HSC Time Table : व्हायरल होणाऱ्या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकावर बोर्डाचं स्पष्टीकरण...
Maharashtra HSC Time Table 2022 : गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
HSC Time Table : गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल वेळापत्रकावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकारवर विश्वास ठेवू नये, असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे. राज्यात दहावी - बारावीचे वर्ग जुलैपासूनच सुरु झाले आहेत. यामध्ये ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून अनेक शाळांमध्ये दहावी बारावी बोर्ड परिक्षेचा अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण होत आला आहे. यामध्ये मागील वर्षी दहावी बारावीच्या परीक्षा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने झाल्यामुळे यावर्षी बोर्डाची परीक्षा कशी होणार ? परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाकडून यासंदर्भात चाचपणी सुरु असली तरी दहावी बारावीच्या परीक्षांचे बनावट वेळापत्रके मात्र सोशल मीडियावर फिरण्यास सुरुवात झालेली आहे. दहावी बारावी परीक्षांच्या बाबतीती अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय झाला नसून या प्रकारच्या बनावट वेळापत्रके , अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
बोर्डाकडून स्पष्टीकरण -
बारावी बोर्ड परीक्षांची फेक वेळापत्रके सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या अनधिकृत पत्रकावर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बोर्डानं केलं आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा विचार सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच बोर्डाकडून जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नये. परीक्षाचं वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत https://mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
व्हायरल होणारं वेळापत्रक –
वेळापत्रकात काय दावा?
सोशल मीडियावर सध्या बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये बारावीची परीक्षा दोन मार्च 2022 पासून सुरु होणार असल्याचा दावा केला जातोय. पण हा दावा पूर्णपणे खोटा आहे. कारण बोर्डाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. लवकरच वेळापत्रक जारी करण्यात येईल, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलेय.
लवकरच वेळापत्रक जारी होणार -
अनेक बनावट वेळापत्रके आता सोशल माध्यमांवर फिरू लागली आहेत. मात्र अशा मंडळाकडून जारी केल्या नसलेल्या आणि अनधिकृत वेळापत्रक विद्यार्थी पालकांनी विश्वास ठेवू नये. मंडळाकडून परीक्षांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय झाल्यावर अधिकृतपणे वेळापत्रकाबाबत माहिती दिली जाईल अशी महिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha