Latur Crime : जावयाने आधी सासूचा कोयत्याने खून केला. नंतर स्वतःच्या सात वर्षाच्या मुलावर वार केला, त्यानंतर स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची थरारक घटना लातूर येथील वीर हनुमंतवाडी परिसरात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मुलावर उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.


लातूरच्या वीर हनुमंत वाडी भागातील थरारक घटना


लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर हनुमंत वाडी भागामध्ये काल रात्री थरारक घटना घडली आहे. घराबाहेर खेळणाऱ्या सात वर्षाच्या स्वतःच्या मुलावर कोयत्याने वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरात असलेल्या सासूवर अनेक वार करत तिचा जीव घेतला आणि स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.



बायकोबरोबर त्याचं पटत नव्हतं    


उदगीर येथे राहणारा जावई रजनीकांत वेदपाठक याचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. बायकोबरोबर त्याचं पटत नव्हतं.  एक आठ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा होता. बायको आणि मुलांना सतत मारहाण करत असल्यामुळे रजनीकांत याच्या वडिलांनीच सून आणि नातवंड यांना सुनेच्या माहेरी लातूरला पाठवलं होतं. यामुळे रजनीकांत प्रचंड अस्वस्थ होता. रागाच्या भरातच तो उदगीर वरून लातूरला आला. त्याच्याकडे कोयता होता. दारात खेळणारा मुलगा त्याच्या नजरेत आल्याबरोबर त्याने त्याच्यावर कोयत्याने वार केला. मुलगा जखमी अवस्थेत घरासमोर पडला होता. त्यानंतर रजनीकांत घरात गेला. घरात सासू चंद्रसेना संजयकुमार वेदपाठक होती. सासुवर कोयत्याने अनेक वार केले, या जीवघेण्या हल्ल्यात सासू चंद्रसेनाचा जागेवरच मृत्यू झाला.यावेळी रजनीकांत ची बायको आणि मुलगी घरात नव्हते. त्यामुळे ते बचावले. प्रचंड संतप्त असलेल्या रजनीकांतने नंतर घरातील गॅस चालू करून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे.
     


गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू


जखमी अवस्थेतील मुलाला शेजाऱ्यांनी तात्काळ खाजगी दवाखान्यात हलवलं. गंभीर जखमी असलेल्या मुलावर उपचार सुरू आहेत. आर्थिक अवस्था बिकट असलेल्या चंद्रसेना वेदपाठक या मेसचा व्यवसाय करतात. ही थरारक घटना आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्या भागात दहशत पसरली होती. रजनीकांत घरात कोयता घेऊन गेला आहे. घरातून रक्ताचे पाठ वाहत आहेत. त्यातच काही वेळात घरातून धुराचे लूटही सुरू झाले होते. घटनेची माहिती तात्काळ गांधी चौक पोलीस ठाण्याला देण्यात आली. गांधी चौक पोलीस ठाण्याची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिस आता पुढील तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


मानसिक स्थिती ठीक नसल्याने हे कृत्य?
   
मानसिक स्थिती ठीक नसलेल्या रजनीकांतने केलेले हे कृत्य धक्कादायक आहे. ज्या मुलावर त्याने वार केलेले आहेत त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यानंतर त्याने सासूचा जागेवरच खून केला आणि स्वतःला जाळून घेतले आहे. या कृत्यामाग नेमकी काय कारण आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी दिली आहे.


संबंधित बातम्या


Nashik: आजीचा नातवाने घेतला जीव, हातातील कड्याने केले वार, नाशिकची सुन्न करणारी घटना


Pandharpur News : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात तरुणाची हत्या, मोबाईलवर पाठविलेल्या मेसेजवरून प्रकरणाचा पाच तासात उलगडा