Maharashtra Live Updates: शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी; पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर.

Background
Maharashtra Live blog updates Breaking news in Marathi: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील 'एक पेड माँ के नाम २.०' मोहिमेला सुरूवात. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राष्ट्रव्यापी चळवळ म्हणून राज्यात राबवली जाणार
महेंद्र थोरवे काठावर निवडून आलेले आमदार..महेश कोलटकर माजी उपनगराध्यक्ष यांचा थोरवेना इशारा
रायगड flash निवडून आल्याचा धाक आम्हाला दाखवू नका अन्यथा राष्ट्रवादी तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.... कोलटकर यांचा आमदार थोरवे यांना इशारा
Anchor - राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची माफी मागून त्यांचे पाय धरा अन्यथा कर्जत खोपोली मधील पुढचा आमदार सुधाकर घारे असतील असा इशारा राष्ट्रवादीचे रोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी आमदार थोरवे यांना दिला आहे. आमदार थोरवे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात खासदार सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली होती यानंतर रायगड जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरवे यांच्याविरोधात राग व्यक्त केला.आता रोहा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष कोलटकर यांनी सुद्धा थोरवे यांना इशारा दिला आहे. आमदार थोरवे यांनी पुन्हा आमच्यासमोर उभे राहून दाखवा तेव्हा आमची राष्ट्रवादीची सुधा ताकद दाखवून देऊ सुनिल तटकरे हे तुमच्या जिवावर खासदार झालेले नसून त्यांनी केलेल्या विकासकामांवर ते खासदार झाले आहेत अस वक्तव्य कोलटकर यांनी करत थोरवे विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
आष्टी तालुक्यात पेरणी योग्य पाऊस शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीसाठी लगबग
- बीड: आष्टी तालुक्यात पेरणी योग्य पाऊस शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीसाठी लगबग; सोयाबीन आणि उडीद बियाण्यांची जास्त मागणी
Anc:बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व झालेला पाऊस आष्टी तालुक्यात सर्वाधिक बरसला.. यंदा वेळेवर पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची बी बियाणं खते खरेदीसाठी लगबग दिसून येतेय..
सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात मान्सूनपूर्व 35 टक्के इतका पाऊस झाला.. ज्यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे.. वेळेवर आणि पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची ही लगबग दिसून येतेय.. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आष्टी तालुक्यात सोयाबीन आणि उडदाची जास्त लागवडीची शक्यता आहे. कारण या बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांमधून जास्त होऊ लागलीय..























