एक्स्प्लोर

Maharashtra Lockdown : महाराष्ट्र आजपासून दुपारी चारनंतर बंद! लेव्हल तीनचे निर्बंध लागू

Maharashtra Lockdown : कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या सर्व जिल्ह्यांचा लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद असेल. त्यामुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ झाली आहे. या काळात कुठे काय सुरु, काय बंद जाणून घेऊया...

Maharashtra pune lockdown :  राज्यातील दुकानं आजपासून दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर राज्यात संचारबंदी असेल. कोरोनाव्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यातील शहरं आणि जिल्ह्यांमधील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच लेव्हलमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय जारी केला आहे.

पुण्यात काय सुरु काय बंद?
पुण्यात आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. आजपासून (28 जून) पुणेकरांना नवीन नियमांचं पालन करावं लागणार आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार-रविवार पूर्णपणे बंद राहतील. पुण्यात सध्या दुकाने सात वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी होती.

- आजपासून पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. 
- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील. 
- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद. 
- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
- उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत. 
- खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत. 
- अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
- लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक 
- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी 
- पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
- कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी  4 वाजेपर्यंत सुरु राहतील

Maharashtra Lockdown : राज्यात पुन्हा निर्बंध, गोंधळून जाऊ नका! काय सुरु-काय बंद- वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवलीतही नव्या निर्बंधांची अंमलबजावणी
कोविडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने आजपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नवीन आदेश नुकतेच जारी केले आहेत. सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. 

- या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. 
- हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरु ठेवता येतील. 
- मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाही. 
- कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरु राहतील तर दुकाने संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. 
- सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 
- खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. 
- लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. 

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून नवे निर्बंध
- शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी
- बिगर अत्यावश्यक सेवा शनिवार रविवार संपूर्ण बंद
- मॉल्स, थिएटर संपूर्ण पणे बंद
- सोमवार ते शुक्रवार पर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंट संध्याकाळी 4 पर्यंत त्यानंतर रात्री 11 पर्यंत केवळ पार्सलची सुविधा
- सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी
- आज सकाळी 7 वाजल्यापासून आदेश लागू

यवतमाळ  : ब्रेक द चेनअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी 28 जूनपासून नवीन आदेश काढण्यात आले आहेत.  जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ असणार आहे. तर शनिवार रविवार पूर्णतः बंद असणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट 4 वाजेपर्यंत, बँक 4 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तर शाळा कॉलेज, शिकवणी, मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश जारी केले आहेत. 

जालना :  जालना जिल्ह्यात आजपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 चे पहाटे 5 पर्यंत संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व  दुकाने आणि आस्थापना पूर्णपणे बंद असतील. हॉटेल 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत. दरम्यान या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित जमण्यास देखील मनाई असणार आहे. 

चंद्रपूर :  आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

बुलढाणा:  आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अकोला : आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अमरावती : आजपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget