(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Live Updates: पुणे अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
LIVE
Background
Pune Accident : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईची...पोलिसांच्या या कारवाईनंतर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे समोर आलंय...अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय...त्यात ससून रुग्णालयातले डॉ. अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा समावेश आहे...याप्रकरणात ससून रुग्णालयाचा शिपाई अमित घटकांबळे यालाही अटक करण्यात आलीय.. घटकांबळे याच्याच माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे..या तिन्ही आरोपींनी ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय..दरम्यान अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५० हजार रुपये जप्त केलेत. तर डॉ श्रीहरी हळनोर यांच्याकडून २.५ लाख रुपये जप्त करण्यात आलेत. आता ही रक्कम कोणी घटकांबळे याला दिली याचा शोध सुरू आहे.
Pune Accident News: पुणे अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर
Pune Accident News: कल्याणीनगर अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर राहिला. पोलिसांनी या तरुणाला चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी एक नोटीस पाठवली होती. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो चौकशीसाठी गैरहजर राहिला. रॅप साँग बनवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४१ A नोटीस अंतर्गत त्याला पुण्यातील शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या अशी मागणी आर्यनने केली होती.
Bhandara Temp: भंडाऱ्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद
Bhandara Temp: विदर्भातील तापमानात मागील काही दिवसात उच्चांकी नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे. यामुळं नागरिक अक्षरश: हैराण झालेले आहेत. आज भंडारा जिल्ह्यात 45 अंश डिग्री सेल्सिअस अशा सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे. यावर्षीचा सर्वाधिक हॉट दिवस म्हणून भंडाऱ्याची आज नोंद करण्यात आली. महत्त्वाचे काम असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. त्यामुळं मुख्य वर्दळीच्या मार्गावर आणि चौकातही तुरळक गर्दी भंडाऱ्यात बघायला मिळत आहे....
Pune Accident News : ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी Not Reachable, रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्याचा शोध सुरू
Pune Accident News : ससून हॉस्पिटल मधील एक कर्मचारी not reachable असल्याची चर्चा आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहे. मात्र कोणीही बेपत्ता नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. Cctv फुटेज मध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना चौकशी साठी बोलावणार आहे. जे येणार नाहीत त्यांना घेऊन येणार , अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी केलीय. मात्र तातडीची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. ही सुनावणी सरन्यायाधीशांसमोरच घेण्याची सूचना सुट्टीकालीन कोर्टाने केलीय.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत परदेशात, इंडिया आघाडीची 1 जूनच्या बैठकीला राहणार गैरहजर
Uddhav Thackeray : इंडिया आघाडीची 1 जूनला बैठक होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. परदेशात असल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. तर शरद पवार मात्र या बैठकीला जाणार आहेत. पवार सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. तिथून पवार दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत.