यंत आकारलेली दंडाची रक्कम जमा करण्याची विनंती महापालिकेने केली आहे.

पनवेल महापालिकेकडून ॲानलाईन विवाह नोंदणीस सुरुवात, नव्या जोडप्यांना हेलपाटे मारण्यापासून दिलासा

पनवेल : तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना विवाह नोंदणी करणे सोपे जावे यासाठी पनवेल महापालिकेने पुढचे पाऊल उचलले आहे. यापुढे नागरिकांना विवाह नोंदणी करता महापालिकेच्या मुख्यालयात ये-जा करावी लागणार नाही. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नागरिकांना 1 एप्रिलपासून विवाह नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार असल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितलं. महापालिकेच्यावतीने 'मॅरेज रजिस्ट्रेशन पोर्टल' सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या पोर्टलचे ट्रेनिंग देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे.

Nashik News : गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिक शहरातील पेट्रोल पंप बंद राहणार, पोलीस आयुक्तांविरोधात बंड

Nashik News : गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील पेट्रोल पंप बंद राहणार आहे. पोलीस आयुक्त दिपक पांडे यांच्यांविरोधात पेट्रोल पंप चालकांनी बंड पुकारला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही याप्रकरणी मध्यस्थी केली, पण त्यांचा प्रयत्न  अयशस्वी ठरला. पंप चालकांनी छगन भुजबळ यांची सकाळी भेट घेतली होती. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकांची गैरसोय करू नका, भुजबळांनी आवाहन केलं होतं. भुजबळांचे आवाहन धुडकावून होणार पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचं पेट्रोल पंप चालकांनी सांगितलं आहे. तसेच, विना हेल्मेट पेट्रोल दिलं तर पंप चालकांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशाच्या निषेधार्थ पंप बंद राहणार आहे. 

Pune News : पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती

Pune News : पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका अशा सगळ्या परिसरातल्या रस्त्यांवर हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. शिवाय 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचं असेल. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आदेश हे आदेश दिले आहेत. दरम्यान हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात अशी माहिती या पत्रकात दिली आहे. 

Maharashtra Coronavirus : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका

Maharashtra Coronavirus : आजपासून राज्यातील कोरोनासंदर्भातील सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यामुळं महाराष्ट्र पूर्णपणे निर्बंधमुक्त झालाय. यामध्ये सर्वात महात्त्वाचा निर्णय आहे तो मास्कमुक्तीचा. मास्क घालणं ऐच्छिक करण्यात आलंय. ज्यांना मास्क लावायचा त्यांनी लावावा, ज्यांना मास्क नसेल लावायचा त्यांनी लावू नये असं सरकारनं स्पष्ट केलंय.  
50 टक्के उपस्थिती, दुहेरी लसीकरण ही अटीही मागे घेण्यात आल्यानं मुंबई लोकमधून प्रवास करण्यासाठी पूर्वीसारखं दोन डोस घेतलेलं लसीचं प्रमाणपत्र आवश्यक नसणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर गुढीपाडव्य़ासह इतर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Petrol Diesel Price : इंधन दरवाढीचा भडका! आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?


Petrol Diesel Price Today 1st April : पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या दरांनी सर्वसामान्यांनी धाकधूक वाढवली आहे. अशातच आजचा दिवस सर्वसामान्यांसाठी काहीसा दिलासादायक ठरला आहे. कारण भारतीय तेल कंपन्यांनी आज देशातील इंधन दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. आज आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. असं असलं तरी गेल्या काही दिवसांत सातत्यानं झालेल्या दरवाढीनंतर अनेक शहरांत पेट्रोल-डिझेल शंभरीपार पोहोचलं आहे. 


शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. आजच्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 85 पैशांची तर डिझेलच्या दरांत 85 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये डिझेलनंही शंभरी ओलांडली आहे.  


दरवाढीचा झटका, हळूहळू देतायत तेल कंपन्या 


देशात 22 मार्च 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. 22 मार्च ते 23 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेल प्रतिदिन 80 ते 80 पैशांनी महागलं. 24 मार्च रोजी कोणताही बदल झाला नाही, मात्र 25 मार्चपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल 26 पर्यंत 80-80 पैशांनी वाढलं. यानंतर 27 मार्च रोजी पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 55 पैसे महागले. 


ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला अल्टिमेटम संपला; 'दादांच्या' आदेशानंतर आजपासून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता 


एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee) संप अजूनही मिटलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंतकामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी दिलेली ही मुदत काल संपली. अजूनही एसटीचे हजारो कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यांना कामावर हजर न झाल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.