Maharashtra Corona Update : शुक्रवारी राज्यात 2371 नव्या रुग्णांची नोंद, 10 जणांचा मृत्यू
Maharashtra Coronavirus Update : शुक्रवारी राज्यात दोन हजार 914 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभारत राज्यात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.
Maharashtra Coronavirus Update : शुक्रवारी राज्यात दोन हजार तीनशे 71 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात दोन हजार 914 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभारत राज्यात 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. मागील काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृताची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात फक्त चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज यामध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात शुक्रवारी 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात 2914 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,50,808 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.95% एवढे झाले आहे. आज राज्यात 2371 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 10 करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.84% एवढा आहे.
राज्यातील कोविड ॲक्टिव्ह रुग्ण -
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारीपर्यंत 16 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांचं प्रमाण मुंबई, ठाणे आणि पुण्यात आहे. मुंबईमध्ये दोन हजार 640, ठाण्यात एक हजार 445 आणि पुणे जिल्ह्यात 5 हजार 876 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव, नंदूरबर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 100 पेक्षा कमी आहे.
कोरोनाबाधित रुग्ण -
Maharashtra Corona Update : आज राज्यात दोन हजार 371 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 80,14,823 झाली आहे. राज्यात आज आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्या मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधक आहे. मुंभईमध्ये 365 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पुणे मनपामध्ये 473 नवे रुग्ण आढळले आहेत.