Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live blog Updates: आम्ही आरक्षण दिलं होतं, ज्यांनी टिकवलं नाही त्यांना प्रश्न विचारा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाते प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर पालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, असं म्हणत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मराठा आरक्षणाचा जीआर सरसकट नसून पुराव्याचा जीआर आहे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचीही हमी देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली. तर राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम, उद्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकींवर पावसाचे विरजण?
नाशिक : कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्याला दोन दिवसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील पावसाचे विरजण पहायला मिळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील मंदिरांना पुन्हा पाण्याने वेढा दिल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे नदी- नाले , ओढे दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सायकलस्वार मुलीला ट्रॅव्हल्सने उडवले; मुलीचा जागीच मृत्यू
वाशिम : शहराजवळ असलेल्या काकडदाती गावावरून वाशिम शहराकडे येताना रस्ता ओलांडताना महाराजा ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला सायकलसह उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. संध्या सारसकर असं अपघातात ठार झालेल्या मुलीचं नाव आहे. संध्या ही आपल्या सायकलने रस्ता पार करत असताना पुसदकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून आडव्या आलेल्या संध्याला सायकलसह उडवले यात ती जागीच ठार झाली.
























