Lok Sabha Election Voting Live Update : देशात तिसऱ्या टप्प्यात अंदाजे 62.27 टक्के मतदान, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती?

Maharashtra Lok Sabha Election Voting LIVE Updates : देशात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज. महाराष्ट्रातील 11 मतदासंघात मतदान प्रक्रिया सुरू, मतदारराजा आज दिग्गजांचं भवितव्य ठरवणार...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 07 May 2024 11:30 PM
राज्यात अंदाजे 62 टक्के मतदान, जाणून कोणत्या मतदारसंघात किती?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे  2024 रोजी सकाळी 7.00 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 62 टक्के मतदान पार झाले. कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले? जाणून घेऊयात...


लातूर- 60.18


सांगली- 60.95


बारामती- 56.07


हातकणंगले - 68


कोल्हापूर- 70.35


माढा- 61.17


उस्मानाबाद-  60.91


रायगड- 58.17


रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 59.23


 सातारा- 63.05


सोलापूर- 57.61


 

Ratnagiri : चिपळूणमध्ये मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ, 400 मतदान ताटकळत

चिपळूणमधील खेड परिसरात मतदान केंद्रात लाईट नसल्याने गोंधळ उडाला आहे. अंधारात मतदान करावे लागत असल्याने अद्यापही चारशेहून अधिक मतदार केंद्राच्या बाहेर मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मतदार आक्रमक झाल्यानंतर प्रशांसन कामाला लागलं असून विजेची व्यवस्था करण्यासाठी व्यवस्थेची धावपळ सुरू आहे. 


रांगेतील मतदान संपण्यास रात्रीचे  9 वाजतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदार आक्रमक झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रात अंधार असल्याने प्रक्रियेला अर्धा तासाहून अधिकचा वेळ जात असल्याने रांगेतील मतदार ताटकळले आहेत. आक्रमक मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे मतदान केंद्रात पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनावश्यक गर्दी हटवत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

Sindhudurg  : नॉट रीचेबल असलेले किरण सामंत यांनी अखेर मतदान केलं, पालीमध्ये बजावला मतदानाचा हक्क

सकाळपासून नॉट रीचेबल असलेले किरण सामंत यांनी अखेर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू असून त्यांनी पाली या त्यांच्या मूळगावी मतदानाचा हक्क बजावला. 

EVM Fire : मतदाराने ईव्हीएम पेटवलं, माढा मतदारसंघातील सांगोल्यामधील प्रकार

सोलापूर : मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न सांगोल्यात करण्यात आला आहे. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. सांगोला तालुक्यातील बादलवाडीमधील ही घटना समोर आली आहे. सांगोल्यातील बादलवाडीत मतदाराकडून ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Latur : सूनेगाव सांगवी गावच्या मतदान केंद्रावर मतदान झालेच नाही...गावाची "ही" होती मागणी

Latur : लातूर लोकसभा मतदारसंघ ची निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे मात्र सुनेगाव सांगवी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.बहिष्कार टाकण्याचे मुख्य कारण एकच आहे.हे गाव लातूर नांदेड हायवे वर आहे. मात्र ह्या गावाला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी हायवेला कट रस्ता नाही. यामुळे गावकऱ्यांना वळसा घालून जावे लागते.यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शेती, शाळेत जाताना सर्वांना खूप त्रास होत आहे.यामुळे या मागणीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. 477 मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.मतदान केंद्र कडे कोणी ही फिरकले ही नाही ..लोकसभा च नव्हे तर मागणी मान्य झाली नाही तर कोणत्याच निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे .

दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 43.46 टक्के मतदान, रत्नागिरी –सिंधुदूर्ग , उस्मानाबाद, रायगडमधील टक्केवारी किती?

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे  2024 रोजी सकाळी 7.00 वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 मतदार संघात  दुपारी 3 वाजेपर्यंत  सरासरी  42.63 टक्के मतदान झाले आहे. 11 पैकी रत्नागिरी –सिंधुदूर्ग - 44.73  टक्के, उस्मानाबाद - 40.92 टक्के तर रायगड लोकसभा मतदारसंघात - 41.43  टक्के मतदान झाले आहे. 

Maharashtra Lok Sabha Election : राज्यात 3 वाजेपर्यंत एकूण 46.63 टक्के मतदान, मतदानात कोल्हापूर आणि हातकणंगलेची आघाडी

राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 46.63  टक्के मतदान झालं. 


लातूर – 41 अंश – 44.48टक्के  
सांगली – 40 अंश  – 41.30 टक्के
बारामती – 40 अंश – 34.96 टक्के
हातकणंगले – 39 अंश – 49.94 टक्के
कोल्हापूर – 38 अंश – 51.51 टक्के
माढा – 40 अंश – 39.11 टक्के
धाराशिव – 40 अंश – 40.92 टक्के
रायगड – 33 अंश – 41.43 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 33 अंश – 44.73टक्के
सातारा – 36 अंश – 43.83 टक्के
सोलापूर – 42 अंश – 39.54 टक्के

Latur Lok Sabha Election : लातूर येथे अजब प्रकार, गोदावरी कन्या प्रशाला या शाळेत मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे वगळली मतदानापासून वंचित...

Latur Lok Sabha Election : लातूर शहरातील गोदावरी कन्या प्रशाला बूथ क्रमांक 65 ते 76  या मतदान केंद्रावर आठ ते दहा लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असाच काहीसा प्रकार निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावात ही समोर आला आहे. मागील तीस वर्षापासून सुरेखा पानसरे याच मतदान गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय केंद्रावर मतदान करतात पण यावेळी त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यामुळे त्या मतदानापासून यावेळी वंचित राहिले आहेत. याच सोबत या मतदान केंद्रावरील आतापर्यंत आठ ते दहा लोक असे समोर आले आहेत ज्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे. ही नावे का वगळण्यात आली आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.  लातूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या मतदान केंद्राला भेट देऊन तुम्ही आधीच याची पडताळणी करायला हवी असे उत्तर ज्या मतदारांना देऊन निघून गेल्या. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केला जात असताना जे लोक मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आले त्यांचं नाव मतदार यादीतून वगळल्याच प्रकार समोर आला असल्याने ही चूक नेमकी कुणाची आहे? हा प्रश्न  उपस्थित होत आहे. 

Latur Lok Sabha Election : लातूर येथे अजब प्रकार, गोदावरी कन्या प्रशाला या शाळेत मतदार यादीतून अनेक मतदारांची नावे वगळली मतदानापासून वंचित...

Latur Lok Sabha Election : लातूर शहरातील गोदावरी कन्या प्रशाला बूथ क्रमांक 65 ते 76  या मतदान केंद्रावर आठ ते दहा लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असाच काहीसा प्रकार निलंगा तालुक्यातील पानचिंचोली या गावात ही समोर आला आहे. मागील तीस वर्षापासून सुरेखा पानसरे याच मतदान गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय केंद्रावर मतदान करतात पण यावेळी त्यांचं नाव वगळण्यात आलं आहे. यामुळे त्या मतदानापासून यावेळी वंचित राहिले आहेत. याच सोबत या मतदान केंद्रावरील आतापर्यंत आठ ते दहा लोक असे समोर आले आहेत ज्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलं आहे. ही नावे का वगळण्यात आली आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.  लातूरच्या जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर यांनी या मतदान केंद्राला भेट देऊन तुम्ही आधीच याची पडताळणी करायला हवी असे उत्तर ज्या मतदारांना देऊन निघून गेल्या. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केला जात असताना जे लोक मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी आले त्यांचं नाव मतदार यादीतून वगळल्याच प्रकार समोर आला असल्याने ही चूक नेमकी कुणाची आहे? हा प्रश्न  उपस्थित होत आहे. 

Satara Loksabha Votting : साताऱ्यात एक वाजेपर्यंत  32.78 टक्के मतदान

Satara Loksabha Votting : सातारा लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत  32.78 टक्के मतदान पार पडलं आहे. साताऱ्यात संथ गतीने मतदान सुरु असल्याचं दिसून येत आहे. 
 

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत दुपारी 1 वाजेपर्यंत 29.65 टक्के मतदान

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत दुपारी 1 वाजेपर्यंत 29.65 टक्के मतदान झालेलं आहे.

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 29.32 टक्के मतदान

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 29.32 टक्के मतदान झालं आहे.

Maharashtra Voting: महाराष्ट्रात दुपारी 1 पर्यंत सरासरी 31.55 टक्के मतदान

Maharashtra Voting:   राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी 1 वाजेपर्यंत  सरासरी 31.55  टक्के मतदान झाले आहे. 


राज्यात एकूण टक्के 31.55 टक्के मतदान


लातूर – 40 अंश – 32.71 टक्के  
सांगली – 38 अंश  – 29.65 टक्के
बारामती – 39 अंश – 27.55 टक्के
हातकणंगले – 37 अंश – 36.17 टक्के
कोल्हापूर – 37 अंश – 38.42 टक्के
माढा – 40 अंश – 26.61 टक्के
धाराशिव – 39 अंश – 30.54 टक्के
रायगड – 33 अंश – 31.34 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 32 अंश – 33.19 टक्के
सातारा – 36 अंश – 32.78 टक्के
सोलापूर – 40 अंश – 29.32 टक्के

ऐन मतदानाच्या दिवशी किरण सामंत नॉट रिचेबल, भाजप-शिंदे गटाची धाकधूक वाढली

किरण सामंत यांचे कार्यकर्ते हे सकाळपासून त्यांना फोन लावत आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही किरण सामंत यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होते.

रामदास कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. गद्दार कोण याचा फैसला जनता करेल, महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल. राज्यात महायुतीला वातावरण चांगले, 45 पेक्षा जास्त जागांवर निवडून येऊ , योगेश कदम यांचा दावा. गीतेंचे समाजाचे राजकारण यावेळी चालणार नाही, रामदास कदम यांचे वक्तव्य.

भास्कर जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी त्यांच्या चिपळूणमधील तुरुंबव येथील मूळ गावी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. होणाऱ्या एकूण मतदानापैकी 75 टक्के मतदान अनंत गीते यांना होईल.  देशाचे संविधान वाचण्यासाठी आणि परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन.

दत्तात्रय भरणेंचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.94 टक्के मतदान

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.94 टक्के मतदान झालं आहे.

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत सकाळी 11 वाजेपर्यंत 16.61 टक्के मतदान

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत सकाळी 11 वाजेपर्यंत 16.61 टक्के मतदान झालेलं आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 21.19 टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 21.19 टक्के मतदान

रायगड लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 17.18 टक्के मतदान

रायगड लोकसभा मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 17.18 टक्के मतदान

Satara Loksabha Votting : सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.85% मतदान

Satara Loksabha Votting :  सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये (Satara Loksabha Votting) सकाळी 11 वाजेपर्यंत 18.85% मतदान  पार पडलं. या मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी थोड्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र उन्हाचा पारा वाढल्याने मतदान काही प्रमाणात संथ गतीने सुरु असल्याचं दिसत आहे. 

Satara Loksabha Votting : सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.85% मतदान

Satara Loksabha Votting :  सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये (Satara Loksabha Votting) सकाळी 11 वाजेपर्यंत 18.85% मतदान  पार पडलं. या मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी थोड्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र उन्हाचा पारा वाढल्याने मतदान काही प्रमाणात संथ गतीने सुरु असल्याचं दिसत आहे. 

Maharashtra Voting: महाराष्ट्रात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी  18.18  टक्के मतदान 

Maharashtra Voting:   राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात ११वाजेपर्यंत  सरासरी  १८.१८  टक्के मतदान झाले आहे.


तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११  लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


लातूर - २०.७४ टक्के 
सांगली - १६.६१ टक्के
बारामती - १४.६४ टक्के
हातकणंगले - २०.७४ टक्के
कोल्हापूर -२३.७७ टक्के
माढा -१५ .११ टक्के
उस्मानाबाद -१७.०६ टक्के
रायगड -१७.१८ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के
सातारा -१८.९४ टक्के
सोलापूर -१५.६९ टक्के

Latur Lok Sabha Election 2024 : अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनिलिया आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावला.

Latur Lok Sabha Election 2024 :  अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनिलिया आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावला. 


 





Latur Lok Sabha Election : लातूर लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात; नांदेडच्या लोहा विधानसभा क्षेत्राचा समावेश असलेल्या 330 मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह

Latur Lok Sabha Election :   तिसऱ्या टप्प्यातील  लातूर लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.लातूर लोकसभेसाठी  एकुण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. लोहा मतदारसंघात एकूण 330 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आज सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी लोहा विधानसभा क्षेत्रात 1460 कर्मचाऱ्या सह  365 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली . तर एकूण 34 झोनल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असून मतदारांनी मतदानासाठी घरा बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी

Maharashtra Lok Sabha Election 2024: सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी


राज्यात एकूण 18.18 टक्के मतदान 


लातूर - 37 अंश – 20.74 टक्के  
सांगली – 34 अंश  – 16.61 टक्के
बारामती – 36 अंश – 14.64 टक्के
हातकणंगले – 34 अंश  - 20.74 टक्के
कोल्हापूर – 33 अंश – 23.77 टक्के
माढा – 37 अंश  - 15.77 टक्के
धाराशिव – 37 अंश  - 17.06 टक्के
रायगड – 33 अंश  - 17.18 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 32 अंश  - 21.19 टक्के
सातारा – 35 अंश  - 18.94 टक्के
सोलापूर – 37 अंश  - 15.69 टक्के

महाडमध्ये मतदानकेंद्राबाहेर मतदाराचा मृत्यू

रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असताना मतदाराचा मृत्यू ओढावल्याची घटना  महाड तालुक्यात घडली आहे. येथील किंजळोली दाभेकर कोंडमध्ये मतदानाला निघालेल्या प्रकाश चीनकडे यांनी प्राण गमावले.

Latur Lok Sabha Election : कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क 

Latur Lok Sabha Election : लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी उदगीर येथे मतदान केले. संजय बनसोडे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना बळीचा बकरा बनवले आहे, अशी टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. वाचा सविस्तर

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 5.92 टक्के मतदान

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूर लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 5.92 टक्के मतदान झालं आहे.

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत सकाळी 9 वाजेपर्यंत 5.81 टक्के मतदान

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत सकाळी 9 वाजेपर्यंत 5.81 टक्के मतदान झालेलं आहे.
 

Lok Sabha Election: महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.64 टक्के मतदान, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

Lok Sabha Election: देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात ११ तर देशात ९३ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.  राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.


पहिल्या दोन तासांतली मतदानाची टक्केवारी


राज्यात एकूण 6.64 टक्के मतदान 


1. लातूर – 7.91 %
2. सांगली – 5.81 %
3. बारामती – 5.77 %
4. हातकणंगले – 7.55 %
5. कोल्हापूर – 8.04 %
6. माढा – 4.99 %
7. धाराशिव – 5.79 %
8. रायगड – 6.84 %
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 8.17 %
10. सातारा –7.00 %
11. सोलापूर – 5.92 %  

Latur Lok Sabha Election: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Latur Lok Sabha Election:  शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदानाचा हक्क बजावला.



बेळगावात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बेळगावात एका मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्यावर लगेचच मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. इनव्ह्यालिड असा संदेश मतदान यंत्रावर आल्याने मतदान थांबले.होसुर येथील सरकारी शाळेतील २१७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.मतदान यंत्रात बिघाड झाल्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून मतदारांना रांगेत वाट बघत उभे राहावे लागले आहे.उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली असून मतदान यंत्रातील बिघाडामुळे त्यांना वाट बघत थांबावे लागले आहे.

बाबा तूच वस्तरा घे आणि काढ... मिशी काढण्याच्या वक्तव्यावरुन अजितदादांचा श्रीनिवास पवारांना टोला

अजित पवार यांनी बारामतीत मतदान केल्यानंतर श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर दिले. अजित पवार नक्की काय म्हणाले.

Solapur Lok Sabha Election Voting: राम सातपुते यांनी बजावला मतदानाचा हक्क
Latur Lok Sabha Elections : लातूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

Latur Lok Sabha Elections : लातूर लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे सुधाकर  श्रृंगारे आणि काँग्रेसचे  डॉ. शिवाजी बंडप्पा कलगे यांच्यात प्रमुख लढत आहे. 

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : लोकसभा निवडणुकीत पैसे, दारू वाटल्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा केल्यानं ओमराजे निंबाळकर संतप्त, पोलिसांना झापलं

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : ओमराजे निंबाळकरांनी संतप्त होत लातूर पोलीस अधिक्षक धाराशिव जिल्हाधिकारी यांना फोन करुन झापले 


लोकसभा निवडणुकीत पैसे, दारू वाटल्या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा केल्यानं ओमराजे निंबाळकर संतप्त


निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे प्रकरण गंभीर असताना अदखलपात्र गुन्हा कसा नोंद केला 


जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, कारवाईवरून पोलिसांना झापले 


पोलीस यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव दाखल करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे ओमराजे यांना फोनवर आश्वासन

Sharad Pawar :शरद पवारांनी लेक आणि नातीसह मतदानाचा हक्क बजावला

Sharad Pawar :  शरद पवारांनी लेक सुप्रिया सुळे आणि नात रेवतीसह मतदानाचा हक्क बजावला आहे.  

पश्चिम महाराष्ट्राच्या निवडणुकीमुळे देशाची दिशा बदलेल- धैर्यशील मोहिते पाटील

पश्चिम महाराष्ट्रामुळे देशातील लोकसभा निवडणुकीची दिशा बदलेल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले. 

नारायण राणे मतदानापूर्वी देवदर्शनाला

नारायण राणे हे मतदानासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. यानंतर नारायण राणे यांनी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. थोड्याचवेळात ते मतदानाचा हक्क बजावतील. 

Baramati Lok Sabha Election:  कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवारांना अटक करा, सुरेश चव्हाणांची मागणी

Baramati Lok Sabha Election:   रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात रडीचा डाव सुरु केला. नेहमी कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवार यांना  तात्काळ अटक करून अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत याची चौकशी निवडणूक आयोग व ग्रह खात्याने करावी.





शरद पवार मतदानासाठी घरातून निघाले

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे गोविंदबागेतून मतदान करण्यासाठी निघाले. थोड्याचवेळात बारामतीत मतदान करणार

लातूरमध्ये अभिनेता रितेश देशमुखने बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांनी लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. नव्या पिढीला मतदान करण्याच आव्हान. 

Satara Loksabha Election Votting 2024 : साताऱ्यात बांबूपासून आकर्षक मतदान केंद्र; प्रत्येक मतदाराला झाड भेट

Satara Loksabha Election Votting 2024 : सातारा शहरातील राजमाता जिजाऊ शाळेमध्ये बांबूपासून आकर्षक मतदान केंद्र तयार करण्यात आला आहे. या मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि त्यांची पत्नी ॲडिशनल एस पी आंचल दलाल या दोघांनीही याच मतदान केंद्रावर मतदान केलं आहे. प्रशासनाच्यावतीने बांबूचे महत्त्व समजून सांगण्यासाठी बांबूपासून बनवण्यात आलेल्या छोट्या छोट्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आकर्षक आकाश कंदील, टोपली अशा पद्धतीच्या वस्तू ठेवण्यात आलेले आहेत यासोबतच या ठिकाणी मतदान करायला येणाऱ्या प्रत्येक मतदाराला प्रशासनाच्यावतीने बांबूच एक झाड भेट देण्यात येत आहे. 

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : ओमराजे निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी आपल्या मूळ गावी गोवर्धनवाडी  आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सर्व लोकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
बारामतीत मतदानाच्या दिवशी अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, आईला सोबत आणलं अन्...
Sangli Lok Sabha Election Voting 2024: संजयकाका पाटील यांनी देखील मतदानाचा बजावला हक्क

Sangli Lok Sabha Election Voting 2024: महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासोबत त्यांची लढत होत आहे. याठिकाणी विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार आहे.

Sangli Lok Sabha Election Voting 2024: चंद्रहार पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Sangli Lok Sabha Election Voting 2024: महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Omprakash Rajenimbalkar vs Archana Ranajagjitsinha Patil : तुमच्यासाठी 5 वर्ष दिलीत, माझ्यासाठी एक दिवस द्या; ओमराजे निंबाळकरांचं आवाहन

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : "आज देशातील सर्वोच्च सभागृहाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडतेय. मागच्या अडीच वर्षात लोकशाही पायदळी तुडवली गेली आहे. ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे. तुमच्यासाठी 5 वर्ष दिलीत, माझ्यासाठी एक दिवस द्या.", असं आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. 

Archana Ranajagjitsinha Patil vs Omprakash Rajenimbalkar : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. धाराशिव तालुक्यातील सारोळा या गावात कैलास पाटील यांनी मतदान केलं. मतदान करण्यापूर्वी कैलास पाटील यांचं औक्षण करण्यात आलं. 

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अर्चना पाटील थोड्याच वेळात मतदान करणार

Dharashiv Lok Sabha Voting 2024 : धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अर्चना पाटील थोड्याच वेळात मतदानासाठी निघणार आहेत. मतदानाला निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या धाराशीव शहरातल्या शिंगोली भागातील घरी पुजा केली. यावेळी त्यांचं घरातील सदस्यांनी औक्षण करत विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. सासरे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, पती राणा जगजीतसिंह पाटील यांचे आशीर्वाद घेतलेत.

Hatkanangle Lok Sabha Voting : माझ्या विरोधात दिग्गजांच्या सभा झाल्यात, माझे स्टार कॅम्पेनर माझे मतदार आणि सामान्य शेतकरी : राजू शेट्टी

Hatkanangle Lok Sabha Election Voting 2024 : Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी शेतकरी वर्गाला मतदान करण्याचं आवाहन केलं. 


मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राजू शेट्टी म्हणाले की, "माझ्या विरोधात देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, योगी आदित्यनाथ अशा सर्व दिग्गजांच्या सभा झाल्या. मात्र माझ्यासाठी फक्त एक बच्चू कडू यांची सभा झाली. तरी मी घाबरत नाही. माझे स्टार कॅम्पेनर माझे मतदार आणि सामान्य शेतकरी आहेत मला स्टार कॅम्पेनरची गरज नाही."


"मी निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेत खर्च करून निवडणूक लढवली आहे. तो खर्चही मी लोकवर्गणीतून उभा केला. आज माझ्यावर कुठलाही दडपण नाही मी समाधानाने निवडणुकीला सामोरे गेलो.", असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. 

Hatkanangle Lok Sabha : हातकणंगलेत राजू शेट्टींचं सहकुटुंब मतदान, शेतकरी वर्गाला मतदान करण्याचं आवाहन

Hatkanangle Lok Sabha Election Voting 2024 : Raju Shetti : शिरोळमधील प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर राजू शेट्टी यांनी येऊन सहकुटुंब मतदान केलेलं आहे. सर्व तरुण महिला आणि शेतकरी वर्गानं जोरात मतदान करावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं केलं आहे. 

Solapur Lok Sabha Election Voting: गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण, मतदान थांबले

Praniti Shinde vs Ram Satpute: लुक्यातीदक्षिण सोलापूर ताल गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर आली आहे. व्हीव्हीपॅट बंद असल्याने मागील 15 ते 20 मिनिटांपासून मतदान थांबले आहे. दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतर देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत आहे. मशीन दुरुस्तीसाठी इंजिनीअर्स  बुथकडे रवाना, गरज वाटल्यास मशीन बदलण्यात येण्यात आहे.

Solapur Lok Sabha Election Voting: प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Praniti Shinde: सोलापूरमधील प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रणिती शिंदे यांच्यासोबत माजी खासदार सुशीलकुमार शिंदे आणि आई यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरेंचे मतदान

रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे सकाळी सव्वासातच्या सुमारास सहकुटुंब मतदानासाठी दाखल झाले. आज मतदान होत असलेल्या 11 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. 

Archana Ranajagjitsinha Patil vs Omprakash Rajenimbalkar : धाराशिव जिल्ह्यात मतदान करण्याची प्रक्रिया सुरू, ओमराजेंच्या गावात EVM ची पूजा

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : धाराशिव जिल्ह्यात मतदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महविकासआघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या गावात ईव्हीएमची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनावडी या गावात मतदानाला सुरुवात झाली आहे.  थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर बजावणार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

Sangli Lok Sabha Election Voting 2024: मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल- विशाल पाटील

Sangli Lok Sabha Election Voting 2024: मी सहकुटुंब मतदानाला आलो आहे. मला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळेल, असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला. 

Hatkanangle Lok Sabha Election Voting 2024 : 2019 मध्ये कटकारस्थानं करुन माझा पराभव घडवून आणला, मात्र यंदा मी सावध, विजय माझाच : राजू शेट्टी

Hatkanangle Lok Sabha Election Voting 2024 : Raju Shetti : हातकणंगलेत आज लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राजू शेट्टी मतदानासाठी त्यांच्या घरातून रवाना झाले असून मतदानाला घरातून निघण्यापूर्वी कुटुंबियांनी राजू शेट्टी यांचं औक्षण केलं. 



राजू शेट्टी यांनी मतदानाला जाण्यापूर्वी माध्यमांशी बातचित केली. राजू शेट्टी म्हणाले की, "2019 मध्ये कटकारस्थान करून सर्वांनी मिळून माझा पराभव घडवून आणला, मात्र यावेळी आम्ही सावध आहोत, माझा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री हातकणंगलेमध्ये ठाण मांडून बसले होते, तरी काहीही होणार नाही, माझा विजय निश्चित आहे."


"शेतकरी वर्गानं सरकारच्या धोरणानुसार मत द्यायला शिकायला हवं. आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं अशी अपेक्षा आहे. माझ्या 99 वर्षाच्या आईचे आशीर्वाद माझे पाठीशी आहेत. काही दिवसांपूर्वी तिने ज्येष्ठ मतदारांसाठीच्या घरातून मतदानाच्या सोयीचा लाभ घेत मतदान केला आहे. तिचा मत मला मिळाला आहे म्हणून माझा विजय निश्चित आहे.", असं राजू शेट्टी म्हणाले. 

Dharashiv Lok Sabha Election Voting 2024 : धाराशिव लोकसभेसाठी आज मतदान, अर्चना राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात थेट लढत

Archana Ranajagjitsinha Patil vs Omprakash Rajenimbalkar : धाराशिव लोकसभेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील आणि महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ लढत होत आहे. 


धाराशिव लोकसभा निवडणूकीसाठी 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 19 लाख 92 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  धाराशिवमधील मतदान केंद्रावर सुबक रांगोळी रेखाटण्यात आली असून मतदाराच्या स्वागता  मतदान केंद्रे सजली आहेत. 2 हजार 139 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार आहे.

Baramati Lok Sabha Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्नी आणि कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला

Baramati Lok Sabha Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार,पत्नी सुनेत्रा पवार,मुलगा पार्थ पवार काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी  देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.  

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क

उदयनराजे भोसले यांनी सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर जनतेला मतदान करण्याचे आवाहन. योग्य उमेदवाराला मतदान न केल्यास पश्चातापाची वेळ येईल, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले.

लातूरमध्ये अमित देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. 

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते...

Solapur Lok Sabha Election Voting 2024: सोलापूरात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे आणि महायुतीकडून राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. 

Sangli Lok Sabha Election Voting 2024: सांगलीत तिंरगी लढत

सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील, महायुतीकडून संजयकाका पाटील यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनीही शड्डू ठोकल्याने ही लढत तिरंगी होईल.

Kolhapur Lok Sabha Election Voting 2024 : कोल्हापुरात आज लोकसभेसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur Lok Sabha Election Voting 2024 : आज कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचं भवितव्य आज मतदारराजा ठरवणार आहे. अशातच कोल्हापुरातील काही हायव्होल्टेज लढतींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच, काही दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 


शिवसेनेकडून संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर - खिद्रापूर अर्धवट पूल आणि मतदान बद्दल प्रशासनाचा खुलासा

Kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर - खिद्रापूर अर्धवट पूल आणि मतदान बद्दल प्रशासनाचा खुलासा.


आज खिद्रापूर मध्ये मतदान होईल, गावकरी बहिष्कार घालणार नाही असा प्रशासनाचा दावा.


खिद्रापूर मधील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अर्धवट पुलाच्या कारणामुळे खिद्रापूर मधील मतदारांनी पूल नाही तर मतदान नाही अशी भूमिका व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासनाने हालचाली करत उपजिल्हा िवडणूक अधिकार्‍यांना अहवाल सादर केला आहे.


खिद्रापूर मध्ये उद्या मतदान होईल आणि ग्रामीण मतदार बहिष्कार करणार नाही असा दावा या अहवालातून करण्यात आला आहे.


शिरोड चे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना हा अहवाल पाठवला आहे.

Lok Sabha Election 2024 : राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान, दिग्गजांचं भवितव्य मतदारांच्या हातात

Maharashtra Lok Sabha Election 2024 : राज्यातल्या 11 लढतींपैकी बारामती, माढा, सांगली, कोल्हापूर या मतदारसंघांची सर्वाधिक उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने भाजप विरूद्ध काँग्रेस असं लढतींचं स्वरूप होतं. मात्र आता नव्याने निर्माण झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गट यांचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या सर्व पक्षांचा कस आज लागणार आहे. 11 लढतींपैकी 7 मतदारसंघांमधली लढत चुरशीची होत असून साऱ्या राज्याचं त्याकडं लक्ष लागलेलं आहे. 

धाराशिव मतदारसंघात लक्षवेधी लढत

धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यात सामना होत आहे.  

कोकणात मतदानासाठी एक लाख मतदार एसटीने रवाना

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या आगारांतून कोकणात जाण्यासाठी विशेष बस सोडण्यात आल्या आहेत. मुंबईतील चाकरमनी मतदानासाठी आपापल्या गावी गेल्याने रायगड आणि रत्नागिरीला जाणाऱ्या बसेसला गर्दी दिसून आली. जवळपास लाखभर मतदार मतदानासाठी कोकणात दाखल झाले आहेत.

Baramati Lok Sabha Election: बारामतीत विरोधी पक्षाकडून पैसे वाटल्याचा आरोप, रोहित पवारांचे ट्वीट

Baramati Lok Sabha Election:  बारामतीत विरोधी पक्षाकडून पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे शहराध्यक्ष यांनी केला आहे. बारामती शहरातील आमराई, मुजावर वाडा परिसरात पैसे वाटून मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहेत तसेच दमदाटी करून दादागिरी केली जात असल्याचा आरोप देखील शहराध्यक्षांनी केला आहे. 
यासंदर्भात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे. 


 





रायगडमध्ये सात वाजता मतदानाला सुरुवात होणार

रायगड लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात लढत आहे. सकाळी सात वाजल्यापासून याठिकाणी मतदानाला सुरुवात होईल.

रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज नारायण राणे आणि विनायक राऊतांची प्रतिष्ठा पणाला

रत्नागिरी-सिंधुदुर्गात आज नारायण राणे आणि विनायक राऊत  यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. 

Maharashtra Lok Sabha Voting Update : राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान

राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात धाराशिव, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election : देशातील 11 राज्यांतील 93 ठिकाणी आज मतदान

देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होणार आहे. गुजरातमधील सर्व 25 जागांवर मतदान होईल. सूरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. 


महाराष्ट्रात 11 जागांवर, उत्तर प्रदेशात 10 जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित 14 जागा, छत्तीसगडमधील 7, मध्य प्रदेशातल्या 8, बिहारमधील 5, आसाममधील 4 तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही उद्या मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात ढकलण्यात आलंय. 

पार्श्वभूमी

Maharashtra Lok Sabha Election Live Update : देशातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.7 मे  2024 रोजी सकाळी 7.00 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात राज्यात एकूण 62.27 टक्के मतदान पार झाले. कोणत्या राज्यात किती मतदान झाले? जाणून घेऊयात...


आसाम- 76.13
बिहार- 57.27
छत्तीसगड- 68.15
दादरा नगर हवेली- 65.23
गोवा- 74.50
गुजरात- 57.00
कर्नाटक- 69.14 
मध्यप्रदेश- 64.82
महाराष्ट्र- 56.37 
उत्तरप्रदेश- 57.34
पश्चिम बंगाल- 73.93


राज्यातील खालील मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया 


बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हातकणंगले, रायगड, सोलापूर, लातूर या मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील या 11 मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत नव्या पक्षांची अग्निपरीक्षा या टप्प्यात होत आहे.


देशात लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा, मतदारराजा दिग्गजांचं भवितव्य ठरवणार 


देशात लोकसभा निवडणुकांसाठी तिसरा टप्प्याचं मतदान आज होतंय. आज राज्यात 11 तर देशात 93 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आज मतदान होणार आहे. गुजरातमधील सर्व 25 जागांवर आज मतदान होईल. सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकलीय. महाराष्ट्रात 11 जागांवर, उत्तर प्रदेशात 10 जागांवर, कर्नाटकातल्या उर्वरित 14 जागा, छत्तीसगडमधील 7, मध्य प्रदेशातल्या 8, बिहारमधील 5, आसाममधील 4 तर पश्चिम बंगाल आणि गोव्यातल्या प्रत्येकी दोन जागांवर आज मतदान होईल. याशिवाय दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातही आज मतदान होत आहे. तर अनंतनाग राजौरीमधील मतदान सहाव्या टप्प्यात ढकलण्यात आलंय. राज्यात आज कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रात बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, तर मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.