JOB MAJHA : इंडियन ऑईल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि ESIC मध्ये नोकरीची संधी
JOB MAJHA : कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
इंडियन ऑईल (IOCL)
पोस्ट – अप्रेंटिस
एकूण जागा – 570 (य़ात टेक्निशयन, ट्रेड, ट्रेड अप्रेंटिस- अकाऊंटंट, ट्रेड अप्रेंटिस डाटा एंट्री ऑपरेटर, ट्रेड अप्रेंटिस रिटेल सेल्स असोसिएटसाठी जागा आहेत.)
शैक्षणिक पात्रता – टेक्निशियन अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, ट्रेड अप्रेंटिससाठी 10 वी उत्तीर्ण आणि ITI, ट्रेड अप्रेंटिस अकाऊंटंटसाठी पदवीधर, ट्रेड अप्रेंटिस डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी आणि रिटेल सेल्स असोसिएटसाठी १२वी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता हवी.
वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - iocl.com
CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
पोस्ट – सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी)
एकूण जागा – 647
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
वयोमर्यादा – 35 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - www.cisf.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. त्यात तुम्हाला सुरुवातीलाच संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
ESIC
विविध पदांसाठी 3 हजार 847 जागांसाठी मेगाभरती होत आहे.
पहिली पोस्ट - अप्पर डिव्हिजन क्लार्क (UDC)
एकूण जागा – 1 हजार 726
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, संगणकाचं ज्ञान
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
दुसरी पोस्ट – स्टेनोग्राफर
एकूण जागा- 163
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण, संगणक टायपिंग
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
तिसरी पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
एकूण जागा – 1 हजार 930
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत संकेतस्थळ - www.esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. )
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI