Maharashtra Live Updates: हेरगिरी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, रवी वर्माला अडकवण्यासाठी सिमकार्डचा वापर
Maharashtra Live Blog: राज्यातील आणि देशातील ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील हवामान आणि पावसाची स्थिती काय, जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra Live blog Updates in Marathi: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय अंतर्गत काम करणाऱ्या पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह (PIO) च्या महिला एजंट्सनी आरोपी रवी वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिमकार्डचा वापर केला होता. तपासात असे दिसून आले आहे की, पीआयओच्या महिला एजंट्सनी जाणूनबुजून भारतीय सिमकार्डचा वापर केला जेणेकरून रवी वर्मा आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांना हे संभाषण पाकिस्तानमधून होत आहे हे कळू नये, अशी माहिती समोर आली आहे. ही त्यांची नवीन कार्यपद्धती आहे, जी पहलगाम हल्ल्यानंतर उघडकीस आली आहे.
वाशिममध्ये कृषी सेवा केंद्रावर बीज वाटप प्रक्रीयेत सरळसरळ लूटालूट, शेतकऱ्यांचा आरोप
वाशिम
वाशिम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे मोफत देण्याची योजना राबवत आहे. मात्र वाशिम तालुक्यातील इन्नानी कृषी सेवा केंद्रावर यायोजनेतील बीज वाटप प्रक्रियेमध्ये अनियमितता आणि सरळसरळ आर्थिक लुट होत असल्याचे शेतकऱ्यांनी आरोप केलाय
४० किलो बियाणे मोफत असतांना ४४ किलोच्या पिशव्या देण्यात आल्या. या अतिरिक्त ४ किलो बियाण्यासाठी दर किलोमागे ९० रुपयांप्रमाणे पैसे वसूल करण्यात येतंय. शासनाने बियाण्याचा अधिकतम दर ७० रुपये किलो
केला असताना, या सेवा केंद्रावर ९० रुपयांना विक्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील ऊसउत्पादक संघर्ष समिती आक्रमक, आंदोलनाचा इशारा
जालना जिल्ह्यातील ऊसउत्पादक संघर्ष समिती आक्रमक, आंदोलनाचा इशारा.
जालन्यातील समर्थ आणि सागर आणि समृद्धी साखर कारखान्याकडून सभासद आणि शेतकऱ्यांची पिळवणूक, _संघर्ष समिती.
किमान आधारभूत किमतीच्या 200 रुपये अधिक भाव देण्याची मागणी..
अँकर _जालना जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने रस्त्यावरील आंदोलनाचा इशारा दिलाय,अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील समर्थ, सागर आणि समृद्धी या साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांची आर्थिक पिवळणूक होत असल्याचा आरोप करत ऊस उत्पादक संघर्ष समितीने हा इशारा दिलाय.
शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे तीन टप्प्यांत न देता, एकरकमी आणि किमान आधारभूत दरापेक्षा २०० रुपये अधिक दराने देण्यात यावेत अशी प्रमुख मागणी या संघर्ष समितीने केली आहे.
दरम्यान तालुक्यातील ही कारखाने राजकीय नैराशातून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकत आहेत. या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे निवेदनही सादर केलं असून
मागण्या मान्य न झाल्यास, संघर्ष समितीने थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय.























