एक्स्प्लोर

Rajesh Tope on Corona : तिसरी लाट भीषण, 80 लाख लोकांना संसर्गाची भीती, राजेश टोपेंचा इशारा

कोरोनाची (Corona) तिसरी लाट खूप भीषण असेल. दुर्देवाने तिसरी लाट आली तर राज्यातील 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope ) यांनी दिला आहे.

Rajesh Tope on Corona : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी तिसऱ्या लाटेत 80 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली आहे. 

राजेश टोपे म्हणाले, पहिल्या लाटेत वीस लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. दुसऱ्या लाटेत 40  लाख लोक कोरोनाबाधित झाले, दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यात जवळपास 80 लाख लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज आहे. परंतु, सध्या केंद्राने फक्त आयसीयुसाठीच लागणाऱ्या मनुष्यबळाला मान्यता दिली आहे. कोवीड सेंटरसह इतर कामांसाठीही मुनषबळ उपलब्ध करून द्यावे.  त्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य अभियानाला ( NHM) केंद्राने परवानगी दिलेली नाही. केंद्राने याला मान्यता दिली पाहिजे. शिवाय NHM कडून या आधिची राहिलेली रक्कम देण्यात यावी."

"राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे औषधांची उपलब्धता खूप गरजेची बाब आहे. केंद्राकडे त्यासाठी मागणी केली आहे. केंद्राने लवकरात लवकर औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा. त्याबरोबरच लॉकडाऊन आणि कोरोनाचे निर्बंध देशभर कसे असावेत? याची केंद्राने एक नियमावली तयार करून द्यायला हवी. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासोबतही तिसऱ्या लाटेच्या आनुषंगाने अनेक मागण्या केल्या आहेत. लवकरच तेही आमच्या मागण्या मान्य करतील असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.   

...तर कडक निर्बंध
महाराष्ट्रात सध्या कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यासंदर्भात बोलताना राजेश टोपे यांनी आरसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. महाराष्ट्रात जर कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट जास्त असेल तर निर्बंध लावण्यास हरकत नाही असे डॉ. भारगव यांनी सांगितल्याचे मंत्री टोपे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या

नियम न पाळल्यास कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

स्टायलिश मास्क नको, थुंकल्यास 1 हजाराचा दंड, अजित पवारांचे 5 मोठे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget