Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या राजकीय युतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे पडलंय. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेला सत्तरच्या आसपास जागा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी असल्याचं समजतंय. सध्या जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीय. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकांच्या फेऱ्यांमध्ये ती चर्चा पुढे जाऊ शकते. मनसेनं याआधीच ज्या प्रभागामध्ये ताकद आहे अशा 125 जागांची यादी तयार केलीय. त्यामुळे युतीमध्ये छोट्या भावाची भूमिका स्वीकारायला राज ठाकरे तयार होणार का, हा प्रश्न आहे.
वाघाच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला ठार
वाघाच्या हल्ल्यात दोन वृद्ध महिला ठार
गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या दिवशी वाघाने ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे आणि अनुसया जिंदर वाघ अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुक्ताबाई नेवारे या बुधवारी सकाळी सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता वाघाने त्यांना ठार केले. तर अनुसया जिंदर वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, तर परिसरातच मुक्ताबाई नेवारे या सुद्धा मृतावस्थेत आढळल्या. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला.
जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध..
जळगावच्या जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्षपदी बिनविरोध..
जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत साधना महाजन या नगराध्यक्ष मधून बिनविरोध विजय झाल्या आहेत..
नगराध्यक्ष पदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी आज माघार घेतल्याने साधना महाजन बिनविरोध झाल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या साधना महाजन बिनविरोध विजयी झाल्या आहेत..
नगराध्यक्ष बिनविरोध होणारी जामनेर नगरपालिका जळगाव जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे























