Maharashtra Live Updates: महाराष्ट्रासह देशातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हातमिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकारघंटा असल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली. तर पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस डॉ. सुश्रुत घैसास यांची चौकशी करणार आहेत. निष्काळजीपणाचा ठपका ठेवत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आज शिक्षेची सुनावणी आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह, महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
गेवराई तालुक्यातील वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला
बीड ब्रेक: गेवराई तालुक्यातील वाहेगावात आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Anc: बीडमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. माजलगाव शहरात खुणाचे दोन प्रकरण ताजे असताना आता गेवराई तालुक्यातील वाहेगाव येथे आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला झाला आहे. याप्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
घटना 16 एप्रिल रोजी घडली असून या जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घराच्या गेटला वारंवार टँकर का धडकवतो? अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून गेवराई तालुक्यातील वाहेगावात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत. यातील एका व्यक्तीच्या डोक्यात 48 टाके पडले असून डोकं पूर्णपणे रक्तानं माखल आहे. तर इतर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद
गोंदियात वाढत्या तापमानामुळे ट्रॅफिक सिग्नल दुपारी राहणार बंद.... उष्णतेचा त्रास होत असल्याने नागरिकांनी केली होती ट्रॅफिक सिंगल बंद करण्याची मागणी....
Anchor : दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्याचा पारा हा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... 12 वाजेनंतर ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहेत व 4 वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्रॅफिक वाढल्यामुळे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात येतात. यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो....






















