राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


राज्यभरात अवकाळीचा तडाखा; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती? 


मान्सून अंदमान बेटांपर्यंत दाखल झाला असून त्याची आगोकूच सुरु आहे. तसेच, पुढच्या आठवड्याभरात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अशात राज्यात मात्र अवकाळीने हैदोस घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर


बाष्पीभवन! बीड जिल्ह्यातील नऊ प्रकल्प कोरडेठाक, तर 23 जोत्याखाली; प्रकल्पांमध्ये उरला 23 टक्के पाणीसाठा


वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन बीड जिल्ह्यातील 143 पैकी 9 प्रकल्प कोरडे पडले असून 33 प्रकल्पातील जलसाठा हा जोत्याखाली गेला आहे. तर उर्वरित 101 जलप्रकल्पामध्ये केवळ 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर बीडमध्ये भविष्यात पाणीटंचाईच संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या धरणातील पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यातील तापमान हे 40 ते 42 अंशावर गेल्यामुळे तर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये 35 टक्के पाण्याचे बाष्पीभवन झालं असून, झपाट्याने जलसाठ्यातील पाणी कमी होऊ लागल्याने जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा 23 टक्के वर येऊन ठेपला आहे. वाचा सविस्तर


गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये 1 ऑगस्टपासून क्यूआर कोड बंधनकारक


1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे, तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे. महारेराकडे मार्च अखेरपासून नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांनाही महारेराने क्यूआर कोड उपलब्ध करुन दिलेले आहेत. वाचा सविस्तर


शिंदे-फडणवीस साहेब, विठ्ठलभक्तांना कोणी वालीच उरला नाही; भाविकांनी मांडल्या व्यथा


विठ्ठल मंदिर आराखडा 73 कोटी , पंढरपूर विकास आराखडा 2700 कोटी... या घोषणा करताना शिंदे- फडणवीस सरकार थकत नसले तरी किमान देशभरातून येणाऱ्या विठ्ठल भक्तांना काय हवे याचा तरी थोडा विचार करा असे म्हणायची वेळ आली आहे.  सध्या विठ्ठल भक्तांना या सरकारच्या काळात कोणी वालीच उरला नसल्याचे विठ्ठलभक्तांचे म्हणणे आहे. वाचा सविस्तर


मंदिरात ड्रेसकोड लागू करणे हा मूर्खपणा, पुजारी अर्ध नग्न असतात त्याचं काय? छगन भुजबळ यांचा सवाल 


कोणत्याही मंदिरात ड्रेस कोड लागू करणे, हा मुर्खपणा असून काही दिवसांपूर्वी कोणत्यातरी मंदिरात हाप पॅंट घालून आल्यावर त्या मुलाला जाऊ दिले नाही, हा मुर्खपणा असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मंदिरामधील बसलेले पुजारी अर्ध नग्न अवस्थेत असतात. त्यांनाही एखादा सदरा घालण्याची सक्ती करावी,अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. वाचा सविस्तर