Maharashtra Live Updates: नगरमध्ये प्रवरा नदीत बोट उलटली, SDRFच्या तीन जवानांचा मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.

रोहित धामणस्कर Last Updated: 23 May 2024 03:49 PM
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरुमला सुरक्षा असूनही तिकडे एखादी व्यक्ती जातेच कशी? रोहित पवारांचा सवाल

स्ट्राँगरुमला एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना तिथे एखादी व्यक्ती जातेच कशी? सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवलेत ते देखील सीसीटीव्ही बंद झाले होते , शिरूर मध्ये देखील तसाच प्रकार झाला... जर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका आपण घेऊ शकतो असं रोहित पवार म्हणाले. सोबतच अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जिल्हाधिकारी यांना इशारा दिला. हा जर तुम्ही सत्ताधाऱ्यांचा ऐकत असाल तर उद्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अशा लोकांचं काय करायचं हे आम्ही पाहू, असा सज्जड दमच रोहित पवार यांनी दिला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आज मराठवाड्यात बैठक होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आलेली आहे. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप पर्यंत आचारसंहितेमधून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाय योजना करण्याच्या संदर्भात  सूट दिलेली नाही. त्यामुळे आज मुख्यमंत्री फार काही मोठी घोषणा करू शकणार नसल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या एक वाजेपर्यंत या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. आचारसंहितेमधून सूट मिळावा अशी राज्याचे मुख्य सचिवांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे  पाठवलेला आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, इमारतींच्या काचा फुटल्या

डोंबिवलीत असणाऱ्या एमआयडीसी परिसरात गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. सविस्तर वाचा

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट

डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, धुराचे प्रचंड लोट, स्फोटाचे कारण अस्पष्ट

Nashik News: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची भेट

शिवसेना ठाकरे गटाचे नेते निवडणूक  अधिकाऱ्यांनी घेतली जलज शर्मा यांची भेट. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या परिसरात सुरक्षा वाढवावी. टेक्निशियन सोबत उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील जाण्याची परवानगी द्यावी. परिसरात संशयितरित्या लोक फिरत असल्याचा संशय आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले निवेदन

Mumbai MSRTC Bus Booking: एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई: १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत  करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ पर्यंत १२ लाख ९२ हजार इतक्या तिकीटाची विक्री या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीच्या माध्यमातून झाली आहे. याच काळात मागील वर्षी ९ लाख ७५ हजार तिकीटांची विक्री झाली होती म्हणजेच  मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे  ३ लाखाने जास्त आहे. सध्या या ऑनलाईन आरक्षण प्रणालीव्दारे दररोज १० हजार तिकीटे काढली जात आहेत.

पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यावर एसीबीची कारवाई

बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी एसीबी कडून कारवाई सुरू आहे. अशातच त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आलेत. तर 30 ग्रॅम सोने, 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 28 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने सलगर यांना रंगेहात पकडले होते. याच अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

AhmadNagar News: नगर शहरात ८३ अनधिकृत होर्डिंग्ज तर ४४ होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे... तर शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून शहर आणि उपनगर परिसरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३८४ परवानाधारक होर्डिंग आहे...तर  तब्बल ८३ अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले आहेत... तसेच ४४ होर्डिंग्जचा परवाना संपुष्टात आलेला आहे... या सर्व होर्डिंग्ज मालकांना तात्काळ नोटिस बजावण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत...तर सोमवारपासून अनधिकृत होर्डिंग्ज उतरवण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

सिंधुदुर्गात जोरदार पाऊस

सिंधुदुर्गात अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळाचा एक व्हिडिओ समोर आला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे. या वादळात एक पान टपरी पाला पाचोळयाप्रमाणे उडून गेली. तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती.

Malkapur News: पुणे-बंगळुरु मार्गावर गॅस टँकरमधून गळती

मलकापूर येथे पुणे-बंगळुरु महामार्गावर एका गॅस टँकरमधून वायूची गळती सुरु झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 

चारा टंचाईचा दुग्धव्यवसायावर परिमाण

दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे...निसर्गाच्या लहरीपणामुळे इथला शेतकरी संकटात सापडला आहे...त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्धव्यवसाय करतो तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाल्याने दूध उत्पादनात घट झाल्याने दुग्धव्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे.

Jalgaon News: जळगावात जुन्या वादातून तरुणाचा हॉटेलमध्ये जेवत असताना खून

जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना जळगाव शहरात घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेतील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या हॉटेल भानू येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनावणे हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत होता.  यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले आणि काही एक विचार न करता त्यांनी किशोर सोनंवने वर जोरदार हल्ला चढविला,किशोर सोनवणे जागेवर मरण पावत नाही तो पर्यंत आरोपींनी त्याला मारहाण सुरूच ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनी पेठ पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील चार जणांना अटक करण्यात यश मिळाले आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटल आहे

महाराष्ट्रातून आणखी एक उद्योग बाहेर, अंबादास दानवेंचा सरकारवर हल्ला

महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे  गेल इंडिया कंपनी ५० हजार कोटींची गुंतवणूक करून इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्यप्रदेशच्या सिहोर येथे उभारला जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा विचार करत असताना मध्य प्रदेशात कसा गेला? महाराष्ट्राचा वाट्याला येणारा रोजगार असा सहज बाहेर कसा गेला?याचे उत्तर द्या उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी द्यावे.

Wardha News: वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील मुरदगावाला वादळी वाऱ्याचा तडाखा

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील मुरदगाव या गावात रात्री झालेल्या वादळाने घराची छपरे उडाली आहे. सुमारे 25 घरांची छपरे उडाल्याने गावातील नागरिकांना रात्र उघडयावर काढावी लागलीय. विद्युत तारे तुटली,अनेक झाडांची झाली पडझड देखील झालीय. रात्रीच्या 30 मिनिटांच्या वादळ वाऱ्याने गावकऱ्यांचे केले नुकसान केले. 12 तास उलटून गेल्यावरही प्रशासनाचे अधिकारी पोहचलेच नाहीए,  गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावकरी रात्रभर प्रतीक्षेत राहिले  अनेक जणांच्या घरचे अन्नधान्य भिजले.

उजनी दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला, शोधकार्य संपलं

उजनी बोट दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत. चाळीस तासाच्या शोध मोहीमेनंतर उजनीत धरणात सुरु असणारं शोधकार्य संपलं आहे. 

उजनी धरण दुर्घटनेतील सहावा मृतदेह मिळाला

उजनीतील सहावा मृतदेह १० वाजून २५ मिनिटांनी सापडला. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले. 40 तासांची शोध मोहीम. उजनीत चालणारं शोधकार्य संपलं

Beed News: पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणेंना निवडणूक अधिकाऱ्याची नोटीस

लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या खर्चात तफावत आढळल्याने बजरंग सोनवणे यांना नोटीस. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख तपासणीची सूचना. बीड लोकसभा निवडणूक काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी नोटीस बजावली आहे. तसेच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अभिलेख सादर करून तपासणी करून घ्यावीत आणि खर्चात तफावत राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

Ahmadnagar News: प्रवरा नदीत बोट बुडाली

प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटली. पथकातील चार जणांसंह १ स्थानिक बोटीत बुडाला. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळची घटना. SDRF पथकातील तिघांचा मृत्यू..

नाशिकमध्ये पालेभाज्या महागल्या

नाशिकमध्ये कोथिंबीरीसह पालेभाज्या महागल्या. कोथिंबीर 75 रुपये जुडी तर मेथी आणि कांद्याची पात 50 रुपये जुडी. शेतमालाची आवक घटल्याने बाजार भाव तेजीत. शेतमालाची आवक घटल्याने बाजार भाव तेजीत. नाशिक बाजार समिती 50% शेतमालाची आवक. शेतीतील उभ्या पिकांना पाणी कमी पडू लागल्याने शेतीमालावर परिणाम. कोथिंबीर जुडीला उच्चांक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

नाशिकमध्ये 22 दिवसात आढळले डेंग्यूचे 19 पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिकमध्ये 22 दिवसात आढळले डेंग्यूचे रुग्ण. मनपाच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी. पावसाळ्याअगोदरच कडक उन्हाळ्यात डेंग्यू रुग्णांची संख्या शहरात वाढत असल्याचे चित्र. मलेरिया विभागाकडून शहरातील विविध भागात धुरपवारणीवर भर . अचानक डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने मलेरिया विभाग ही बुचकाळ्यात

शरद पवारांना बारामतीमधील विजयाची खात्री?

शरद पवारांना मतदानानंतर 16 दिवसांनी बारामतीमधील विजयाची चाहुल लागली? सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. सविस्तर वाचा

Akkalkot News: अक्कलकोटमध्ये एसटीची रिक्षा आणि बाईकला धडक, एकाचा मृत्यू

अक्कलकोट येथे एसटीने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्यामुळे एक जण ठार झालाय. तर सहा जण जखमी झालेत. अक्कलकोट येथील ए वन चौक येथे काल संध्याकाळी हा अपघात झाला.ए वन चौकातून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटीने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे एसटी चालक  संतोष मित्रखेत्री याच्या विरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे येथील चौघे भाविक एसटीच्या धडकेमुळे जखमी झालेत. तर  लक्ष्मण रामचंद्र कोणदे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

आज मुख्यमंत्र्यांचा छत्रपती संभाजी नगर दौरा, मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर घेणार महत्त्वाची बैठक.  छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी तीन वाजता मराठवाड्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेणार. विभागीय आयुक्त कार्यालयात घेणार आढावा बैठक. सर्व जिल्हाधिकारी, सर्व पालकमंत्री कृषी अधिकारी महावितरण चे अधिकारी यासह अन्य अधिकाऱ्यांची घेणार बैठक

रायगडमधील 103 गावांना दरडीचा धोका

रायगड जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये एकूण 103 गावांना दरडी कोसळण्याचा  धोका असल्याचे निदर्शनास आले आहे, याच पार्शवभूमीवर रायगड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरडग्रस्त गावात प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या निर्देश देखील  जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिक यांनी  दिले आहेत.स्थलांतरित करण्यात येणाऱ्या कुटुंबाच्या याद्या देखील रायगड जिल्हा प्रशासनाकडून तयार असून त्या प्रमाणे त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे नियोजन आता केले जात आहे.


रायगड जिल्ह्यामधील तालुक्यातील दरडग्रस्त गावांची आकडेवारी खालीलप्रमाणे 


महाड - 49 गावे
पोलादपूर- 15 गावे
रोहा -13 गावे 
म्हसळा- 6 गावे
माणगाव- 5 गावे
पनवेल -3 गावे
खालापूर- 3 गावे
कर्जत -3 गावे 
सुधागड- 3 गावे
श्रीवर्धन- 2 गावे
तळा- 1 गाव

खामगाव शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला मध्यरात्री भीषण आग

खामगाव शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला मध्यरात्री भीषण आग. आगीत अनेक वर्ग खोल्या व कार्यालय जळून खाक. आग लागण्याच नेमकं कारण अस्पष्ट. आग इतकी भीषण होती की अद्याप अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे. घटनास्थळी पोलिस व अग्निशमन यंत्रणा कार्यरत.

आमदार पी एन पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

“कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे आमदार पी एन पाटील यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.   त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावले आहे. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी एन पाटील यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

मान्सूनपूर्व पावसामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत

तळकोकणात गेले दहा दिवस सतत मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. यामुळे जिल्यातील आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावर्षी जांभूळ पीक अत्यल्प प्रमाणात आलं होत. त्यात मान्सून पूर्व पावसाने जांभूळाचं पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कोकणातील सर्वात मोठ्या आकेरी जांभूळ बाजारपेठेत जांभूळ नावालाही दिसत नाही. त्यामुळे जांभूळ पीक मान्सूनपूर्व पावसामुळे अडचणीत आले आहे.

36 तास शोध घेऊन कोणीही दिसलं नाही, अखेर सकाळी चार कलेवरं पाण्यावर तरंगताना दिसली, उजनी दुर्घटनेतील 5 मृतदेह सापडले

गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान शोधकार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या (Ujani Dam) परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर एनडीआरएफचे (NDRF) जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. त्यानंतर काहीवेळातच एनडीआरएफच्या पथकाला आणखी दोन मृतदेह सापडला. पाच मृतदेहांमध्ये दोन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा समावेश आहे. 

रिझर्व्ह बँकेचं केंद्र सरकारला मोठं गिफ्ट

आरबीआय देणार केंद्र सरकारला 2 लाख कोटींचा लाभांश, गेल्या वर्षांच्या तुलनेत तब्बल 140 टक्क्यांची वाढ! सविस्तर वाचा

वाशिममध्ये जोरदार पावसाला सुरुवात

 हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्याला चार दिवस पावसाचा इशारा दिल्यानुसार  आज सकाळपासूनच वाशिम शहरांमध्ये जोरदार पाऊस बरसायला  सुरुवात झाली.  वाशिम जिल्ह्यात सर्व दूर विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

उजनी धरणात बोट उलटून बेपत्ता झालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले

उजनी धरणात बोट उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान शोधकार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. सविस्तर वाचा

गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी

अमोल कीर्तिकरांना निवडून आणण्यासाठी कट रचला, दरेकरांचा आरोप; गजाभाऊ चवताळून म्हणाले, 'भाजपचे नेतेच कटकारस्थानी'. सविस्तर वाचा.

हिंगाणा एमआयडीसीतील कंपनीला लागली आग

नागपूर हिंगणा एमआयडीसी मधील वर्षा प्रिंटिंग किंग या इंक निर्मिती कंपनीला आग लागली. पहाटे सहाच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

उजनी पात्रात बोट उलटून सहाजण बेपत्ता, 36 तासांनंतर शोधकार्य सुरुच

मंगळवारी  भीमा नदी पात्रात सोलापूरच्या कुगाव मधून इंदापूरच्या कळाशीकडे येणारी बोट बुडाली गेली. या बोटीतील सहा जण 36 तास ओलांडले तरीही बेपत्ताच आहेत. काल दिवसभर एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवली मात्र शोध कार्यात अडचणी येत असल्याने रात्री सहा वाजता ही मोहीम थांबवण्यात आली आता पुन्हा आज सकाळी सात वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन राबवले जाणार आहे. सध्या एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील (MLA P N Patil) यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सविस्तर वाचा

नाशिकमध्ये गंभीर पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मैलोनमैल वणवण

धरणाच्या जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या, घोटभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. दिवसभरात दोन-तीन हांडे पाणी भरेपर्यंत अंधार पडत पण पाणी मिळत नाही. पाण्यामुळे रोजंदारी बुडवत तासंतास हंडाभर पाण्यासाठी बसावे लागते ताटकळत. धरणातील पाणी दूषित असल्यामुळे ते पिण्यासाठी वापरता येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.