Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Goa Nightclub Fire: उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा भीषण आग (Goa Nightclub Fire) लागली. या घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य केले. धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला, परंतु डझनभर लोकांना वेळेत बाहेर काढण्यात आले. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
कुंभमेळा 2027 साठी 717 कोटींची मोठी मंजुरी
२०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाला ७१७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकार वित्त विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
नगरविकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला.
राज्य सरकारने २०२५-२६च्या अर्थसंकल्पात नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.
त्यानंतर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्राधिकरणाला अर्थसंकल्पीत तरतुदीपैकी २८३ कोटींचा निधी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वितरित केला होता.
उर्वरित ७१७ कोटी वितरित करण्यासाठी नगरविकास विभागाने आता शासन निर्णय काढला आहे
Pune News: अजित पवारांच्या पक्षाचे प्रदीप गारटकर यांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला
प्रदीप गारटकर यांनी घेतली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट
पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला
गारटकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गारटकर यांनी दिला होता राजीनामा
गारटकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
गारटकर करणार भाजप मध्ये प्रवेश?























